Ant Asti Prarambh (Vaibhav Dhus) – The End is the Beginning
प्रस्तावना
शेवट हीच खरी सुरुवात आहे या मूलभूत विचाराने वेगळी दिशा, एक वेगळा विचार देण्याच्या हेतूने या पुस्तकाचा प्रपंच मांडला तुमच्यात दडलेली एक अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारी आणि आयुष्यात येणारे नियतीचे हेलकावे आपल्या खांद्यावर पेलताना येणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करायचा आणि आपला माईंडसेट हा सतत सकारात्मक कसा ठेवायचा याचे लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. कसा लढायचं कसं घडायचं आणि आलेल्या परिस्थितीचा सामना करून कसं पुढे निघायचं याचं इत्यंभूत लिखाण या पुस्तकात केलेले आहे. आणि नक्कीच याचा सकारात्मक परिणाम या पुस्तकाच्या माध्यमातून घडेल. आणि त्या खचलेल्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एक नवी उभारी मिळेल असा विश्वास आहे.
प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. तो करत असताना जीवनातील चढउतारांना घाबरून नैराश्याच्या गर्तेत अडकलेले कित्येक जण टोकाचा निर्णय घेतात. आणि नैराश्यात अडकून कुटुंबातील त्या व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्याच्या कुटुंबाची कधीही भरून न येणारी हाणी होत असते. आणि कुटुंबातील या एका व्यक्तीच्या टोकाच्या निर्णयामुळे पुढील दोन पिढ्यांना त्याची झळ सहन कारावी लागते.
मीही या अवस्थेतून गेलो आहे. कित्येक वेळेस सर्व काही संपले असे वाटत असताना थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि विचारांमुळे जीवनात पुन्हा उभारी घेण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे जिवनात खूप काही शिकायलाही मिळाले. आणि, त्यातूनच जीवनाच्या शेवटामधूनच जीवनाचा प्रारंभ असतो.. हे शिकायला मिळाले. आणि, अंतः अस्ति प्रारंभ The End Is the Begining या पुस्तकाची माझ्या हातून पहिली निर्मिती झाली.
गुलामी नाही तर राज्य करायला शिकविणारे हे पुस्तक म्हणजेच अंतः अस्ति प्रारंभ..! The End Is the Begining
शेवट हीच खरी सुरुवात असते.. आपण लढलो.., पडलो.., हरलो.. म्हणजे, आपला शेवट.! असे नसते. आणि, एखाद्या क्षेत्रात अपयश आले की, आपण संपलो.. असे नसते.! पुन्हा उठायचे…,. पुन्हा लढायचे.., त्याच ताकतीने.., त्याच जोमाने.., आणि त्याच जोशात..! जिवनात आपण.., लढायचं कसं ? घडायचं कसं? याचा सर्व आयुष्याचा सार या पुस्तकात देण्याचा आपण प्रयत्न केला आहे.
जीवनाचा आरंभ किती कठीण असतो.., आपल्या चुका आपण कशा स्वीकारायला हव्यात.., त्याचबरोबर ज्याच्यात हिम्मत आहे.. त्यालाच जगात किंमत आहे.., वेळ प्रत्येकाची येते… संगत गुण का सोबत गुण अशी जी म्हण आहे, त्याप्रमाणे जिवनात आपली संगतच आपले भविष्य कसे ठरवत असते हे यातून सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.. त्याचबरोबर नैराश्य हे श्याप नसून ते एक वरदान आहे याची सकारात्मक मांडणी करण्याचा छोटासा परंतु प्रभावीपणे प्रयत्न मी केला आहे.. इतकेच नव्हे तर बदलत्या काळानुरूप आपण बदल स्वीकारायला शिकले पाहिजे…, बोलायला शिकले पाहिजे…, स्वतःची लढाई स्वतः लढायला शिकले पाहिजे.., गुलामी नाही तर राज्य करायला शिकले पाहिजे.., यावर विशेषत्वाने फोकस करून.. जीवनात गुरु कोणाला करावे?, यशाची व्याख्या नेमकी काय.? तत्वांशी कसे निष्ठावंत राहावे आणि सोशल मीडिया हेच कसे आपले भविष्य आहे हे विस्तृतपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे पुस्तक आपणास नराश्यातून बाहेर काढण्यात व पुन्हा नव्या उमेदीने जीवन जगण्याचा मार्ग दाखविण्यात यशस्वी होईल याची मला खात्री वाटते.
धन्यवाद..!
वैभव दुस
१. आरंभ हा कठीणच असतो !
“प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ येते आणि हीच वेळ माणसाला शिकवते, हाच काळ माणसाला घडवतो आणि हाच काळ जीवनात यशस्वी होण्यासाठी करणीभूत ठरतो. पण बऱ्याचदा ह्या मिळालेल्या यशाला वाटेकरी फार असल्यामुळे गेलेल्या संघर्षाच्या काळाच साक्षीदार फक्त आणि फक्त आपणच असतो. आणि ह्याच संघर्षात माणसाने कस जगावं? कसं लढाव? आणि कसं यशस्वी व्हावं यासाठीच हा पुस्तकप्रपंच.. प्रपंच कुठला.., आयुष्यात आलेल्या अनुभवांची ही शिदोरी म्हणावी लागेल.”
“नमस्कार.., मी, वैभव आप्पासाहेब दुस. महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचा एक प्रतिनिधी.., युवा उद्योजक आणि मोटीवेशनल स्पीकर. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातल्या घराघरात मी आणि माझा आवाज महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील घराघरात वैभव दुस हे नाव आणि आवाज पोहोचला. लाखोंच्या संख्येने लोकांनी प्रेम दिलं., किंबहुना.., ते मला मिळते आहे आणि त्याच प्रेमापोटी आजवर ५०० हून अधिक उद्घाटन समारंभाला प्रमुख उपस्थितीचा मान आणि सन्मान मला मिळाला. अखंड महाराष्ट्रातून पुरस्कारांचा वर्षाव होत गेला. कालपर्यंत कोणीही ओळखत नसलेला मी.., आज व्यावसायिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्तींच्या संपर्कात आलो.. मीही.. तुमच्यासारखाच एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा.. आज जे काही यशाचे सोनेरी दिवस मी बघतोय.. ते दिवस काही एका रात्रीतून आलेले नाहीत.. किंवा, नियतीने ते माझ्या ताटात सहज काय दिले नाहीत. ‘ज्याला जिंकायच असतं त्याने कधी गुंतायच नसतं.. ‘असं कोणीतरी म्हटलेलं वाक्य आहे.. आणि, हेच वाक्य माझ्या जीवनाच रहस्य आहे. माझे वडील हे स्वतः पॅराग्लायडिंगपटू होते.., त्याकाळी दिवसाआड त्यांच्या कौतुकाचे स्तंभ पेपरात छापून यायचे.., ते सर्व बघून आमची छाती अभिमानाने फुलून जायची.. आपणही एक दिवस असच काहीतरी करू ह्या विचाराने मन आणि बुद्धी झपाटून जायची.. हळू हळू शिक्षण आणि इतर जबाबदार्यामुळे आयुष्य हेलकावे खात होत., काही कारणास्तव पदवीच शिक्षण काही मला त्या काळात पूर्ण करता आल नाही. आणि, मी व्यवसायात उतरलो. व्यवसायात येणाऱ्या अडचणी सुद्धा थांबायच नाव घेत नव्हत्या.. अंगावर कर्जाचा बोझा चढत होता., क्षणोक्षणी हेच वाटायचं की, आपण हरतोय का.? आपल्या प्रयत्नात नक्की काय कमतरता आहे याचा विचार मनात घोळत असायचा.. रात्रंदिवस ह्याच विचारांनी मला ग्रासल आणि एक नैराश्याचा काळ सुरू झाला. ह्या काळात मला सर्वात जास्त साथ दिली ती वडिलांच्या एका वाक्याने ते असं की., ‘आयुष्यात चढउतार तर असणारच, माणूस लढतोय म्हणजे तो हारणार.. किंवा, जिंकणार.. पण., परिस्थितीच्या विपरीत जर काही घडलं तर हार मानून खचून जाणं हे लढवय्याच काम मुळीच नाही.. जर शिखर गाठायचं असेल तर लढाव लागेल., पडाव लागेल., प्रसंगी आलेल्या अपयशाला तोंड देऊन पुन्हा उभ राहावं लागेल.. तेव्हाच इच्छित ध्येय आपण प्राप्त करू शकतो.’ वडिलांनी दिलेली ही शिकवण आजतायगत माझ्या मनावर कोरली गेली. कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची हिम्मत ही त्यातून आली आणि नव्याने सुरुवात केली. हे सर्व करत असताना जी परिस्थिति आपण सहन केली अथवा ज्या चुकीच्या अनुभवांनी मी ग्रासलो तस इतरांसोबत होऊ नये म्हणून मी प्रयत्न सुरू केले.
हे प्रयत्न कसे होते.? तर.. ते होते प्रेरित करण्याचे, चुकांमधून शिकत जाऊन आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय कराव लागत यासाठी मी आटापिटा करू लागलो.. संभाषण कौशल्य., स्टेज डेअरिंग.. ही आधीपासून माझ्यामध्ये होतीच. आणि, याच प्रयत्नातून एक दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेरणादायी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.. आणि, मी जनमानसात प्रसिद्धीस आलो.. या काही कार्यकाळात कित्येक उद्योजक घडविले., कित्येकांच्या कोमेजलेल्या पंखात बळ भरुन त्यांना उडायला शिकवलं., कित्येक व्यवसायाला सोशल मीडियावर वाढवण्याचे काम केले.. कित्येक तरुणांच्या हाती असलेली उद्योगाची दोरी बघता आपण जे करतोय ते महाराष्ट्राच्या तळागाळातील तरुणांना करता यावं यासाठीच या पुस्तकाचा प्रपंच मांडला.. सुरूवातीला वाटलं होतं की, आपल्याकडून हे होईल की नाही.? पण छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने हा प्रवास मांडायला घेतला.
आज महाराष्ट्रात असलेल्या शेतकरी तरुणांची व्यथा समजून घेताना त्यावर बनवलेले व्हिडिओ लोकांच्या काळजात घुसत गेले.. तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.. ती म्हणजे या तरुण पिढीला फक्त मार्गदर्शक नकोय.. तर एक खंबीर अशी हक्काची साथ हवी आहे.. माझ्या भूतकाळातल्या चुकांनी जी काही दशा केली ती आता तुम्ही करू नये यावर तुम्ही.., मी.., आणि.., या समाजाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून एकच गोष्ट मला मांडायची आहे. ती म्हणजे की, माणूस म्हणून जर जन्माला आलोय तर स्वतःच्या हिम्मतीवर.. आणि, कष्टाच्या., मेहनतीच्या.., जोरावर परिस्थितीला तोंड द्यायला शिकल पाहिजे. कारण, या परिस्थितीच्या छताडावर पाय रोवून ज्याला जगता येतं तोच आयुष्याचा खरा विजेता ठरतो. या युगात वेगाला जितके महत्व आहे, त्याहून अधिक महत्व आहे ते म्हणजे.. संयमाने पावले टाकणाऱ्या गतीला.
ही गती कासवाची जरी असली तरीही ह्या गतीला रोखण्याची ताकद कुठल्याच शक्तीत नाही. याचं सर्वात मोठ उदाहरण., स्त्रोत.. बघाल तर ते म्हणजे ‘थॉमस अल्वा एडिसन.’
एडिसन जेव्हा शाळेत होता तेव्हा कमी मार्क पडले म्हणून त्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं.., कारण तो शाळेच्या दृष्टीने, शिक्षकांच्या दृष्टीकोनातून वर्गातला एक ‘ढ’ विद्यार्थी होता. कदाचित तेव्हा त्यांना ठाऊक नसेल की एडिसनचे भविष्य काय आहे. तो कुठल्या दर्जाचा शास्त्रज्ञ आहे याची त्यांना साधी चाहूलही नव्हती. पण, म्हणून त्याचं शास्त्रज्ञ होणं थांबलं का..? की., त्याने बल्बचा शोध लावण्याच्या प्रक्रियेत काही खंड पडला का..? तर.. नाही! त्यांच्या शैक्षणिक निकषांच्या आधारावर त्यांची बुद्धिमत्ता, गुणवत्ता ठरली असती तर कदाचित जे काही मी लिहितोय ते सुद्धा शक्य झाल नसतं. हजारोंच्या संख्येने शोध लावणारा एडिसन एके ठिकाणी खूप सुंदर वाक्य म्हणतो, ते असं की, ‘माझ्या नऊ हजार नऊशे नळ्यान्णव प्रयोगातून हे सिद्ध झाल की त्या प्रयोगांमुळे बल्ब तयार होऊ शकत नाही. पण, म्हणून ते केलेले प्रयोग अयशस्वी होते असं नाही. तो लागलेला प्रत्येक शोध हा कुठे न कुठे उपयोगात येतोच आहे.’
आता एक प्रश्न डोक वर काढतो तो म्हणजे ज्याप्रमाणे एडिसन शिक्षण न घेता शास्त्रज्ञ झाला. मग.. शिक्षण महत्वाच नाही का.? नक्कीच शिक्षण महत्वाच आहे. एडिसन १८६९ साली टेलिग्राफ इंजीनियर झाला होता, त्यामुळे त्याला ज्या क्षेत्रात आवड होती, ज्या क्षेत्रात भरारी घेण अपेक्षित होत त्यासाठीच तांत्रिक शिक्षण त्याने घेतलेलच होत. मी सुद्धा काही कारणास्तव पदवीच शेवटचं वर्ष पूर्ण करू शकलो नव्हतो, पण म्हणून शिक्षणाचं महत्व कमी झाल नाही. मी ज्या कार्यक्षेत्रात आहे त्याचं इत्यंभूत शिक्षण घ्यावच लागलं. शिक्षण माणसाच्या जीवनाला आकार देतं.., त्याला जेव्हा अनुभवाची.., चिकाटीची.. जोड मिळते तेव्हा तो यशस्वी ठरतो. वाईट वेळ जशी माणसाला जग दाखवते तशी चांगली वेळ सुद्धा या वाईट काळात जितकं सकारात्मक विचार आपण करू, तितक्या लवकर ह्या निराशेच्या गर्तेतून आपण बाहेर पडू.. हा विश्वास आपण आपल्या मनात रुजवला पाहिजे असं मला वाटत.
बऱ्याचदा आपण आपल्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्याचा आणि सुरुवात करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा, अनेक नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये घर करत असतात, आणि याच सुरुवातीच्या काळात आपण आपले निर्णय आणि स्वप्नांचे बांध दुसऱ्या कोणाच्या तरी सल्ल्यानुसार ठरवत असतो पण प्रत्येकाचे विचार आणि अनुभव वेगळे असतात आपण आपल्या भविष्याचा सल्ला नेमकी कोणाकडून घेतोय ह्याला फार महत्त्व आहे. नोकरी करण्याचा सल्ला आपण व्यावसायिक विचारसरणी असलेल्या व्यक्तीकडून आणि व्यवसाय करण्याचा सल्ला जर आपण नोकरी करण्याची विचारसरणी असलेल्या व्यक्तीकडून घेत असेल तर आपण कुठे तरी चुकतोय हे पण तितकेच खरे.
आपल्या देशामध्ये टॅलेंट आणि कौशल्याची बिलकुल कमी नाही.. पण, आपल्यामधील कौशल्य हे नेहमी चुकीच्या ठिकाणी आपण वापरत असतो किंवा आपल्याला त्या प्रकारचे व्यासपीठ मिळत नाही. असेही म्हणू शकतो. क्षेत्र कोणतेही असोत संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असलेला अविभाज्य भाग आहे ज्याला आपण कधीच नाकारू शकत नाही, सुरुवातीच्या काळात आपण आपला जेवढा जास्त वेळ स्वतःवर काम करण्यासाठी घालवणार भविष्यात आपल आयुष्य तेवढच सुखकर होत जाणार. याच संघर्षाच्या अनुभवांच्या शिदोरीचा उलगडा ह्या पुस्तकाच्या माध्यमातून मी करणार आहे, जेणेकरून कोणीही कठीण परिस्थिती आल्यावर चुकीचे पाऊल उचलून जगण्याची कसरत अर्ध्यावरच सोडू नये.
आरंभ म्हणजे सुरुवात. प्रत्येक गोष्टीच्या प्रारंभात असलेल्या अडचणी, अडथळे, आणि अनिश्चितता हा एक स्वाभाविक भाग आहे. हे अडथळे मोठ्या प्रमाणात मानसिक, शारीरिक किंवा भावनिक असू शकतात. सुरुवात करताना माणसाला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. आरंभाच्या टाचणीत असलेली अस्वस्थता हे एकाच वेळी प्रेरणादायक आणि अडथळ्याचे कारण असू शकते. नवीन प्रकल्प, व्यवसाय, किंवा जीवनातील बदलाच्या प्रारंभात, माणसाला अनेकवेळा आत्मविश्वासाची कमी आणि धोरणात्मक स्पष्टतेचा अभाव अनुभवायला मिळतो. पण ह्या कठीण काळातच स्थिरता आणि यशाची संधी असते. एक आदर्श उदाहरण म्हणजे अनेक मोठ्या यशस्वी व्यक्तींची कहाणी. त्यांनी आपल्या आरंभातील समस्यांचे आंतरमंथन करून त्यांना पार करून, योग्य मार्ग निवडून यश प्राप्त केले. त्यांचा प्रारंभ कधीही सहज नाही, पण त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांनी नवा मार्ग तयार केला आणि अडथळ्यांचा सामना करण्याची क्षमता विकसित केली.
आरंभाच्या कठीण काळात धैर्य आणि चिकाटी राखणे आवश्यक आहे. प्रत्येक अडथळा आणि अडचण ही एक शिकण्याची संधी असते. यश प्राप्त करण्यासाठी, प्रत्येक अडथळ्याला सामोरे जाणे आणि त्या अनुभवातून काहीतरी नवीन शिकणे महत्त्वाचे आहे. सुरुवात एक कठीण प्रक्रियेची भाग असली तरी, त्या सुरुवातीलाच आपल्या सामर्थ्याची आणि परिश्रमाची परिक्षा असते.
अशाप्रकारे, आरंभाच्या कठीणतेला सामोरे जाऊन, आपल्या ध्येयाकडे दृढपणे वाटचाल करणे हेच खरे यशाचे चिन्ह आहे.
- आरंभाचे महत्व –
आरंभ म्हणजे एक नवा अध्याय.., एक नवीन सुरुवात… जीवनातील प्रत्येक क्षेत्रात.. कधी व्यवसायाच्या क्षेत्रात., कधी व्यक्तिगत जीवनात.. किंवा, कधी नव्या प्रकल्पात सुरुवातीला असलेल्या अडचणी आणि समस्यांचा सामना करावा लागतो. हा प्रारंभ केवळ सुरुवात नसून, यशाच्या वाटेवर एक पायरी आहे. प्रत्येक नवीन सुरूवात आपल्या संभाव्य यशाची आणि निराशेची कडवट पण सुगंधी ध्वनी आहे.
- सुरुवातीच्या अडचणी –
आरंभ करताना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. सुरुवातीला आर्थिक अडचणी.., ज्ञानाची कमी.., आणि अनुभवाचा अभाव हे सामान्यपणे असतात. हे अडथळे मानसिक आणि शारीरिक उर्जेचा वापर करतात. अनेक वेळा व्यक्तीला आत्मविश्वासाची कमी आणि अनिश्चिततेची भावना भेडसावते. यामुळे कार्याची सुरुवात करणे अत्यंत कठीण होऊ शकते.
- मानसिक अडचणी –
आरंभाच्या काळात मानसिक अडचणी मोठ्या प्रमाणावर असतात. नवीन कामाची सुरुवात करताना, आपल्यातल्या क्षमतांविषयी शंका येऊ शकते. “आपण यशस्वी होणार का?” हा प्रश्न सतत मनामध्ये गुंतलेला असतो. या प्रकारच्या विचारांनी व्यक्तीला चिंता आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी मानसिक ताकद आणि धैर्य आवश्यक आहे.
- आर्थिक अडचणी –
नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करताना आर्थिक अडचणी मोठ्या असतात. आवश्यक भांडवलाचा अभाव, वित्तीय नियोजनातील चुका, आणि सुरुवातीच्या खर्चाचे ओझे यामुळे अनेक वेळा प्रकल्पाच्या यशावर प्रश्न उपस्थित होतो. यावर मात करण्यासाठी उत्तम वित्तीय नियोजन, कर्ज व्यवस्थापन, आणि बचतीची आवश्यकता आहे.
- अनुभवाची कमी –
आरंभाच्या टाचणीत अनुभवाची कमी एक मोठी अडचण असते. नवीन क्षेत्रात प्रवेश करताना, अज्ञात परिस्थिती आणि अज्ञात काम यामुळे अडचणी निर्माण होतात. अनुभवाच्या अभावामुळे कामकाजातील चुका होतात, ज्यामुळे नवीन सुरूवातीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनुभव मिळवण्यासाठी शिकण्याची तयारी आणि निरंतर प्रयत्न आवश्यक आहे.
- सामाजिक अडचणी –
आरंभाच्या काळात सामाजिक अडचणी देखील असू शकतात. कुटुंब, मित्र, आणि सहकाऱ्यांपासून अपेक्षित समर्थन मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. काही वेळा, समाजाची नकारात्मक प्रतिक्रिया आणि निराशा यामुळे मनोबल कमी होऊ शकते. समाजाच्या अपेक्षा आणि प्रतिक्रिया यावर मात करण्यासाठी व्यक्तिमत्वाच्या ताकदीचा उपयोग करावा लागतो.
- यशाची प्रतिकूलता –
सुरुवातीला अडचणींचा सामना करताना, यशाच्या प्रतिकूलतेला देखील तोंड द्यावे लागते. प्रारंभाच्या टाचणीत असलेल्या अडचणी आणि संघर्ष याशिवाय यश प्राप्त करणे अत्यंत कठीण असते. ही प्रतिकूलता केवळ एक वेळेची अडचण नसून, अनेक बारिक तपशिलात असते, ज्याला तोंड द्यायला शिकावे लागते.
- सफलतेकडे वाटचाल –
कठीण सुरुवात आणि अडचणींचा सामना करताना, यशाच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे. प्रत्येक अडचणीचा सामना करतांना, त्यातून शिकणे आणि सुधारणा करणे हे महत्त्वाचे आहे. यश प्राप्त करण्यासाठी, कार्यक्षमतेत वाढ, आपल्या कार्यातील उत्कृष्टता, आणि चिकाटीची आवश्यकता आहे.
- प्रेरणादायक उदाहरणे –
कठीण सुरुवात करून यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या कथा प्रेरणादायक असतात. स्टीव जॉब्स, जॅक मा., जे.के. रोलिंग यांसारख्या व्यक्तींनी आपल्या अडचणींचा सामना करून मोठे यश प्राप्त केले. त्यांच्या कहाण्या एक प्रकारे आरंभाच्या कठीणतेचा सामना करून यश प्राप्त करण्याचे आदर्श उदाहरने आहेत. पण फक्त यामध्ये आपण यशस्वी व्यक्तींचीच नाही तर अपयशी झालेल्या व्यक्तींची सुद्धा उदाहरणे बघितली पाहिजेत, कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती हा कधीतरी अपयशी झालेला असतो त्यामुळे या व्यक्तींच्या चुकांमधून
आपण शिकायला हवं, त्या चुका आपण कश्याप्रकारे टाळू शकतो याचा अभ्यास त्या व्यक्तींच्या माध्यमातून करू शकतो.
- निष्कर्ष –
आरंभ हा कठीण असतो, हे सत्य असले तरी, यशाच्या मार्गावर हा एक अत्यावश्यक आणि अनिवार्य टप्पा आहे. प्रत्येक कठीण सुरुवात म्हणजे एक नवा शिक्षणाचा आणि अनुभवाचा क्षण आहे. यश प्राप्त करण्यासाठी, प्रत्येक अडचणीला सामोरे जाऊन, चिकाटी आणि धैर्याने काम करण्याची आवश्यकता आहे. प्रारंभातील अडचणींचा सामना करून, आपण आपल्या ध्येयांच्या दिशा निर्देशित करू शकतो. आणि, यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो.
कठीण सुरुवात करून यशस्वी झालेल्या काही मोठ्या उदाहरणांमध्ये खालील उल्लेखनीय व्यक्तींचा समावेश आहे :-
- स्टीव जॉब्स (Steve Jobs):
अॅपल कंपनीचे सहसंस्थापक स्टीव जॉब्स यांना सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांनी कॉलेजमध्ये काहीच काळ अभ्यास करून शिक्षण थांबवले आणि आपल्या कंपनीच्या प्रारंभात अनेक आर्थिक आणि व्यवस्थापनाच्या अडचणींचा सामना केला. त्यांच्या मेहनतीने आणि नवीन विचारशक्तीने, अॅपल जगातील एक अत्यंत प्रभावशाली कंपनी बनली.
- जॅक मा (Jack Ma):
अलीबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा. यांना सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांना 30 वेळा नोकरीसाठी नाकारले गेले. आणि, सुरुवातीला त्यांच्या व्यवसायातही आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. पण त्यांच्या अथक परिश्रम आणि नवकल्पकतेमुळे अलीबाबा आज एक जागतिक ई-कॉमर्स नेता बनला आहे.
- जे.के. रोलिंग (J.K. Rowling):
“हॅरी पॉटर” मालिकेची लेखिका जे.के. रोलिंग यांना जीवनातील खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांनी गरीब अवस्थेत बालपण घालवले आणि “हॅरी पॉटर” कादंबऱ्याच्य प्रकाशनासाठी 12 प्रकाशकांकडून नकार मिळवला. परंतु त्यांनी हार मानली नाही आणि आज हॅरी पॉटर विश्वभरातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त विक्रीच्या यादीतील पुस्तकांपैकी एक आहे.
वरील उदाहरणे सिद्ध करतात की, कठीण प्रारंभ असूनही, दृढ परिश्रम, चिकाटी, आणि समर्पणाच्या मदतीने यशस्वी होणे शक्य आहे.
“कठीण सुरुवात हीच यशाची गुरुकिल्ली” हे विधान खूप प्रेरणादायक आहे. हे आपल्याला सांगते की जरी सुरुवात कठीण असेल, तरी त्यातूनच आपल्याला यश मिळू शकते. अडचणी आणि आव्हाने आपल्याला शिकवतात, आपल्याला मजबूत करतात आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचा विकास करतात. त्यामुळे, कठीण परिस्थितीतही धैर्य न सोडता प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे आहे.
महाभारतात श्रीकृष्णाने अनेक वेळा आरंभाच्या कठीणतेविषयी दृष्टांत दिले आहेत. त्यापैकी काही महत्वपूर्ण दृष्टांत खालीलप्रमाणे आहेतः
- गीतेतील सल्लाः
अर्जुनाला कुरुक्षेत्रात युद्धाच्या आरंभी मोठ्या मानसिक संघर्षातून जावे लागले त्यावेळी श्रीकृष्णाने भगवद्गीतेतून त्याला सल्ला दिला. श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मयोग, भक्तियोग, आणि ज्ञानयोग यांचे महत्त्व समजावले. त्यांनी अर्जुनाला सांगितले की, प्रारंभातील अडचणींचा सामना करत आपल्या कर्तव्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
- उद्धवाशी संवादः
उद्धवाला श्रीकृष्णाने जीवनातील अडचणींचा सामना कसा करावा हे समजावले. श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितले की, “आधी कठीण वाटत असलेले कार्य, जर तल्लीनतेने केले, तर ते सोपे होते. आणि, त्यातूनच यश मिळते.”
- सुदामाच्या कथेतील दृष्टांतः
सुदामा श्रीकृष्णाचा बालमित्र होता. परंतु त्याचे जीवन अत्यंत गरिबीत गेले. एक दिवस सुदामा श्रीकृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेला आला. सुरुवातीला त्याला शंका होती की, श्रीकृष्ण त्याची मदत करतील का. पण श्रीकृष्णाने त्याचे हार्दिक स्वागत केले आणि त्याच्या सर्व अडचणी दूर केल्या. या कथेतून श्रीकृष्णाने दाखवले की, कठीण परिस्थिती असली तरी विश्वास आणि समर्पण असल्यास सर्व अडचणी दूर होतात.
हे दृष्टांत आपल्याला शिकवतात की, कोणत्याही कार्याची सुरुवात कठीण असू शकते. परंतु, योग्य मार्गदर्शन, दृढ निश्चय आणि आत्मविश्वासाने आपण यशस्वी होऊ शकतो.
अवघड वाटणाऱ्या प्रारंभाच्या मानसिक अवस्था विविध प्रकारच्या असू शकतात. या अवस्थांमुळे सुरुवात करणे कठीण वाटते. काही सामान्य मानसिक अवस्था खालीलप्रमाणे आहेतः
- भीतीः
जीवनात नवीन प्रवासाला सुरुवात करणे कठीण असू शकते, पण याच प्रवासात आपल्याला स्वतःच्या क्षमतांचा शोध लागतो. अज्ञाताच्या गडदतेत आपल्याला अपयशाची भीती वाटते, पण या भीतीचा सामना केल्यास यशाची नवी ओळख मिळते. समाजाच्या प्रतिक्रियांपासून घाबरून जाण्यापेक्षा, आपल्या धैर्याने त्यांच्या अपेक्षा बदलू शकतो. जेव्हा आपण नवीनतेला आत्मसात करतो, तेव्हा आपल्या जीवनाची दिशा आणि दृष्टिकोन विस्तारित होतो.
- शंका:
मनात संशयाचे सावट असताना, “मी हे करू शकतो का?” अशी विचारांची वावटळ उसळते. या विचारांच्या धुक्यात आत्मविश्वासाचे सूर हरवतात. विश्वासाच्या क्षणांत आपण स्वतःला ओळखतो. एक पाऊल पुढे टाकताच… आपण अनंत क्षमतांच्या आकाशाला स्पर्श करू लागतो. त्यामुळे स्वतःच्या कार्यक्षमतेवर शंका घेणे सोडून द्या आणि जोमाने कामाला लागा.
- आळसः
सुरुवातीला आलेली अडचण पाहून आळस येणे, काम पुढे ढकलणे, यामुळे कामाच्या सुरुवातीला अडथळे येतात. हेच अडथळे पुढे अनेक पटींनी वाढतात पण ज्या दिवशी आळस झटकून आपण खरोखर कामाला लागू तेव्हा अडथळ्यांचं महत्त्व शून्य होतं. आणि, आपला विश्वास दुणावत जातो.
- ओझेः
नवीन कामाचा विचार करून मनात ओझे वाटणे, कामाचे मोठेपण पाहून गोंधळणे, यामुळे सुरुवात करणे अवघड होते. देव कामाच्या ओझ्याचा भारही त्याच व्यक्तीला देतो ज्याच्यात ते ओझे पेलण्याची पूर्ण क्षमता असते. जे काम सुरुवातीला ओझ वाटतं पण नंतर तेच आपल्याला सवयीचं होऊन जातं.
- स्वीकारार्हताः
नवीन गोष्टींचा विचार करून त्या स्वीकारणे अवघड वाटणे, नवीन बदलांना सामोरे जाण्यासाठी तयार नसणे, यामुळे प्रारंभ कठीण वाटतो. पण वर्तमानातील बदल हे आपल्याला स्वीकारावेच लागतील. आता ते आपण कशापद्धतीने स्वीकारतो आणि कश्या पध्दतीने व्यावसायिक आणि खासगी जीवनात अंमलात आणतो ह्याला फार महत्त्व आहे.
- चिंताः
नव्या गोष्टींमुळे मनात उठणारी चिंता, कामाच्या यशस्वीतेबद्दलची अनिश्चितता, सुरुवातीला ताण आणते… पण, याच ताणातून उद्भवते आपली खंबीरता, जिद्द, आणि आत्मविश्वास. नव्या आव्हानांचा सामना करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचतो.. प्रत्येक अडचण ही नवी संधी बनून आपल्याला घडवते.
- मागील अपयशाचा अनुभवः
पूर्वीच्या अपयशाच्या आठवणींमुळे नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी मनाची तयारी नसणे, ही नैसर्गिक भावना आहे. अपयशाचे अनुभव मनात नकारात्मकता निर्माण करतात. पण, हीच नकारात्मकता आपल्याला प्रगतीसाठी प्रेरणा देऊ शकते. आपले अपयश हे आपल्या यशाचा पाया बनते. जेव्हा आपण अपयशाच्या क्षणांमधून शिकलो जातो, तेव्हा त्याच धड्यांनी आपल्याला पुढे जाण्याचे बळ मिळते. प्रत्येक अपयश ही एक नवीन शिकवण देतो, एक नवीन अनुभव देते. आणि, आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवते.
नव्या सुरुवातींसाठी आपल्याला आत्मविश्वासाची गरज आहे. आणि, हा आत्मविश्वास आपल्याला आपल्या आतल्या शक्तीतून मिळतो. अपयशाच्या आठवणींना सकारात्मकतेच्या दिशेने वळवून, आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने निर्धारपूर्वक वाटचाल करू शकतो. त्यासाठी आपल्याला भूतकाळाच्या जखमांपासून मुक्त होऊन, वर्तमानाची ताकद ओळखावी लागते. प्रत्येक नवीन सुरुवात ही एक संधी आहे… एक नवीन अध्याय आहे. ज्यामध्ये आपण आपल्या क्षमतांचे सर्वोच्च प्रदर्शन करू शकतो.
जगात मोठमोठ्या यशस्वी व्यक्तींची कहाणी पहा. त्यांच्या अपयशाच्या कथा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत जितक्या त्यांच्या यशाच्या. त्यांनी अपयशाच्या काळात देखील आपला आत्मविश्वास हरवला नाही, उलट त्यातून प्रेरणा घेतली आणि मोठ्या यशाला गवसणी घातली. आपणही त्याच मार्गावर चालू शकतो. प्रत्येक अपयशाने आपल्याला नवीन शिकवण मिळते, नवीन दिशा मिळते आणि आपल्याला यशाच्या शिखरावर नेते. त्यामुळे, अपयशाच्या आठवणींना मागे ठेवून, नव्या आत्मविश्वासाने आणि ऊर्जेने पुढे जाऊया.
या मानसिक अवस्थांवर मात करण्यासाठी योग्य मार्गदर्शन, सकारात्मक विचार, धैर्य, आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. तसेच, छोटे छोटे पाऊल उचलत मोठ्या उद्दिष्टांपर्यंत पोहचणे हा एक चांगला मार्ग आहे.
अगदी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे जगावं, झाली राख तरीही त्यातून झेप घेऊन आकाशी उडाव आणि पसरून पंख दाखवून द्यावं त्या अनंत आभाळाला, की बघ समोर कितीही अडचणी आल्या तरी मी उडत राहणं सोडणार नाही, जितकी संकट तू माझ्या रस्त्यात आणत जाशील तितकीच उंच भरारी मी घेत जाईन आणि समस्त ब्रम्हांडाला हे दाखवून देईल की अंतः अस्ति प्रारंभः
THE END IS THE BEGINNING!
२. चुका स्वीकारायला शिका!
‘अरे यार, आपलं नशीबच खराब आहे..’ हे एक वाक्य माझ्या कानावर पडलं.. नेहमीच काम करत असताना अशी वाक्य माझ्या कानावर या ना त्या कारणाने पडतच असायची. आधीच स्वतःला अश्या नकारात्मक गोष्टींमधून बाहेर काढलं होत. डोळ्यासमोर गगनाला भेदून जाणारी स्वप्न असायची, प्रगतिकडे मार्गक्रमण होत असताना एकाच्या तोंडून हे वाक्य ऐकलं. क्षणभर थांबलो आणि पुन्हा जोमाने कामाला लागलो. कारण थांबणार तो मी कुठला..?
खर तर कधीतरी हा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात येतोच पण ह्यावर उत्तर शोधणं गरजेचं आहे असं कोणालाच वाटत नाही? मुळात आपण तिथेच हार मानतो जिथून आपल्या खऱ्या उत्कर्षाला सुरुवात होणार असते. पण या आततायी भावनेत आपण नको तो निर्णय घेतो.. आणि, पुढे बराच पल्ला गाठल्यावर आपल्याला जाणीव होते की, ‘नाही, यार.. आपण तेव्हा तेच केल असतं ना.. तर, आज आपली वेळ वेगळी असती.’ मला ठामपणे वाटत.. की, अश्यावेळी आपण प्रयत्न करण्यापेक्षा दोष देणं जास्त पसंत करतो. मग तो दोष परिस्थितीला असो.., स्वतःला असो.. किंवा, इतर कोणालाही असो. आपल्या अपयशाच खापर कोणाच्या माथी फोडायच ह्या एका विचारामुळे आजचा तरुण धोका पत्करण्यास धजावत नाही. खरं तर वेळ नक्कीच बदलणारी असते, काळाची एक गोष्ट चांगली असते की, तो कायमस्वरूपी नसतो. चांगलीही वेळ जशी ठाण मांडून बसत नाही तशीच वाईट वेळ सुद्धा फार टिकत नसते. ज्या दिवशी आपण स्वतःमधील चुका स्वीकारायला आणि त्या सुधारून त्यावर काम करायला सुरुवात करू त्या दिवशी आपण संघर्षाच्या लायक बनू अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
चुका स्वीकारायला हव्यात याचं विश्लेषण करताना, आपण समजून घेतलं पाहिजे की, चुका स्वीकारणे ही व्यक्तिमत्त्व विकासाची आणि यशस्वी होण्याची महत्त्वपूर्ण पायरी आहे. चुकांना स्वीकारणे म्हणजे, आपल्या स्वतःच्या मर्यादांची जाणीव होणे.. आणि, त्या सुधारण्यासाठीची तयारी ठेवणे. जेव्हा आपण आपल्या चुकांची जबाबदारी घेतो.. तेव्हा, आपण त्यातून शिकण्याची आणि त्यावर सुधारणा करण्याची संधी मिळवतो. चुकीच्या निर्णयामुळे किंवा कृतीमुळे काय चुकले? हे समजणे.. आणि, त्यातून योग्य धडा घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीला स्वीकारल्याने आपण स्वतःची प्रामाणिकपणे पारख करू शकतो आणि त्यामुळे आत्मपरीक्षण करणे सुलभ होते.
चुका स्वीकारल्याने आपल्या आत्मविश्वासात वाढ होते. जोपर्यंत आपण चुकांच्या जबाबदारीपासून पळ काढतो, तोपर्यंत आपल्याला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली शिकवण मिळत नाही. स्वतःच्या दोषांचा स्वीकार केल्याने आपण आत्मसुधारणा करू शकतो. हा स्वीकार करण्याची वृत्ती असणं म्हणजेच आपलं व्यक्तिमत्त्व प्रगल्भ होण्याचं लक्षण आहे. चुकीच्या गोष्टींना स्वीकारणं म्हणजेच त्या सुधारण्यासाठी पहिलं पाऊल उचलणं होय.
चुका स्वीकारणं आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातही महत्त्वाचं असतं. कार्यक्षेत्रात, चुका स्वीकारलयाने कार्यक्षमतेत सुधारणा करता येते. सहकारी, वरिष्ठ आणि ग्राहकांशी असलेले संबंध मजबूत होतात. यामुळे विश्वासार्हता वाढते आणि लोक आपल्यावर अधिक विश्वास ठेवतात. वैयक्तिक जीवनातही, आपल्या चुका स्वीकारल्याने नातेसंबंधात प्रामाणिकता आणि पारदर्शकता येते. चुकीचा स्वीकार केल्याने आपल्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी असलेले नाते अधिक दृढ होते.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, चुकीचा स्वीकार करून आपण आपल्यातील समज आणि समर्पण दर्शवतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी, चुका स्वीकारून त्यावर सुधारणा करण्याची वृत्ती अंगीकारणे आवश्यक आहे. त्यामुळे, चुका स्वीकारणे हा एक महत्त्वपूर्ण गुण आहे.. जो, आपल्याला यशस्वी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व बनवतो.
एका घरात चार भाऊ राहत असतात, त्यांच्या आई वडिलांनी काबाडकष्ट करुन त्यांना वाढवलेलं असतं. मुलांना आपल्या आई वडिलांच्या कष्टाची किंमत ठाऊक असते.., त्यांनी घेतलेल्या मेहनतीची जाणीव ठेवून ते चारही मुलं शिकून सवरून स्वतःचा उद्योग उभा करतात, दिवसेंदिवस त्यांची प्रगती होत राहते, पिढ्या दर पिढ्या त्यांच्या संपत्तीत वाढ होते. त्या चारही मुलांच्या पुढच्या पिढ्यांकडे व्यवसायाचा वारसा जातो, त्यांच्या परीने तो व्यवसाय वाढवतात, हीच गोष्ट तिसऱ्या पिढीकडे जाते. पण, त्यांचा व्यवसाय कमी कमी होत जातो. काही वर्षानी चौथ्या पिढिकडे व्यवसाय सोपवला जातो आणि तिथून मात्र व्यवसायात आलेल्या अडचणीपुढे ती पिढी गुडघे टेकून बसते.. आणि, व्यवसाय ठप्प होतो. कुठे चूक झाली असेल ह्या गोष्टीत त्या पिढ्यांची.? ती चूक होती वेळेत झालेले बदल व चुका न स्वीकारण्याची.!
इंग्रजीमध्ये सुंदर वाक्य आहे,
‘Hard Times Creates Strong Men, Strong Men Create Easy Times, Easy Time Creates Weak Men & Weak Men Creates Hard Time…’
पहिल्या पिढीने त्यांच्या आधीच्या पिढीच्या कष्टांची जाणीव ठेवली आणि वेळ बदलवून दाखवली. पण, नकळत येणार्या नंतरच्या पिढ्यांना ती संपत्ती, ते सर्व शानोशौकत सोपी वाटू लागली आणि तदनंतर व्यवसाय संपुष्टात आला.
या गोष्टीतून काय शिकाव, जेव्हा आपण परिस्थितीला, नशिबाला दोष देतो तेव्हा आपण आपल्या प्रयत्नांमध्ये कमी पडलो का? हेही पडताळून बघायला हवं. जर छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहानंतर असे म्हणाले असते की, जाऊदे.., माझं नशीबच खराब आहे. तर काय झाल असतं? त्यानंतर महाराष्ट्रात साडेतीनशे किल्ल्यांच साम्राज्य उभं राहिल असतं का? नाही ना? मग आपण कुठे आहोत? वेळ बादलायलाही तो वेळ द्यावा लागतो, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावीच लागणार आहे. जर वैद्यकीय क्षेत्रात यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला त्या क्षेत्राचा अभ्यास करावा लागणार आहे, त्यातले बारकावे शिकावे लागतील बर ते शिकताना आपल्याला अडचणी येणारच ना! ज्याला अडचणीच येत नाही तो व्यक्ति चुकीच्या दिशेने प्रयत्न करतो आहे असं मला वाटत. वेळ बदलण्यासाठी आधी आपल्याला आपला भूतकाळ आणि कम्फर्ट झोन या दोन्ही गोष्टी सोडाव्या लागतील, त्याशिवाय गोष्टी बदलतील कश्या? त्या त्या वेळेप्रमाणे आपण स्वतःमध्ये, कामाच्या पद्धतीमध्ये बदल करायलाच हवेत. परिवर्तन हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे, प्रकृतीने तो सर्वांनाच घालून दिला आहे. बदल घडताना अनेक गोष्टी अवतीभवतीच्या आपोआप बदलत असतात. हे होणारे बदल स्वीकारत जो व्यक्ति त्याच्या ध्येयाचा प्रवास करतो त्याला निश्चित यश मिळतचं. यश काही दोन मिनिटात तयार होणारी मॅगी नाही ना.. की, आता पाण्यात टाकली आणि तयार झाली, अहो आपल्याला जे इच्छित आहे, जे ईप्सित आहे त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम दोष देणं बंद करावे लागेल.
ज्या दिवशी आपण व्यवस्थेला, कुटुंबाला, नकळतपणे स्वतःला दोष देणं बंद करून त्या चुकांवर, त्या तत्सम गोष्टींवर कार्य करायला सुरुवात करू तेव्हा ती वेळ नक्कीच बदलणार आणि त्या बदलणार्या वेळेला कोणीही अडवू शकणार नाही. आपण स्वतःच्या सकारात्मक बाबींवर काम करायला हव, एखाद्यामध्ये जर चांगले कलागुण असतील तर त्या कालगुणांमधून मी आणखी काय करू शकतो? जेणेकरून ते कलागुण आणखी बहरून येतील. यावर विचार करायला हवा. कारण कठीण काळात सगळ्यात जास्त आधार देते ती एकच गोष्ट ती म्हणजे कला, कौशल्य आणि अनुभवांच गाठोडं!
खर म्हणजे आपण जर आपल्या भूतकाळात झालेल्या चुका वारंवार करत असेल तर आपण शिकतही नाही आणि घडतही नाही. एकदा डोळे बंद करून विचार करा आपल्या भूतकाळामध्ये जेवढे काही निर्णय चुकले ते प्रत्येक निर्णय आपण भावनिक विचार करून घेतलेले होते का? की प्रॅक्टिकल किंवा व्यावहारिक विचार करून?. मग आपण आज वर्तमानात सुद्धा त्याच पद्धतीने भावनिक होऊन निर्णय घेत असू.. तर, मग आपल्या भूतकाळात घडलेल्या घटनांच महत्त्व उरत नाही. भूतकाळ हा आपल्याला शिकवण देण्यासाठी आणि त्या चुका पुन्हा घडू नये यासाठी असतो पण तरीही आपल्याकडून त्याच घटनांची पुनरावृत्ती होत असेल तर आपण स्पर्धेच्या जगात टिकू शकत नाही. नकळत झालेल्या चुका आणि पुन्हा पुन्हा केलेल्या त्याच चुका ह्यामध्ये फार मोठी तफावत आढळून येते हे आपल्याला समजतं.., कळतं पण आपल्याला ते वळून घ्यायचं नसतं.. कारण आपण घाबरतो.., माणसं दुरावयाला आणि त्यांच्यापासून दूर जायला. पण ह्या मोहाच्या क्षणांना ज्या व्यक्तीला टाळता येतं ती माणसं वेगळीच असतात. सामान्यपणाची भावना साधं राहणं.. चुकीचं नाही. पण, आपल्याला वेगळी ओळख, उंच शिखर गाठण्यासाठी हा साधेपणा तितका उपयुक्त ठरतं नाही. पुढे जायचं असेल तर व्यक्तित्त्वात बदल हा आवश्यक आहे.
कोविड काळात सर्व जग आर्थिक तंगीत होरपळून निघत होत, पण काही लोक अशी होती की ते घरी बसून सुद्धा त्यांच्या कलागुणांच्या जोरावर त्यांची त्यांची क्षेत्र गाजवत होती. मग त्या लोकांनी केला असेल का नशिबाला दोष देण्याचा विचार? जग जिंकण्यासाठीच असतं, त्यावर विजय मिळावा म्हणूनच त्याची उत्पत्ती झाली आहे.. पण, हे जग जिंकण्याच्या अनेक बाबी आहेत. ज्याला ते जिंकायच असतं त्याने चकांकडे, नकारात्मक विचारांकडे दर्लक्ष करायच असतं इतकच. आजच्या पिढीकडे अनेकविध प्रकारचे रिसोर्सेस उपलब्ध आहेत, अगदी एका क्लिकवर जगभरात असलेल्या ज्ञानी मंडळींच्या संपर्कात माणूस क्षणात जाऊ शकतो, पण तो क्षणही आपल्याला काढायचा नसतो. खर तर या गोष्टी तक्रार करण्यासारख्या नाहीच मुळी.. पण, शेवटी मनुष्य स्वभाव आहे.. जो, प्रत्येक वेळी आधी नकारात्मक आणि नंतर सकारात्मक पद्धतीने विचार करायला लावतो. याच गोष्टींचा उपयोग आपल्याला या वाईट काळात करायचा आहे.
नाही होत एखादी गोष्ट.. तर, वाट बघा.., त्यासाठी अथक परिश्रम घ्या.., आपण चुकतो कुठे याचं अवलोकन करा.., चुका स्वीकारा.. आणि, पुन्हा सुरुवात करा.! या साध्या सूत्रावर कर्मबंध अवलंबून असतं. महाभारतात महारथी कर्ण जेव्हा कुरुक्षेत्रात युद्ध करीत होता तेव्हा त्याच्या रथाचं चाक जमिनीत धसलं होतं… नजरेच्या टप्प्यात आलेला विजय हा क्षणात पराभवाच्या छायेत सापडला.., ह्या चांगल्या वाईट काळाच्या संघर्षात आपण आपली कर्म कशी ठेवतो याचा देखील सारासार विचार केला पाहिजे. वाईट काळ आहे म्हणून दोष द्यायचा.. आणि, चांगल्या काळात असलेल्या गोष्टींचा उपभोग घेत पुढचा विचार न करता कार्यपद्धतीत बदल करून टाकायचे. त्यामुळे येणारं अपयश हे जास्त जिव्हारी लागत.
एका गावात राम नावाचा एक तरुण राहायचा. तो खूप मेहनती आणि कष्टाळू होता, पण काही तरी कमी पडत असल्यामुळे त्याला सतत अपयश येत असे. एके दिवशी तो खूप निराश होऊन गावातील एका विद्वान साधूंच्या आश्रमात गेला. साधूंनी त्याचं स्वागत केलं आणि त्याचं दुःख ऐकलं.
रामने साधूना विचारलं, “गुरुजी, मी खूप प्रयत्न करतो, पण नेहमी अपयशी ठरतो. मी काय करू?”
साधूंनी हसत हसत सांगितलं, “राम, मी तुला एक कथा सांगतो. एकदा एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याच्या शेतात खूप मोठे दगड होते, ज्यामुळे त्याला चांगली शेती करता येत नव्हती. एके दिवशी त्याने ठरवलं की, तो प्रत्येक दगड उचलून बाहेर काढेल. काम खूप कठीण होतं, पण तो हळूहळू प्रत्येक दगड काढत राहिला. शेवटी, त्याचे शेत मोकळं झालं आणि त्याला उत्तम पीक मिळालं.”
राम विचारात पडला आणि म्हणाला, “गुरुजी, ही कथा तर चांगली आहे.., पण, यातून मला काय शिकायला मिळेल?”
साधूंनी सांगितलं, “राम, त्या शेतकऱ्याने प्रत्येक दगड म्हणजे एक अडथळा मानला.. आणि, त्यावर मात केली. तसंच, तू आपल्या जीवनातील प्रत्येक अडथळा म्हणजेच प्रत्येक चूक, ही एक संधी मान. चुकांमधून शिकून त्यावर काम कर. चुकांना दूर करत जा आणि पुढील प्रयत्न अधिक चांगले कर.”
रामने साधूंना धन्यवाद दिले.. आणि, त्यांच्या सल्ल्यानुसार कामाला लागला. प्रत्येक चूक ही एक संधी मानून त्यातून शिकत गेला. हळूहळू त्याचे प्रयत्न फळाला आले आणि त्याला यश मिळू लागलं. अपयशाची भीती त्याच्यापासून दूर झाली आणि आत्मविश्वासाने तो पुढे जात राहिला.
या बोधकथेचा निष्कर्ष असा की, प्रत्येक चूक म्हणजे शिकवणूक असते चुकांमधून शिकून, त्यावर सुधारणा करून, आपण यशस्वी होऊ शकतो अडथळ्यांना दूर करत, प्रयत्न करत राहणे हेच यशाचं गमक आहे.
याच अपयशाने माणूस खचून जातो.. आणि, पुढे पाऊल टाकायला धजावत नाही, हे जरी सत्य असलं तरीही संघर्ष हा कोणाला टाळता येणं शक्यच नाही.
मागील अपयशाचा अनुभव हा कोणत्याही व्यक्तीच्या मानसिकतेवर मोठा प्रभाव पाडू शकतो. या अनुभवामुळे होणारे परिणाम, आणि त्यावर मात करण्याचे उपाय यांचे विस्तृत विवेचन खालीलप्रमाणे आहे:
- स्वतःबद्दल नकारात्मक धारणाः
मागील अपयशामुळे व्यक्तीची आत्मप्रतिमा खालावत जाते. “मी काहीच चांगले करू शकत नाही” असा विचार मनात येतो. पण तीच खरी सुरुवात असते.. काहीतरी नवीन करण्याची… मागील अपयशाच्या अनुभवातून शिकण्याची… आणि, जिद्दीने पेटून उठण्याची. आपण स्वतःबद्दल जसा विचार करणार.. आपलं भवितव्य तसच घडतं जाणार. कारण, नकारात्मक भावनेतून केलेली सुरुवात, तिचा शेवट सुद्धा नकारात्मकतेकडे आपल्याला घेऊन जात असतो. त्यामुळे नेहमी स्वतःला सकारात्मक विचारांमध्ये गुंतवून ठेवायला हवं.
- आत्मविश्वासाची कमी:
अपयशामुळे आत्मविश्वास ढळतो. पुढील प्रयत्नांना घाबरायला होते.. आणि, नवी आव्हाने स्विकारण्याची क्षमता कमी होते. लढायच तर पराभव टाळण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठीच. हा आत्मविश्वास पहिल्यांदा आपल्या अंतर्मनात जागृत व्हायला हवा. जिंकण्यासाठी अनुभव, योजना हव्यातच. पण, आत्मविश्वासाची कमी असलेली माणसं आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत. कारण आपण आखलेल्या योजनांवरती आपला स्वतःचा आत्मविश्वास बळकट हवा, जर आपल्या योजनेवर आपला विश्वास नसेल तर अपयश आल्याशिवाय राहत नाही.
- भीती आणि चिंताः
अपयशाची भीती सतत मनात राहते. “परत अपयशी झालो तर?” असा विचार चिंतेचा कारक बनतो. यामुळे नवीन गोष्टी करण्याचे धाडस होत नाही. जर समुद्रात जहाज न्यायचं आहे तर समुद्राच्या खोलीचा व उसळणाऱ्या लाटांची भीती बाळगून त्यावर व्यर्थ चिंता करण्यापेक्षा जोपर्यंत आपण त्या समुद्रात पाऊल ठेवत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये एक उत्तम खलाशी तयार होऊ शकत नाही, त्यामुळे फक्त कल्पित असणाऱ्या भीती आणि चिंतेकडे दुर्लक्ष करून धाडसाने ज्याला पाऊल टाकता येतं तोच व्यक्ती खवळलेला समुद्र पार करू शकतो. एकदा का माणसाने पाण्यात उडी मारली.. की, तो हातपाय मारून का होईना पोहोता यायला शिकतोच. आणि, मग मात्र आपण बुडून जाऊ, समुद्र पार करू शकू का? अश्या चिंता, भीती आपोआप दूर सारल्या जातात.
अपयशावर मात करण्याचे उपायः
- अपयशाचे विश्लेषण:
अपयशाचे कारण शोधा आणि त्यावर विचार करा. काय चुकले, काय सुधारता येईल, हे समजून घ्या. चुका कबूल केल्याने पुढील वेळी त्यातून शिकायला मिळते. अपयशाची बरीच कारणे असू शकतात. व्यवसायाला वेळ न देणे, व्यवस्थापन न करणे, योजनांची अंमलबजावणी न करणे, सुसंवाद न ठेवणे. त्यामुळे चुकांची जबाबदारी घ्यायला शिका. एकदा चूक झाली हे मान्य केलं की त्या सुधारण्याची क्षमता ही आपोआप सिद्ध होत जाते.
- सकारात्मक विचारधारा:
हे लक्षात ठेवा की प्रत्येक अपयश हे शिक्षणाचे एक पाऊल आहे. अपयशातून सकारात्मक धडा शिकण्याचा प्रयत्न करा. “मी या अनुभवातून काय शिकू शकतो?” असा प्रश्न स्वतःला विचारा. व्यवसायात स्वतःवर सकारात्मक पद्धतीने विश्वास ठेवणे यापेक्षा मोठी गुंतवणूक कुठलीच नसते त्यामुळे आपली विचारधारा ही कायम सकारात्मकच ठेवता आली पाहिजे.
- समर्थन प्रणाली:
अपयशामुळे आत्मविश्वास ढळतो, हे सत्य असले तरी, हे अपयश आपल्याला प्रगल्भ बनवते. प्रत्येक अपयशाच्या अनुभवातून आपल्याला शिकण्याची संधी मिळते, जी आपल्याला पुढील प्रयत्नांसाठी अधिक सामर्थ्यवान बनवते. जेव्हा आपण अपयशाचा सामना करतो, तेव्हा ते आपल्याला आपली मर्यादा आणि क्षमता ओळखण्याची संधी देते. अपयशामुळे आपल्याला आपल्या कमकुवत गोष्टींची जाणीव होते, ज्यामुळे आपण त्यात सुधारणा करू शकतो आणि पुढील प्रयत्नांसाठी अधिक तयारी करू शकतो.
नव्या आव्हानांचा स्वीकार करणे हीच तर खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे. आपल्याला अपयशाच्या भीतीने थांबायचे नसून, त्या भीतीचा सामना करून पुढे जावे लागते. प्रत्येक प्रयत्न हा एक नवा धडा आहे.., एक नवा अनुभव आहे.., जो, आपल्याला अधिक सशक्त बनवतो.. प्रेरणादायी उदाहरणे दाखवतात की, मोठमोठ्या यशस्वी व्यक्तींनी अपयशाच्या क्षणांमध्येच आपले आत्मविश्वास दृढ केले. आणि, नव्या आव्हानांचा सामना करण्याची ताकद मिळवली. आपणही अपयशाला एक शिक्षणाचे साधन मानून, त्यातून शिकून, नवे आव्हान स्वीकारायला नेहमी तयार असावे. अपयश हे केवळ यशाच्या मार्गावरची एक पायरी आहे, जी आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवते.
- स्वतःला वेळ द्याः
अपयशातून सावरायला वेळ लागतो.. हे पूर्णपणे मान्य आहे. प्रत्येक अपयश हा एक अनुभव आहे जो आपल्याला अधिक शहाणे बनवतो. या काळात स्वतःला पुनर्प्राप्त करण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे, कारण मानसिक स्वास्थ्य है आपल्या यशाचे मूळ आहे. जेव्हा आपण अपयशाचा सामना करतो, तेव्हा आपल्याला स्वतःच्या मनाची आणि भावनांची काळजी घेणे महत्त्वाचे असते स्वतःला वेळ देणे म्हणजे आपल्या मनाला शांत करणे, आपल्या भावना समजून घेणे, आणि त्या प्रक्रियेतून शिकणे. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी ध्यान, योगा, नियमित व्यायाम, आणि जवळच्या लोकांशी संवाद साधणे उपयुक्त ठरते.
अपयशातून सावरण्यासाठी लागणारा वेळ आपल्या मानसिक आणि शारीरिक पुनर्बाधणीचे एक महत्त्वाचे अंग आहे. आपल्याला आपल्या क्षमतांचा पुनर्विचार करण्याची आणि नव्या जोमाने पुढे जाण्याची संधी मिळते. प्रत्येक क्षण आपल्याला एक नवा धडा शिकवतो. अपयशातून सावरल्यानंतर, आपण अधिक आत्मविश्वासाने, शक्तिशाली, आणि धैर्याने समोर येऊ शकतो. त्यामुळे स्वतःला वेळ द्या, आपल्या मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व ओळखा, आणि यशाच्या दिशेने नव्या उर्जेने पुढे जा.
- विद्यार्थी वृत्तीः
आयुष्यभर विद्यार्थी राहण्याची वृत्ती ठेवा. नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा ठेवा आणि आत्म-सुधारणा करा. माणूस हा मरेपर्यंत शिकतच असतो. रोज एक नवीन संधी, रोज नवीन आव्हाने, रोज येणाऱ्या नवीन संकटावर मिळणारं समाधान यातून आपण शिकत असतो. ‘मी करू शकतो’.. आणि, ‘मीच करू शकतो’ या दोन्ही गोष्टींमध्ये तफावत आहे. ‘मी करू शकतो’ हा एक सकारात्मक शिकाऊ दृष्टिकोन आहे.. अन्, ‘हे फक्त मीच करू शकतो’ हा झाला अहंकारातून तयार झालेला नकारात्मक दुष्टिकोन आहे. त्यामुळे आपण आयुष्यभर स्वतःला विद्यार्थीदशेतच बघायला हवं.
मागील अपयशाचा अनुभव व्यक्तीच्या यशस्वी होण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करू शकतो, पण योग्य दृष्टिकोन, सहकार्य, आणि आत्मविश्वासाने त्यावर मात करून पुढे जाणे शक्य आहे. अपयशाचे विश्लेषण करणे म्हणजे आपल्या चुकांचा अभ्यास करून त्यातून शिकणे आणि त्यानंतर सुधारणे होय. यामध्ये खालील टप्प्यांचा समावेश होतोः
१. भावनात्मक प्रतिक्रियाः
अपयशानंतर प्रथम आपण भावनिक प्रतिक्रिया देतो. या प्रतिक्रियेचा विचार करणे महत्त्वाचे आहे कारण ते आपल्याला पुढील विश्लेषणात मदत करते.
- स्वीकारणेः अपयश स्वीकारणे आणि त्याचे अस्तित्व मान्य करणे.
- भावना व्यक्त करणेः निराशा, दुःख, राग या भावनांना बाहेर पडू देणे.
- सांत्वनः स्वतःला सांत्वन देणे आणि समजून घेणे की, अपयश हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
२. अपयशाचे कारण शोधणेः
अपयशाचे विश्लेषण करताना त्याची कारणे शोधणे आवश्यक आहे.
- स्वतःला प्रश्न विचाराः “हे का घडले?” “काय चुकले?” “मी वेगळे काय करू शकलो असतो?”
- संदर्भ तपासणेः संबंधित माहिती.., आकडेवारी.., आणि फीडबॅक यांचा विचार करणे.
- तटस्थ विश्लेषणः आपल्या चुका समजून घेण्यासाठी तटस्थ राहणे.
३. स्पष्टीकरण आणि जबाबदारीः
अपयशाचे कारण स्पष्ट झाल्यानंतर त्याबद्दल जबाबदारी स्वीकारणे महत्त्वाचे आहे.
- स्वतःची भूमिका ओळखणे: आपल्या क्रिया आणि निर्णयांवर विचार करणे.
- बाह्य घटकः बाह्य घटकांचा अभ्यास करणे आणि त्यांचा आपल्या अपयशावर झालेला परिणाम समजणे.
४. अपयशाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोनः
अपयशातून सकारात्मक गोष्टी शोधणे आणि शिकण्याची वृत्ती ठेवणे महत्त्वाचे आहे.
- शिकवणः अपयशातून काय शिकायला मिळाले?
- सुधारणा योजनाः यापुढे चुकांपासून कसे शिकता येईल?
५. सुधारणा आणि पूनरप्रयत्नः
अपयशाच्या विश्लेषणानंतर सुधारणा करून पुनः प्रयत्न करणे आवश्यक आहे.
- ध्येय पुन्हा निश्चित करणेः आपल्या उद्दिष्टांचे पुनरावलोकन आणि पुनर्निर्धारण करणे.
- नवीन योजनाः नवीन रणनीती आणि योजना तयार करणे.
- पाऊल उचलणेः डोळ्यासमोर उद्दिष्टे ठेवून त्यांना साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेणे.
६. फीडबॅक घेणेः
आपल्या कार्यक्षेत्रातील अनुभवी व विश्वासू व्यक्तीकडून फीडबॅक घेणे आणि त्याचा विचार करून त्यावर अंमलबजावणी करणे.
- सल्ला घेणेः अनुभवी व्यक्तींकडून सल्ला घेणे फार महत्त्वाचे आहे.
- सुधारणाः फीडबॅकच्या आधारे सुधारणा करून आणि घेतलेल्या सल्ल्याची अंमलबजावणी पुढील नियोजित कामामध्ये जर केली तर मागील अपयश धुवून पुढील भविष्य सुखकर करण्यासाठी विलंब होणार नाही.
७. आत्मविश्वास वाढवणेः
अपयशातून बाहेर पडताना आत्मविश्वास वाढवणे फार गरजेचे असते कारण बरेच तरुण अपयशाला कवटाळून नकारात्मक विचारसरणीकडे वळलेले असतात. यामध्ये दोष आपला नसतो, तर तो नियतीचाही असतो. पण याच दिवसांमध्ये आपल्याला स्वतःमधील आत्मविश्वास जागृत ठेवणं आणि स्वतःला खंबीर बनवणं फार आवश्यक असतं. त्यामध्ये खालील दोन गोष्टी आपल्याला सतत प्रेरणा देत असतात.
- यशाची आठवणः भूतकाळातील एखाद छोटं किंवा मोठ यश जर आपण नकारात्मक विचारांच्या काळात आठवलं तर, आपण त्या गर्तेतून आत्मविश्वास पुन्हा स्थापित करू शकतो. विचारांना आनंद देणाऱ्या गोष्टी आपल्याला सकारात्मक विचारधारा ठेवायला आणि स्वतःला प्रोत्साहित करायला कायमच उपयोगी पडतात.
- निष्कर्षः अपयशाचे विश्लेषण केल्याने आपल्याला आपले दोष, कमकुवत दुवे आणि सुधारणेच्या संधी समजतात. अपयशातून शिकून पुढे जाण्याची तयारी करणे हेच यशस्वी होण्याचे खरे तंत्र आहे. अपयश स्वीकारून, त्यातून योग्य धडा घेतल्यास, आपण भविष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो. चुका स्वीकारणं हे मानवी स्वभावाचे एक नैसर्गिक अंग आहे. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात अनेक वेळा चुका करत असते. चुका स्वीकारणे म्हणजे आपल्यातील दोषांना मान्यता देणे आणि त्यावर काम करण्याची तयारी असणे. हा दृष्टिकोन प्रगल्भतेचा आणि आत्मविकासाच्या पातळीचा दर्शक असतो. पण चुका स्वीकारण्याऐवजी त्यांना नाकारणे हे भित्रेपणाचे लक्षण असू शकते. जेव्हा व्यक्ती चुकांची जबाबदारी घेत नाही आणि त्या नाकारते, तेव्हा ती आपली कमतरता दडवण्याचा प्रयत्न करत असते. हा नकारात्मक दृष्टिकोन आत्मसुधारणेच्या मार्गात अडथळा ठरतो. अशा व्यक्तींच्या मानसिकतेत आत्मचिंतनाची आणि प्रामाणिकतेची कमतरता असते, ज्यामुळे त्यांनी त्यांच्या चुका सुधारण्याची संधी गमावली असते.
चुका स्वीकारणं म्हणजे स्वतःच्या कमकुवतपणाची आणि मर्यादांची जाणीव होणे. यातून आपण स्वतःला सुधारण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची आणि पुढील प्रयत्न अधिक प्रभावी करण्याची संधी प्राप्त करतो. नकारात्मकता आणि भित्रेपणाच्या पलीकडे जाऊन, प्रामाणिकपणे चुका स्वीकारणे हेच आत्मविकासाच्या आणि यशस्वी होण्याच्या मार्गावर एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
सारांशात, चुका स्वीकारणे म्हणजे खरेपणाचे आणि समजुतीचे लक्षण आहे, ज्यामुळे आपण अधिक सक्षम आणि प्रगल्भ होतो. चुकांवर पांघरून ठेवण्याऐवजी, त्यांचा सामना करणे आणि त्यातून शिकणे हे जीवनाच्या यशाच्या पथावर निःसंशय महत्त्वाचे आहे.
जो व्यक्ति अपयश आणि चुका स्वीकारू शकत नाही त्याला आपली वेळ बदलण्यासाठी.. संघर्ष करण्याची उर्मि, जिद्द कधीच जागृत होत नाही”
३. ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत.
शेकडो वर्षांपूर्वी एक सोळा सतरा वर्षांचं कोवळ पोर बादशाहाच्या गुलामगिरीला आव्हान देऊन रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतो आणि, सबंध हिंदुस्थानाला ‘स्वराज्य’ काय असतं याची ओळख करून देतो, नंतर हाच कोवळा पोरगा ‘छत्रपती शिवाजी महाराज’ ह्या नावाने अनंत काळासाठी अजरामर होऊन जातो. त्यांची युद्धनीती, रणनीती, मुत्सद्देगिरी ह्याबद्दल लिहिलं जातं.., बोलल जातं .. आणि, चर्चा केल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने बोललं जातं ते म्हणजे त्यांच्या धाडसाबद्दल.
धाडस, अशी गोष्ट, एक अशी भावना जी गवताच्या पात्याला तलवारीची धार आणते अन पर्वताच्या शिखरालाही छोटं करून टाकते. हे धाडस उत्पन्न कसं होत, त्याच मुळ काय असतं? तर धाडस असतं, आपल्या विचारांमध्ये, आपल्या कृतीमध्ये. आज तरुणांमध्ये काहीतरी करून दाखवायची उर्मि आहे.. पण, त्या उर्मिला सत्यात उतरविण्यासाठी निर्णयक्षमता नाही, किंबहुना तो निर्णय घेण्याचं धाडसच नाही. जर आपण घेतलेला निर्णय चुकला.. तर, आपल्या निर्णयाने काही चुकीच घडल तर.? ह्याच जर तरच्या दोरखंडांनी आपल्याला बांधून ठेवल.. तर, आपण कुठलीही गोष्ट करण्याचं धाडस करू शकत नाही. याच धाडसाची एक गोष्ट आहे.. ही गोष्ट आहे प्रचंडगडाची.. म्हणजेच, आपल्या तोरणा किल्ल्याची. इनायत खान नावाचा क्रूर सरदार तेव्हा तोरण्याचा किल्लेदार होता. धिप्पाड देहयष्टि, एका घावात शत्रूचे दोन तुकडे करणारा. शिवरायांनी स्वराज्याची मुहर्तमेढ तोरण्यापासून करायचं ठरवलं. का? तर.. जिंकण्यासाठी अन चढाईसाठी तोरणा हा अतिशय अवघड किलला. पण जिजाबाईंचा अन शहाजीराजांचा हा लेक मोठा बहाद्दर! आपल्या सवंगड्यासोबत शिवबाने किल्ला सर केला, १६-१७ वर्षांची कोवळी पोरं ही.., पण धाडस करण्याची हिंमत त्यांच्यात होतीच. यशाचा पहिला नियम असतो तो म्हणजे, फक्त आणि फक्त लढाई..! आणि, ही लढाई रणांगणापूर्वी मनांगणात लढली जाते.. आणि, जी शिवरायांनी सर्वात पहिली लढली होती. ज्यांना जिंकायचं असतं त्यांनी अपयशाचा विचार करायचा नसतो… विचार करायचा असतो तो फक्त आणि फक्त उद्दिष्टाचा. आपलं उद्दिष्ट जर पारदर्शी आणि लोकहिताच असेल तर नक्कीच त्यात यश मिळतच.. फक्त त्यात आपण पहिलं पाऊल टाकण्याच धाडस करावं लागत.
एखादा व्यवसाय करण्याआधी जेव्हा आपण ठरवतो की, अमुक अमुक व्यवसाय करायचाय..! तेव्हा, आपण फक्त व्यवसाय करायचा आहे इतकच ठरवलेलं असतं, पण तो तत्सम व्यवसाय करण्यासाठी लागणार कौशल्य, अनुभव हे सगळं जोपासण्याची आपली तयारी नसते आणि तिथेच आपण फसतो. वरती जे तोरणा किल्ल्याच उदाहरण आपण घेतलं त्यातून आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे संयम! कारण, धाडसाला जेव्हा संयमाची जोड असते ना.. तेव्हा, प्रतिकूल परिस्थितीत घेतलेला निर्णय आपल्याला वेगळी ओळख देऊन जातो. जर तेव्हा शिवरायांनी आपण भले… अन, आपली जहागीरी भली.. हा विचार केला असता तर स्वराज्य उभ राहिलच नसतं. आणि आज आपण ज्या काही शिखर सर करण्याच्या चर्चा करतोय त्यांचा विचारही करू शकलो नसतो. तोरणा किल्ला काय एका रात्रीतुन राजांनी सर केला नव्हता.. तर, तो सर करण्या अगोदर किल्ल्याचा अभ्यास केला… युद्धनीतीचा पुरेपूर सराव केला.. आणि, त्यानंतरच त्यांना गड जिंकता आला. कारण यश हे एका रात्रीमध्ये नक्कीच मिळतं, पण ती एक रात्र येण्यासाठी अगोदर शंभर रात्र जागून मेहनत करण्याची तयारी असावी लागते. धाडस हे कधी अविचारी नसावं.., धाडस आणि मूर्खपणा ह्यामध्ये एका पातळ रेषेचा फरक आहे. आणि, तो आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवा. जीवनात कुठलेही धाडसी निर्णय घेताना परिस्थितीचं पूर्वावलोकन करणं खूप आवश्यक असतं, मुळात म्हणजे व्यवसायात येण्याचा निर्णय घेण्याच धाडस ज्याच्यात असतं तोच व्यवसाय उभा करू शकतो, आपल्याकडे एक खूप चुकीचा समज आहे की व्यवसाय म्हणजे फक्त दुकान किंवा एखाद्या काऊंटरवर बसून गल्ल्यात येणारा पैसा मोजणे इतकच. पण खरं तर असं काहीच नसतं, एखादा रिक्षा चालवणारा व्यक्तीही उद्योजक आहे आणि करोडोंचे व्यवहार करणारा व्यक्तीही उद्योजक आहे. व्यवसाय करताना आपण स्वतः त्यामध्ये काय गुंतवणूक करतो हे बघणे महत्वाचे ठरते. गुंतवणूक ही काय फक्त आर्थिक नसते, आपलं ज्ञान जेव्हा कृतीत उतरते तेव्हा त्यातून मिळणार उत्पन्न ही सुद्धा मोठी गुंतवणूक असते. कारण व्यवसाय हा कुठल्याही गोष्टीचा होऊ शकतो. पण तो व्यवसाय करताना आपल्याला आधी बोलता यायला.. म्हणजेच, आपली वस्तु विकता यायला पाहिजे. तुमची वस्तु जर करोडो रुपयांची असेल पण तुम्हाला जर त्या वस्तूबद्दल सांगताच येत नसेल तर ग्राहकासाठी त्या वस्तूचे मोल हे मातीप्रमाणे होऊन जात त्यामुळे कुठलाही व्यवसाय करावयाच धाडस करताना अगोदर आपल्याला जे विकायच आहे त्याबद्दल संपूर्ण आणि सखोल माहिती असायलाच हवी. आता पुन्हा एकदा शिवरायांकडे वळूया.., शिवराय हे काही फक्त लढाई पुरते किंवा ठराविक प्रसंगांपुरते मर्यादित नव्हते. शिवरायांची एक रणनीती होती, इंग्रजी भाषेत तिला ‘SWOT’ असं म्हणतात. ह्या ‘SWOT’ चा उपयोग करून व्हिएतनामने कित्येक वर्ष अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला झुंझवत ठेवलं. या शब्दाची फोड केल्यावर Strengths, Weakness, Opportunities & Threat Analysis हे शब्द तयार होतात. आता या शब्दांची खरी अंमलबजावणी आयुष्यात कशी करायची हे आपण समजून घेऊया.
- Strengths :-
म्हणजेच शक्ति किंवा जमेच्या बाजू. समाजामध्ये अथवा दैनंदिन जीवनामध्ये आपण काहीतरी नवीन आणि प्रभावशाली करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्याकडे क्षमता अन् सामर्थ्य असणं फार आवश्यक असतं. तथापि या क्षमता आणि सामर्थ्याची सर्वात मोठी ताकद असते ती म्हणजे आपली सकारात्मक विचारांची कास. ज्याच्यामध्ये सकारात्मक विचार करण्याची आणि आलेल्या आव्हानांना भेदण्याची उर्मी जागृत असते त्याचा जीवनरथाचं चक्र कुरुक्षेत्रामध्ये कधीच धसू शकत नाही. या स्पर्धेच्या युगात आपलं अस्तित्व टिकवायच असेल तर आपल्याला सामर्थ्यवान व्हावेच लागेल.. कारण, जग हे सामर्थ्यशाली व्यक्तीसमोर नतमस्तक होतं असतं, दुर्बलतेपुढे मुळीच नाही. मग हे सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीमध्ये खालीलप्रमाणे असू शकतं.
१. सकारात्मक दृष्टिकोन.
२. कठोर परिश्रम घेण्याची तयारी.
३. जबाबदारीचं भान.
४. आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याचं सामर्थ्य.
५. जिज्ञासू वृत्ती.
६. संभाषण कौशल्य.
- Weakness :-
अर्थात कमकुवतपणा. या जगामध्ये जन्माला आलेली कोणतीही व्यक्ती परिपूर्ण मुळातच नसते, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमतरता या असतातच. साधारणतः त्या कमतरता आपल्या लक्षात येत नाही.. किंबहुना त्या कमतरता आपण स्वीकारायला मानसिकरित्या तयार नसतो. व्यक्ती परिपूर्ण होतो तो त्याच्यातल्या कमकुवतपणावर मात केल्यानंतरच. कदाचित आपण या कमकुवतपणात इतके गुरफटून जातो की आपण आपले सामर्थ्य विस्मरणात नेऊन ठेवतो. जेव्हा आपण समाजात किंवा आयुष्याच्या लढाईमध्ये उतरतो तेव्हा आपण एक खबरदारी घेतली पाहिजे.., अन् ती म्हणजे आपल्यातली कमतरता (Weakness) समोरच्याच्या सामर्थ्याची बाजू बनायला नको. पण आपल्याला मात्र जिंकायचं असेल तर समोरच्याच्या कमकुवत बाजू कुठल्या याचा मात्र पुरेपूर अभ्यास असायलाच हवा. कारण भगवदगीतेमध्ये सुद्धा हेच सांगितल आहे. की युद्ध जिंकायचं असेल तर प्रथमतः आपल्या कमकुवत बाजू भरभक्का अवस्थेत न्यायला हव्या. मग त्या कमकुवत बाजू कुठल्या, तर त्या खालीलप्रमाणे देखील असू शकतात.
१. गोष्टींकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन.
२. मोह म्हणजेच एखाद्या व्यक्तीसोबत, एखाद्या भौतिक गोष्टीशी असलेल अनावश्यकरित्या जोपासलेली अटॅचमेंट.
३. परिस्थितीशी जुळवून न घेता जबाबदाऱ्या झटकणे.
४. सतत दोष देत राहणे.
५. मर्यादेच्या बाहेर अतिविचार करून कल्पनेतच अडचणी वाढवणे.
६. अनुभवाची कमतरता व आळशीपणा.
- Opportunities :-
म्हणजे संधी. बऱ्याचदा आपण म्हणतो त्यावेळी संधी होती पण अमुक अमुक गोष्ट नसल्यामुळे ती संधी हुकली वैगरे वैगरे.. पण, वास्तविक पाहता आपण त्या संधीला शेवटची संधी म्हणून बघितलेलच नसतं. त्यामुळेच कदाचित आपण नंतर त्या संधीला गमावून बसलेलो असतो. मुळात संधी या आपल्यातल्या क्षमता आणि आपल्यातल्या कमतरता बघूनच निर्माण झालेल्या असतात. आपले शिक्षण, अनुभव, आत्मविश्वास, क्षेत्रकार्य यावर आधारित आपल्याला संधी मिळत असते. त्याचप्रमाणे आपल्या सभोवताली काय घडते आहे, यावर आधारित असलेल्या संधी सुद्धा निर्माण होऊन त्या आपल्याजवळ येतात. इतकच नाही तर अवतीभवती असलेल्या समस्या, समाजजीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या अन् त्या समस्यांवर आपण काय तोडगा काढू शकतो?, त्यावर काय? उपाय काढू शकतो.. अश्या संधी शोधणं देखील गरजेचं आणि महत्वाचं असतं. खर तर संधी म्हणजे आपल्याला आलेली अडचण आणि त्यावर आपण काढलेला मार्ग किंवा उत्तर हे समीकरण ज्याला अंगीकारता आलं त्यालाच संधीच सोनं करता आलं.
- Threat :-
अर्थात धोका किंवा संकट अथवा अडथळे. तसं बघायला गेलं तर ज्याच्या आयुष्यात संकटं नाही, अडथळे नाहीत त्यांना जीवन जगण्याची कलाच अवगत नाही असं म्हणायला हरकत नाही. दैनदिन जीवनात आपल्याला अनेकविध अडथळ्यांना सामोरं जावं लागतं, पण आपण म्हणतो का? की आपलं जीवन निरर्थक आहे म्हणून. नाही ना! महाभारत घ्या किंवा रामायण घ्या, सर्व मनुष्य अवतारी देवांना वेगवेगळ्या अडथळ्यांचा सामना करावाच लागला. पण ही मंडळी सगळी अधर्माच्या विरोधात लढत होते म्हणूनच तश्या परिस्थितीला त्यांना तोंड द्यावं लागलं. मग तुम्ही आम्ही तर फक्त माणसं आहोत, आपल्याला तरी ही संकटं दूर ठेवतील. परंतु, ज्यांना संकटाला सामोरं जाता येतं तोच खर सामर्थ्यशाली व्यक्ती जगाच्या पटलावर स्वतःचा इतिहास लिह शकतो. कारण, जग दुर्बल विचारांच्या माणसांना चीरडत जाण्याइतकं नक्कीच क्रूर आणि भावनाहिन आहे. या जगात तोच टिकतो जो अडथळ्यांना भेदण्यासाठी जन्माला आलेला असतो.
धाडस हे धोक्याला जन्म देतं आणि ज्याच्यात धोके पत्करण्याची क्षमता असते तो स्वतःच नाव काळाच्या दगडावर अधोरेखित करून जातो. आणि, धोके कुठे नसतात? घरातून बाहेर पडल की आपण संध्याकाळी घरी येऊ की नाही याची शाश्वती नसते.. पाणी पिताना कधी उचकी लागेल आणि आपलं हृदय बंद पडेल.., पायऱ्या उतरताना पाय घसरला आणि आपण पडून कपाळमोक्ष होऊ… हे सुद्धा क्षणाक्षणाला भीती उत्पन्न करणारे धोकेच आहेत.. पण, म्हणून आपण कधी या गोष्टी करणं टाळतो का? तर, नाही.., बरोबर? मग आपण जीवनात काही उद्देश मिळवायचं असेल तर मग का घाबरतो? आपण शेवटी या भूतलावर कोणीही शाश्वत जीवनाचं बाळकडू घेऊन जन्माला आलेलं नाही. मग का आपण मोहाच्या भानगडीत पडायचं. त्यापेक्षा आपण धाडस करत धोके पत्करत आयुष्य इतकं मोठं करायचं की मेल्यानंतर सुद्धा आपल्या कार्याची गाथा लोकांच्या किश्श्यांमध्ये, गोष्टींमध्ये आणि आठवणीमध्ये घर करून गेली पाहिजे.
धाडस करणे हे नैसर्गिक वरदान आहे, कारण ते आपल्याला आव्हानांचा सामना करण्याची क्षमता प्रदान करते. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी नवीन करण्याची, अज्ञात क्षेत्रात पाऊल ठेवण्याची इच्छा असते. धाडसामुळे आपण नवनवीन संधींचा स्वीकार करतो आणि त्यातून आपल्याला नवीन अनुभव मिळतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने व्यवसाय सुरू करण्याचे धाडस केल्यास, तो अनेक अडचणींचा सामना करूनही त्यातून शिकतो आणि त्याच्या आत्मविश्वासात वाढ होते. धाडसाच्या बळावरच जगातील अनेक महान शोध लागले आहेत.. आणि, अनेक क्रांतिकारक बदल घडवून आणले गेले आहेत.
धाडस हा गुण आपल्याला अडचणींवर मात करण्याची ताकद देतो. जीवनात येणाऱ्या विविध संकटांना तोंड देण्यासाठी धाडस आवश्यक आहे. धाडसामुळे आपली निर्णयक्षमता वाढते.. आणि, त्यामुळे संकटसमयी योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते. जेव्हा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत धाडसाने तोंड द्यावे लागते, तेव्हा आपल्याला आपले सामर्थ्य आणि कौशल्ये अधिक चांगल्या प्रकारे कळतात. धाडसानेच आपल्याला अडथळे पार करण्याची प्रेरणा मिळते आणि आपली यशाची शक्यता वाढते.
धाडस आपल्याला स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रेरित करते. धाडसामुळे आपण आपल्या ध्येयांच्या दिशेने निःशंकपणे पाऊले उचलतो. हा गुण आपल्याला धैर्याने नव्या गोष्टींना सामोरे जाण्यास मदत करतो, ज्यामुळे आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. धाडसामुळेच आपण मोठमोठी आव्हाने पेलू शकतो आणि आपल्या क्षमतांची परिक्षा घेऊ शकतो. जीवनात कितीही अडचणी असल्या तरी, धाडसाच्या बळावर आपण त्यांना पार करून आपल्या ध्येयांच्या दिशेने वाटचाल करू शकतो. यामुळेच धाडस करणे हे खरेच एक नैसर्गिक वरदान आहे.
या जगात हिमतीलाच महत्त्व आहे, कारण हिमतीनेच माणूस आपल्या जीवनातील विविध आव्हानांना तोंड देऊ शकतो आणि यशस्वी होऊ शकतो जीवनात येणाऱ्या अडचणी, समस्या, आणि संकटांचा सामना करण्यासाठी हिमतीची गरज असते. यशस्वी होण्यासाठी, आत्मविश्वास, दृढ निश्चय, आणि मेहनतीची साथ असणे आवश्यक आहे.
हिमतीचे महत्त्वः
- आव्हानांचा सामनाः
जागृत झालेल्या हिमतीमुळे माणूस कोणत्याही आव्हानांचा सामना धैर्याने करतो. एखादी समस्या कितीही मोठी असो, हिमतीने ती सोडवता येते. जीवनात येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी हिमतीची गरज असते. जसे समुद्रात जहाज चालवताना वादळं येतात, तसंच जीवनातही अनेक वादळं येतात, पण हिमतीनेच आपण त्या वादळांना पार करू शकतो.
- अपयशाचा सामनाः
अपयश हा यशाच्या मार्गावरील एक टप्पा आहे. अपयश आले तरीही खचून न जाता, जिद्दीने पुढे जाणे महत्त्वाचे आहे. जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीने अपयशाचा सामना केला आहे, पण त्यांनी कधीही हिंमत सोडली नाही. अपयशातून शिकून, नव्या उमेदीनं प्रयत्न करणं ही साहसाचीच निशाणी आहे.
- स्वप्नांची पूर्तताः
आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी हिंमतीची गरज असते. स्वप्नं मोठी असोत वा लहान, त्यांना साकारण्यासाठी मेहनत, धैर्य, आणि सातत्य आवश्यक आहे. हिमतीने आपण आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवू शकतो. जसे एखादा शिल्पकार आपल्या कल्पनेला साकार रूप देण्यासाठी कठोर मेहनत करतो, तसेच आपणही आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी हिमतीने प्रयत्न केले पाहिजेत.
- नवीन संधींचा स्वीकारः
जीवनात अनेक संधी येतात, पण त्यांचा स्वीकार करण्यासाठी हिमतीची गरज असते. नवीन संधींमध्ये नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते, पण त्यासाठी धैर्याची आवश्यकता असते. हिमतीने नवीन गोष्टी स्वीकारल्यास, आपण आपले कौशल्य वाढवू शकतो आणि जीवनात प्रगती करू शकतो.
- समाधान आणि आनंदः
हिमतीने जगणाऱ्या व्यक्तीला खऱ्या समाधानाचा आणि आनंदाचा अनुभव येतो. जीवनात कितीही अडचणी येवोत, हिमतीने त्यांचा सामना केल्यास आपल्याला खऱ्या अर्थाने आनंद मिळतो. हिमतीने आपण आपले लक्ष्य साध्य करू शकतो आणि जीवनाचा खरा आनंद घेऊ शकतो.
हिमतीनेच माणूस जीवनात प्रगती करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. आव्हानांचा सामना, अपयशावर मात, स्वप्नांची पूर्तता, नवीन संधींचा स्वीकार, आणि खरा आनंद यासाठी हिमतीची गरज आहे. म्हणूनच, या जगात हिमतीलाच महत्त्व आहे. हिमतीनेच आपण आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी आणि आनंदी होऊ शकतो. हिमतीच्या मार्गावर चालत राहा.., कारण, हिमतीनेच यश तुमचं होणार आहे.
धाडस व साहस हे जीवनातील यशस्वी होण्याच्या प्रवासातील अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत. धाडस आपल्याला आव्हानांचा सामना करण्याची क्षमता देतो, तर साहस आपल्याला त्या आव्हानांना तोंड देण्याची शक्ती प्रदान करतो. दोन्ही गुण एकमेकांची पूरक असून, त्यांच्या सहाय्यानेच आपण आपल्या ध्येयांच्या दिशेने निःशंकपणे पाऊले उचलू शकतो. जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करून, नव्या संधींचा स्वीकार करून, आणि आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कार्यरत राहूनच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो. म्हणूनच, धाडस व साहस हे खऱ्या अर्थाने जीवनातील नैसर्गिक वरदान आहेत, ज्यांच्या सहाय्याने आपण आपले जीवन अधिक सुदृढ, यशस्वी आणि आनंदी बनवू शकतो.
४. वेळ प्रत्येकाची येते!
आजवर प्रत्येक व्यक्ती हा वाईट वेळेच्या काळातून गेलेला असतो किंवा जाणार असतो कारण आयुष्यात आलेले चढउतार हे लढवय्या माणसाचा श्रृंगार आहे. वेळ कोणतीही असो, चांगली किंवा वाईट ती जास्त दिवस टिकत नाही. फक्त वाईट वेळेमध्ये संयम नावाचा बर्फ जर आपल्या डोक्यावर ठेवला तर चांगल्या वेळेमध्ये त्याच बर्फाचा मुकुट तयार व्हायलाही वेळ लागत नाही. पण वाईट दिवसांमध्ये केलेला संघर्ष हाच आपल्या जवळच्या लोकांचे खरे स्वभाव आणि चेहरे आपल्याला दाखवत असतो. पण जेव्हा त्या परिस्थितीवर मात करून आपण संघर्षाचं मैदान गाजवून त्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर झेंडा गाडतो तेव्हा त्याच लोकांना आपल्याला डोक्यावर घेऊन नाचायलाही वेळ भाग पाडते.
वर्ष होतं १९९८ चं. टाटा मोटर्स प्रचंड तोट्यात गेली होती. ना गुंतवणूकदार मिळत होते ना व्यवसायाला काही चालना. टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली ‘इंडिका’ ही गाडी प्रचंड घाट्यात गेली होती. टाटा मोटर्सने एका वर्षाच्या आत हे प्रॉडक्शन यूनिट बंद करण्याचा निर्णय घेतला. आता प्रश्न होता तो टाटा मोटर्स खरेदी कोण करणार याचा? १९९९ मध्ये रतन टाटा यांनी फोर्ड मोटर्सचे चेअरमन बिल फोर्ड यांच्याकडे टाटा मोटर्सची पॅसेंजर कार विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला, त्यावेळी बिल फोर्ड यांनी रतन टाटांना ‘जर तुम्हाला पॅसेंजर कारच्या बाबतीत काही कळत नाही तर हा व्यवसाय केलाच कशाला?’ असं बोलून नकार दिला हा अपमान टाटांच्या जिव्हारी लागला आणि त्याच क्षणी त्यांनी पॅसेंजर कारचं युनिट विकायचा निर्णय रद्द केला. पुढे काही वर्षातच टाटांनी पॅसेंजर कारमध्ये बरीच मजल मारली आणि टाटा देशातले सर्वात विश्वसनीय असे ब्रँड बनले.
पुढच्या नऊ वर्षात मात्र फोर्ड कंपनीच दिवाळं निघाल. तेव्हा बिल फोर्ड यांनी टाटांना फोर्ड कंपनी विकत घेण्याची विनंती केली. आज फोर्डच्या जॅग्वार आणि लँड रोव्हर ह्या युनिटची मालकी टाटांनी मोठ्या थाटात मिळवली आहे.
सांगण्याचा उद्देश काय..? तर…, एखाद्याच्या वाईट काळात आपण कोणाचा अपमान करू नये, कारण वेळ ही खूप ताकदवान असते आणि जेव्हा ती बदलते तेव्हा रंकाचा राव आणि रावाचा रंक नक्कीच करते. आपल्या आयुष्यात जेव्हा काही कारणास्तव चुका होतात तेव्हा आपल्यालाही अश्या अपमानांचा सामना करावा लागतो, मग तेव्हा दोष आपल्या सोबत आपल्या कामालाही दिला जातो. हे करत असताना सर्वात अगोदर आपली मानसिकता सक्षम असायला हवी. लोक कोणाला नावे ठेवत नाहीत? लोक न पाहिलेल्या देवालाही नाव ठेवतात, त्यांच्या आई वडिलांनाही नावे ठेवतात, ते स्वतःलाही नावे ठेवतात. तेव्हा ह्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करायला हवं. माणसाच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतात, पण ह्या प्रसंगातून आपण मार्ग कसा काढायचा हे शिकायला पाहिजे, निरनिराळ्या प्रयोगांचा अवलंब करायला शिकलं पाहिजे.
आपल्या अवतीभवतीच अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यामुळे आपण वेळेवर विश्वास ठेवायला शिकतो जसं की सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर असलेला ‘अंकित बैनपुरिया’. एका गावातला साधारण शेतकरी कुटुंबातला एक तरुण ज्याने सोशल मीडियावर त्यांच्या दैनंदिन जीवनाचे व्हिडिओ पोस्ट करून वेगवेगळे चॅलेंज स्वीकारले आणि तो तरुण एक उत्तम असा प्रेरणास्त्रोत नवयुवकांसाठी बनला. त्याने त्या प्रयत्नांत सातत्य टिकवून ठेवल आणि एक दिवस त्याच्या ह्या कार्याची दखल घेऊन स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याच्यासोबत एक दीर्घ लांबीचा व्हिडिओ बनवला. संपूर्ण देशाचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं, त्याच्या फिटनेसच्या माध्यमातून लोकांना व्यायामाच महत्त्व त्याने जगाला दाखवून दिलं. की.., मोठमोठ्या जिम आणि डाएट शिवाय सुद्धा आपण तंदुरुस्त राहू शकतो. तसच नागपूरचा ‘डॉली चायवाला’. सुरुवातीला त्याच्या व्हिडिओजना लोकांनी क्रींज म्हणून ट्रोल केलं.. पण, जेव्हा जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती ही बिरुदावली असलेला व्यक्ती म्हणजे ‘बिल गेट्स’ यांनी त्याच्या टपरीवर जाऊन चहा पिला त्यानंतर लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. सांगण्याच एकमात्र तात्पर्य काय? की आपण कोणाच्याही वर्तमानाला अनुसरून त्याच्या भविष्याच्या गोष्टींवर टीका करू नये. कळत नकळत आपण ह्या गोष्टी रोजच्या आयुष्यात करत असतो.
पोलीस भरती करणारे तरुण, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक हे काहीतरी मिळवण्यासाठी, ध्येय प्राप्त करण्यासाठी धडपडत असतात. पण त्यांना आजूबाजुकडून मिळणारे टोमणे, निंदा, टीका यामुळे ही मंडळी खचून जातात.. पण, जेव्हा ते एखादी पोस्ट काढतात तेव्हा मात्र त्यांच्या मिरवणुका नाचवायलाही हीच मंडळी असतात. आपण आपल्या वाईट वेळेत काय ठरवतो हे मात्र महत्वाचं..! आपण जर वाईट वेळेत फक्त नकारात्मक विचार करत बसलो तर, कदाचित आपल्या कृतिशीलतेला ब्रेक लागतो. मग सतत त्याच विचारांमध्ये आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. हा आत्मविश्वास टिकवून ठेवणं वाईट वेळेत आपल्याला शिकायला हवं, मग ते कसं शिकणार? तर.. या काळात आपण नुसत्या चर्चा करण्यापेक्षा कृतीवर भर द्यायला पाहिजे. आपण काय चांगलं करू शकतो याचा परिपूर्ण अभ्यास करायला पाहिजे. एखाद्याला कला क्षेत्रात यायच आहे तर त्याने त्या क्षेत्रात काय उत्तम देऊ शकतो हे ओळखायला हवं. गाता येतं.., तर, त्याचं व्यावसायिक शिक्षण घ्यायला हवं, उत्तम भाषण करता येत.. तर, त्याने बोलायला शिकावं. व्यवसाय करायचा आहे तर प्रथम त्या व्यवसायात आपण वेगळेपण आणून त्या व्यवसायाला मोठ करण्यासाठी बारकाव्याचा अभ्यास करायला हवा.
खूप वेळा आपण आपल्या वेळेबद्दल तक्रारी करत सुटतो.., दोष देतो.., आधी ते बंद करायचं. कारण आपल्याला टोमणे मारणारे आणि स्वतःला दोष देणारे एकाच माळेचे मणी आहेत. जग ज्यांना नाव ठेवतं.. त्यांना जर, आपण नाव ठेवले तर आपण वेगळं काहीच करत नाही. पण ज्याला कोणीच नाव ठेवत नाही.. त्याला जर आपण नाव ठेवत असू तर आपण आधी स्वतःमध्ये काय कमी आहे हे बघायला पाहिजे. जोपर्यंत आपल्या विचारांमध्ये शिखर गाठण्याची तीव्रता येत नाही तोपर्यंत तरी आपण वेळ बदलवू शकत नाही. काही जण म्हणतात की नशीब जे देईल ते आपण स्वीकारावं. पण.., नशीब आणि दैवही तेव्हाच काही देत जेव्हा आपल्या प्रयत्नात पूर्ण जीव ओतून काम करतो. ध्यानीमनी., दिवसा.. रात्री.. फक्त ध्येय प्राप्तीचा जो ध्यास ठेवतो खर यश त्याच्याच पदरी पडतं.. आपल्याला सांगितलं जातं की, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.. तसच.. कष्ट केल्याशिवाय वेळ बदलत नाही. कष्ट करताना आपण डोळ्यासमोर कोणाचा आदर्श ठेवतो हे बघणंही महत्वाचं ठरतं. एखाद्याकडे जर लाखोंचा व्यवसाय असेल तर आपण क्षणात त्यांच्या यशाच्या पातळीवर नाही जाऊ शकत. पण.. त्याने केलेल्या कष्टाच्या.., मेहनतीच्या.. मार्गावर विश्वास ठेवून स्वतःच्या कल्पना सत्यात मात्र नक्की उतरवू शकतो. आदर्श ठेवताना यशस्वी व्यक्तीपेक्षा अपयशी होऊन यशस्वी झालेल्या व्यक्तीचा ठेवावा. कारण जो सुरूवातीला अपयशी झालेला असतो., त्याच्याकडे काय नाही करायचं याचा दांडगा अनुभव गाठीशी असतो.., आणि… तोच व्यक्ती भविष्यात यशाची चव चाखू शकतो. संघर्षाच्या काळात सर्वात महत्वाची एक अशी गोष्ट अंगीकारायला पाहिजे ती म्हणजे इतरांना कमी लेखण टाळलं पाहिजे. आपल्याला संघर्षाचा काळ इतका शांत आणि घडणावळीचा असावा की त्या संघर्षाच्या शेवटी मिळणारं यश हे समस्त भूतलावर डंका वाजवत राहील.
वाईट परिस्थिती आणि कठीण वेळा जीवनात अपरिहार्य असतात. पण.., त्या आपल्या आत्मविश्वासाची आणि धैर्याची खरी परीक्षा घेतात. अशा क्षणी आपण हार मानून थांबतो की… धैर्याने त्यांचा सामना करतो हेच आपल्या यशाचे गमक ठरते. वाईट परिस्थितीतूनही प्रेरणा घेता येते आणि त्यातून शिकता येते. जसे सोनं तावातून पार होतं तसं माणूसही कठीण परिस्थितीतून पार होतो आणि अधिक मजबूत होतो. एखाद्या संकटाचा सामना करताना आपल्याला आपल्या आतल्या शक्तींची जाणीव होते. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या क्षमतांवर आणि ध्येयावर विश्वास ठेवून, अखंड प्रयत्न करत राहण्याची गरज असते.
वाईट वेळा आणि अडचणी येणं म्हणजे आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो, ज्यातून आपल्याला जीवनातील खऱ्या यशाचा अर्थ समजतो. या काळात मिळालेली शिकवण आपल्याला जीवनभर कामी येते. उदाहरणार्थ, अब्राहम लिंकन यांच्या जीवनात आलेल्या अपयशांची श्रृंखला.. पण.., त्यांनी कधीही हार मानली नाही. प्रत्येक अपयशाने त्यांना काहीतरी नवीन शिकवलं आणि त्यातून त्यांना अधिक धैर्याने, आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. अखेर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आणि त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले.
वाईट परिस्थिती आणि वेळ ही आपल्याला आपली खरी क्षमता ओळखायला लावते. एखाद्या वादळातून बाहेर पडताना, आपण ज्या प्रकारे त्याचा सामना करतो, त्यातून आपल्याला आपली ताकद समजते. हा काळ आपल्याला अधिक संयमी.., सहनशील.., आणि.., शहाणे बनवतो. या काळात आपण केलेले प्रयत्न आणि घेतलेले निर्णय हेच आपल्याला भविष्यात यशस्वी होण्यासाठी आधार बनतात. जसे नदीच्या प्रवाहातले खडे घासून गुळगुळीत होतात, तसेच जीवनाच्या प्रवाहात आलेल्या वाईट वेळा आपल्याला घडवतात.
वाईट परिस्थितीतूनच खरे नायक निर्माण होतात. जेव्हा आपण अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करतो, तेव्हा आपल्याला यशाचा खरा आनंद मिळतो. वाईट वेळ ही जीवनाचे कटू सत्य आहे. पण.., त्यांचं महत्त्व ओळखून त्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून सामना केला.. तर, आपल्याला खरे यश मिळते. म्हणूनच, वाईट परिस्थिती आणि वेळ येणं हे आपल्याला अधिक मजबूत, शहाणे आणि यशस्वी बनवण्यासाठी एक संधी आहे. या परिस्थितीतूनच आपल्याला खऱ्या यशाचा मार्ग सापडतो आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळते.
‘वेळ प्रत्येकाची येते..!’ या वाक्यात एक जीवनाचा सत्य आणि गहन तत्त्वज्ञान दडलेले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक असा क्षण येतो जेव्हा त्यांचे कष्ट.., धैर्य.., आणि, समर्पण त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवतात. या वाक्याने आपल्याला शिकवणूक मिळते की, कोणतेही कार्य करताना आपण धीर सोडू नये. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते. ही वेळ कधी येईल हे निश्चित सांगता येत नाही, परंतु प्रयत्न आणि धैर्य ठेवल्यास ती वेळ नक्कीच येते.
जीवनात अनेक प्रसंग येतात.. जेव्हा, आपल्याला वाटते की.., आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला यश मिळत नाही. अशा परिस्थितीत आपल्याला या वाक्याची आठवण करून देणे आवश्यक आहे. मोठमोठ्या यशस्वी लोकांच्या जीवनात देखील असे अनेक प्रसंग आले आहेत.. जेव्हा, त्यांनी अपयशाचा सामना केला, परंतु त्यांनी हार मानली नाही. उदाहरणार्थ, थॉमस एडिसनने दिवा शोधण्यासाठी हजारो प्रयोग केले.. पण, शेवटी त्याला यश मिळाले. त्यांच्या यशाचा क्षण आलाच. त्यामुळे आपल्यालाही संयम बाळगून सातत्याने प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे.
समाजात असेही अनेक लोक आहेत ज्यांनी आपली वेळ येईपर्यंत सतत संघर्ष केला आहे. उदाहरणार्थ, लेखक जे.के. रोलिंगने “हॅरी पॉटर” मालिकेच्या पुस्तकांची प्रकाशने नाकारल्यानंतरही हार मानली नाही. अनेक प्रकाशकांनी तिचे काम नाकारले, परंतु तिने धीर धरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तिची वेळ येताच, तिच्या कादंबऱ्या जगभरात प्रसिद्ध झाल्या आणि तिने अपार यश मिळवले. यावरून हे स्पष्ट होते की, वेळ प्रत्येकाची येते, फक्त त्यासाठी आपल्याला संयम आणि धैर्य आवश्यक आहे.
अखेरीस, “वेळ प्रत्येकाची येते..!” या वाक्यातील तत्त्वज्ञान आपल्याला धीर, संयम, आणि आत्मविश्वास शिकवते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्यांचा सामना करण्याची शक्ती आपल्यात असली पाहिजे. आपली वेळ नक्की येईल यावर विश्वास ठेवून आपल्याला सातत्याने प्रयत्न करीत राहावे लागते. आपले ध्येय स्पष्ट ठेवून, आपले प्रयत्न आणि कष्ट चालू ठेवणे महत्त्वाचे आहे. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी धीर, संयम, आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत. “वेळ प्रत्येकाची येते” या वाक्याचा अर्थ समजून घेतल्यास, आपल्याला जीवनातील यशस्वी होण्याच्या मार्गावर प्रेरणा मिळेल आणि धैर्याने पुढे जाण्यासाठी बळ मिळेल.
५. आपली संगतच ठरवते भविष्य!
प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्वाचा टप्पा असतो तो म्हणजे आपल्या संगतीचा. आपण आपला वेळ कोणत्या व्यक्तीसोबत घालवतो, कोणत्या प्रकारच्या लोकांसमवेत आपण उठतो बसतो बोलतो ह्यावरून आपल्या विचारांची आणि कृतीशीलतेची ओळख समाजात तयार होत असते. जर आपण चार श्रीमंत लोकांसोबत वेळ घालवला तर पाचवे श्रीमंत आपण असूत. जर आपण चार रिकामटेकड्या व्यक्तींसोबत वेळ घालवतो तेव्हा पाचवे रिकामटेकडे म्हणून ओळखलो जातो. जर चार विद्वान मंडळींच्या सानिध्यात असू तर पाचवे विद्वान म्हणून आपला परिचय निर्माण होतो. आणि, जर आपण चार व्यावसायिक विचारांच्या लोकांसोबत वेळ घालवला तर पाचवे व्यावसायिक म्हणून आपणही त्या दिशेने मार्गक्रमण करायला सुरुवात करतो.
समाजात वावरताना आपण जशी संगत ठेवू त्याप्रमाणे आपलं आयुष्य घडत जात, तारुण्याच्या उंबरठ्यावर बऱ्याचदा आपल्या सर्वांची हीच गफलत होते, देखावा करणारी मंडळीं आपल्या अवतीभवती वावरत असताना आपणही असच काहीतरी करायला हवं असा विचार आपल्या मनात घोळायला लागतो. मग आपण त्यांचं अनुकरण करताना मर्यादांच भान विसरून चाकोरी बाहेरच्या त्या गोष्टी करतो ज्या केल्यानंतर पश्चातापाच्या कटू क्षणांना सामोरं जावं लागतं. झगमगीच आयुष्य जगण्याच्या धादांत खोट्या हट्टापायी आज कित्येक तरुण नैराश्याच्या काळोखात आपलं आयुष्य जगताना आपण पाहतो. कदाचित आपण त्या तत्सम गोष्टी केल्याचं नसत्या तर आपलही आयुष्य चांगलं असतं अशी म्हणण्याची वेळ येते. त्यामुळे जीवनात कुठलाही निर्णय अथवा पाऊल उचलताना आपण कोणाला डोळ्यासमोर ठेवून हे सर्व करतो याचं विश्लेषण करायलाच हवं. अमुक मित्राने महागडी गाडी घेतली म्हणून मलाही तशीच गाडी हवी अस म्हणणाऱ्या तरुणाने कमीतकमी आपल्या पालकांकडे, आई वडिलांच्या काबाडकष्टाकडे डोळे उघडून बघितलं तर या गोष्टीची जाणीव होते की, आपण फक्त आपल्याकडे उपलब्ध असलेल्या फुकट मिळालेल्या गोष्टीचा उपभोग घेतोय. कारण गरज नसलेली गोष्ट विकत घेतली तर एक दिवस गरज असलेली गोष्ट विकण्याची वेळ आपल्यावर येत असते हे पण तितकच सत्य आहे. आणि, ज्याला हे वाक्य आंगिकारता आले त्याला आयुष्य समजले असे मी म्हणेल.
जर आपण आपल्या भविष्यासाठी, आपल्या वृद्धीसाठी किंवा आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी एखादी गोष्ट खरेदी करत असेल तर ती गोष्ट गरज या शब्दामध्ये मोडते, त्या प्रत्येक गोष्टीची नवीन खरेदी जी आपल्याला आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कामी येणार आहे, जी आपल्या वृद्धीसाठी कामी येणार आहे, जी आपल्या जडणघडणीसाठी कामी येणार आहे ती दिखाव्यामधे मोडत नाहीच.
बऱ्याचदा आपण लहानपणापासून एक वाक्य ऐकत आलो की, अंगराज कर्ण हा महादानी आणि महारथी होता, पण तो चुकीच्या संगतीच्या सानिध्यात असल्यामुळे त्याच्या महान असण्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. आणि, शेवट अधर्माच्या शिविरात झाला. यदा कदाचित जर कर्ण पांडवांकडून लढला असता तर परिणाम वेगळा असता. या पात्रांकडून आपण हे नक्कीच शिकायला हवं की आपल्यामध्ये कितीही उत्तम दर्जाचं कौशल्य असेल.. पण जर आपण मित्र निवडताना चूक केली तर आपल्या त्या ज्ञानाचा, कौशल्याचा काहीच अर्थ उरत नाही. दुसरीकडे जर उदाहरण म्हणून बघितलं तर कवी कलश यांचं. छत्रपती संभाजी महाराजांच्या अखेरच्या क्षणापर्यंत कविराजांनी महाराजांना साथ दिली आणि ते इतिहासात अढळपदावर जाऊन बसले.
माणसाच्या प्रत्येक निर्णायक घटनेमध्ये संगत ही खूप महत्त्वाची बाब ठरत आलीय, बऱ्याचदा आपल्या संघर्षाच्या काळातच आपली संगत चुकते. त्या संघर्षाच्या काळामध्ये आपण निश्चित केलेलं ध्येय प्राप्त करायचं असेल तर तश्या प्रकारच्या लोकांचा शोध घेणं फार आवश्यक असतं. आजपर्यंतच्या मोठ्या लोकांचं उदाहरण घेतलं तर मर्सिडीज, रोल्स रॉईस चालवणाऱ्या व्यक्तीचा मित्रही त्याच तोडीचा असतो. आपण उगीचच छोट्या छोट्या गोष्टींचा उहापोह करून गाव गोळा करतो आणि आपल्यासोबत स्पर्धेत असलेली माणसं खूप पुढे निघून जातात. आपल्या विचारांशी समतुल्य असलेली मंडळी आपल्या सोबत असली तरच आपला उत्कर्ष आणि अधोगतीचा निर्णय नियती करते. एखाद्याला जर आयुष्यात व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यक्तीने नोकरीचा माईंडसेट असणाऱ्या लोकांच्या बैठकीत बसणंच टाळायला हवं. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल इथे कुठलाही दुराग्रह नाही किंवा त्यांच्याबद्दल तक्रार नाही. पण काय होत? आपल्याला ध्येयप्राप्तीच्या वाटेत आपल्या विचारांना समजून घेणारी मंडळीच साथ देतात आणि यशाचे टप्पे ओलांडायला मदत करतात.
चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिल्याने एकतर माणसाचे निर्णय चुकतात, निर्णय चुकल्यामुळे अपयश येतं आणि अपयश आल्यानंतर नैराश्य येतं. आपल्याकडे एक प्रचलित भावना आहे ती म्हणजे मित्रासाठी काहीपण! मग मित्र जर काही चुकीचं जरी करत असेल तरी आपण त्याच्या त्या चुकीच्या गोष्टीत त्याची साथ देतो आणि इथेच डाव फसतो. परमेश्वराने मित्र हेच एक नातं निवडण्याची संधी आपल्याला आयुष्यात दिली आहे, माणूस ना आई बाप निवडू शकतो ना भाऊ-बहीण ना पती पत्नी पण मित्र कोण असावा हे निवडण्याचा अधिकार आपल्याला देवानेच दिला आहे. मित्र, संगत म्हणून आपली हीच जबाबदारी आहे की आपण आपल्या मित्राला कधी चुकीच्या मार्गाला नेऊ नये व त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचायला मदत करावी. जर एक मित्र चुकत असेल तर दुसऱ्या मित्राने अधिकारवाणीने त्याला रोखायला हवं तरच ती मैत्री खरी आणि टिकणारी असते.
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा अभंग आहे त्यात महाराज म्हणतात की चोरें चोरातें करावा उपदेश। आपुला अभ्यास असेल तों ।।२।। शिंदळीच्या मागें वेचितां पाऊले। होईल आपुलें तिच्या ऐसें ।। धृ।। तुका म्हणे भितो पुढीलिया दत्ता। म्हणऊनि चिंता उपजली ।।२।।
अर्थात, एक चोर दुसऱ्या चोराला घरफोडी, चोरी करायला शिकवतो. व्यक्तीचा जसा अभ्यास असेल तसा तो उपदेश करत जातो. एखादी घरंदाज स्त्री जर वेश्येच्या सहवासात आली तर कालांतराने तीही वाममार्गाला प्रस्थान करते. वाईट व्यक्तीच्या सहवासात चांगली व्यक्ती सुद्धा वाईट बनते, त्यामुळे तुकाराम महाराज शेवटच्या ओळींमध्ये म्हणतात की मला वाईट संगतीच नको देवा, त्यामुळे भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामाची मला भीती वाटते.
आपली संगत आपल्या भविष्याचा मार्ग ठरवते, कारण आपल्या सहवासात असणाऱ्या लोकांचे विचार, मूल्ये, आणि वर्तन आपल्यावर मोठा प्रभाव टाकतात. चांगली संगत आपल्याला प्रेरणा देते, सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला शिकवते, आणि आपल्याला यशाच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रवृत्त करते. अशा व्यक्तींच्या सहवासात राहून आपण आपल्या ध्येयांच्या अधिक जवळ जातो, आणि जीवनात यशस्वी होण्याच्या शक्यता वाढवतो. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी मेहनती मित्रांच्या संगतीत राहिल्यास, त्याला अभ्यासात अधिक लक्ष देण्याची प्रेरणा मिळते आणि त्याचे शैक्षणिक यश वाढते.
वाईट संगत, दुसरीकडे, आपल्याला चुकीच्या मार्गावर नेऊ शकते. चुकीच्या मित्रांच्या सहवासात राहिल्यास, आपण वाईट सवयींचे शिकार होऊ शकतो आणि आपल्या ध्येयांपासून दूर जाऊ शकतो. वाईट संगतीमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो आणि नकारात्मकता वाढते. उदाहरणार्थ, व्यसनाधीन लोकांच्या संगतीत राहिल्यास, त्यांचे वर्तन आपल्यावरही परिणाम करते आणि आपणही त्या व्यसनाधीनतेच्या जाळ्यात अडकू शकतो. त्यामुळे वाईट संगतीपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.
ही तफावत वेळेत ओळखता आली पाहिजे, कारण उशिरा लक्षात आल्यास, नुकसान झालेलं असतं. आपल्या आयुष्यात कोणत्या व्यक्तींना स्थान द्यायचं आणि कोणत्या व्यक्तींना टाळायचं, याबाबत सजग असणं महत्त्वाचं आहे. चांगली संगत निवडल्यास, आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते आणि आपण आपल्या ध्येयांच्या अधिक जवळ पोहोचतो. याउलट, वाईट संगत ओळखून ती टाळली नाही, तर त्याचे परिणाम आपल्या भविष्यावर होतात आणि आपले जीवन अडचणींच्या गर्तेत सापडू शकते.
आपल्या संगतीच्या निवडीवर आपल्या जीवनाचा मार्ग अवलंबून असतो. योग्य वेळेत चांगली संगत ओळखून, तिचा स्वीकार करणे आणि वाईट संगत टाळणे हेच यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे, आपल्याला आपल्या संगतीबद्दल सतर्क राहून, विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील, जेणेकरून आपले भविष्य उज्ज्वल आणि यशस्वी होईल.
आपल्या भविष्याला हानिकारक असलेली संगत वेळीच ओळखून त्यात परिवर्तन आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण चुकीच्या संगतीचा आपल्या आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. चुकीच्या व्यक्तींच्या सहवासात राहिल्याने आपले विचार, वर्तन, आणि निर्णय क्षमता नकारात्मक होऊ शकते. त्यामुळे वेळेत चुकीची संगत ओळखून, त्यात परिवर्तन करणे आवश्यक आहे.
पहिलं पाऊल म्हणजे स्वतःचे आत्मचिंतन करणे. आपल्याला आपल्या सध्याच्या संगतीचा विचार करावा लागतो आणि तिचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम ओळखावा लागतो. हे करताना, कोणते मित्र किंवा सहकारी आपल्याला चुकीच्या मार्गावर नेत आहेत, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीच्या सहवासात व्यसनाधीनतेची किंवा नकारात्मकतेची सवय लागली असेल, तर ती संगत आपल्या भविष्याला हानीकारक ठरू शकते.
दुसरं पाऊल म्हणजे सकारात्मक संगतीचा स्वीकार करणे. आपल्याला अशा लोकांच्या सहवासात राहणे आवश्यक आहे, जे आपल्याला प्रेरणा देतात, प्रोत्साहित करतात, आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. अशा व्यक्तींच्या सहवासात राहिल्याने, आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपली निर्णय क्षमता सुधारते. उदाहरणार्थ, मेहनती, सकारात्मक, आणि ध्येयवादी लोकांच्या सहवासात राहिल्यास, आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळते.
तिसरं पाऊल म्हणजे, चुकीच्या संगतीपासून दूर जाण्यासाठी ठोस निर्णय घेणे. यासाठी आपल्याला कधी कधी कठोर पावले उचलावी लागतील. एखाद्या नकारात्मक व्यक्तीच्या सहवासात राहणे आपल्याला मानसिक आणि भावनिक दृष्ट्या हानीकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत, आपल्याला त्यांच्या सहवासातून दूर जाण्यासाठी ठामपणे निर्णय घ्यावा लागेल. यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता येईल आणि आपल्याला यश मिळवण्याची संधी वाढेल.
अखेर, आपल्या भविष्याला हानिकारक असलेली संगत वेळीच ओळखून त्यात परिवर्तन आणणे हे आपल्या यशस्वी जीवनाचे गमक आहे. चुकीची संगत टाळून, सकारात्मक आणि प्रेरणादायी व्यक्तींच्या सहवासात राहिल्यास, आपल्याला आपल्या ध्येयांच्या दिशेने वाटचाल करणे सोपे होईल. त्यामुळे आपल्या संगतीचा विचारपूर्वक आणि सजगपणे विचार करून, योग्य निर्णय घ्या आणि आपले भविष्य उज्ज्वल करा.
६. नैराश्य : एक वरदान
नैराश्य आणि अतिविचार ! प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला एक महत्वाचा आणि न टाळता येणारा असा कठीण काळ. स्वतःच्या कल्पनेतच अडचणींना मोठ करून त्यातच अडकत जाण्याला नैराश्य म्हटलं तर वावग ठरणार नाही. मी हे करूच शकत नाही ते हे मी करू शकतो इथपर्यंतचा प्रवास म्हणजे नैराश्य.
मुळात नैराश्य हे त्याच व्यक्तीच्या आयुष्यात येतं ज्यांच्याकडे काहीतरी करण्याची जिद्द असते. नैराश्य हे अपयशाने कधीच उत्पन्न होत नाही नैराश्याची सुरुवात ही निर्णय अंमलात न आणण्यामुळे होते. पण नैराश्य ही टाळता न येणारी भावना आहे, परंतु ह्या भावनेचा योग्य रीतीने वापर केला तर विश्वात आपल्याला कोणीही पराजित करू शकत नाही हेच पूर्ण सत्य आहे.
आजवर यशस्वी झालेला असा एकही व्यक्ती नाही ज्याला कधीच ह्या नैराश्याचा सामना करावा लागला नाही. वाईट काळ, नैराश्य हे त्याच व्यक्तीच्या आयुष्यात येते ज्या व्यक्तींमधे ते पेलण्याची धमक असते फक्त आपण त्या काळामध्ये काय उपाययोजना करतो याला फार महत्त्व आहे.
नैराश्याची सुरुवात नेमकी होती कशी ?
आपण आपल्या उराशी बाळगलेल्या स्वप्नांसाठी लढायला सुरुवात करतो, सतत प्रयत्न करतो आणि एकामागे एक सतत अपयश येतं आणि, या अपयशाला हाताळायला सुरुवात करतो तेच समाजातून टोमण्यांचा भडिमार सुरु होतो आपल्या आजूबाजूच्या ज्या लोकांकडून आणि ज्या मित्रपरिवाराकडून आपल्याला साथीची अपेक्षा असते ते सुद्धा पळ काढतात, स्वतःच्या घरामधे सुद्धा टोमण्यांची सकाळ होते. आणि, इथूनच सुरुवात होते नैराश्याची, अतिविचाराची आणि, डिप्रेशनची.
पण हीच खरी वेळ असते काहीतरी करून दाखवण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची. हे दिवस येणं सुध्दा फार महत्वाचं असतं कारण ह्याच दिवसांमध्ये आपल्याला जाणीव होते की ज्या लोकांसाठी आपण रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली, ज्या लोकांसाठी आपण जेवत्या ताटावरून उठलो आज तेच लोक आपल्या वाईट काळात आपल्या सोबत नाहीत आणि इथूनच आपण लोकांसाठी कमी आणि स्वतःसाठी जगायला शिकतो.
आपण इतिहासातील सर्व मोठ्या लोकांची उदाहरणे पडताळून बघितली तर त्यांच्या अनुभवातून हेच शिकायला मिळतं की त्यांनी या नैराश्याच्या काळाचा उपयोग हा ध्येयाच्या प्राप्तीसाठीच्या तयारीसाठी केला. दक्षिण दिग्विजयाच्या मोहीमेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजही एका नैराश्याच्या गर्तेत ओढले गेले होते पण महाराजांनी त्या क्षणी स्वतःला सावरलं, कारण डिप्रेशनच्या फेजमध्ये असताना आपण ओव्हर थिंकिंग ऐवजी जर डीप थिंकिंगचा मार्ग अवलंबला तर आपल्याला पुढे जाण्याचा रस्ता आपोआप तयार होत जातो. ह्या काळामध्ये आपण वाचन करण्यावर भर द्यायला हवा. कारण एक पुस्तक आपल्याला इतर अनुभवांपेक्षा खूप पुढे घेऊन जातं. पुस्तकं ही आपल्याला तो दृष्टिकोन देतात जो दृष्टिकोन आपण प्रयत्न करूनही मिळवू शकत नाही, त्यामुळे या काळामध्ये पुस्तकं हीच आपल्याला साथ देतात यावर माझं ठाम मतं आहे.
नैराश्य आल्यानंतर माणूस असा विचार करतो की आपल्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही आणि हाच तो विचार असतो नवीन सुरुवात करण्याचा. कारण ज्याच्याकडे गमावण्यासाठी काहीच नसतं त्याच्याकडे मिळवण्यासाठी सगळं जग असतं. त्यामुळे आपण या नैराश्याच्या काळाचा वापर करायलाच हवा, आणि तो करताना नकारात्मक गोष्टी करणं टाळायला हव्यात. सून त्झु या चिनी लेखकाच ‘द आर्ट ऑफ वॉर’ हे एक नावाजलेल पुस्तक आहे ज्यामध्ये त्याने नैराश्याच्या भावनेवर छान वर्णन केलं आहे. जेव्हा युद्ध नसतं तेव्हा आपण होणाऱ्या युद्धाची तयारी सुरू ठेवावी. तलवारींना धार लावून त्या तयारीत ठेवाव्या, ह्या तलवारी, शस्त्र म्हणजे काय तर ते म्हणजे तुमचे आचार विचार आणि क्रिया. नैराश्यात आपण येणाऱ्या प्रसंगासाठी तयारी करणं गरजेचं आहे. कारण नैराश्यामध्ये आपल्या मानसिक क्षमतेची परीक्षा असते, या परीक्षेत आपल्याला आपण कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाऊ शकतो याची शिकवण आपल्याला मिळते. या नैराश्यावर समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये खूप सुंदररित्या लिहिले आहे, जनिं सर्व सुखी असा कोण आहे। विचारे मना तूंचि शोधूनि पाहे।। मना त्वांचि रे पूर्वसंचित केले। तयासारिखे भोगणें प्राप्त जाले।।११।।
नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारणे, या दृष्टिकोनातून पाहता, जीवनाच्या संघर्षांला सकारात्मकतेने स्वीकारण्याचे महत्व अधोरेखित होते. नैराश्य म्हणजेच निराशा, चिंता, आणि दुःखाचा काळ आहे, परंतु या अवस्थेतून आपल्याला स्वतःबद्दल, आपल्या क्षमतांबद्दल आणि आपल्या आयुष्याच्या उद्दिष्टांबद्दल खूप काही शिकता येते. नैराश्याच्या काळात, आपल्याला आपल्या आतल्या शक्तीची आणि सामर्थ्याची जाणीव होऊ शकते. या काळात घेतलेल्या निर्णयांनी आणि केलेल्या प्रयत्नांनीच आपल्याला खरे यश मिळवण्याची क्षमता मिळते.
नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारल्यास, आपल्याला जीवनातील संधींची खरी ओळख होते. नैराश्यामुळे आपल्याला स्वतःच्या मर्यादांची आणि क्षमतांची जाणीव होते. या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला नवीन मार्ग शोधावे लागतात, नवीन विचार करावे लागतात, आणि स्वतःला पुन्हा घडवावे लागते. यामुळे आपण अधिक प्रगल्भ होतो, आपली निर्णयक्षमता सुधारते, आणि आपल्याला नवीन कौशल्ये अवगत होतात. अशा प्रकारे, नैराश्याचे दिवस आपल्याला जीवनातील खऱ्या संघर्षांना तोंड देण्याची तयारी करतात.
नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, या काळात आपल्याला आत्मचिंतनाची संधी मिळते. नैराश्याच्या काळात, आपण आपल्या आयुष्याचा विचार करतो, आपल्या ध्येयांची पुनर्मूल्यांकन करतो, आणि आपल्याला काय बदल करावे लागतील हे ठरवतो. हा काळ आपल्याला आत्मशोधाचा आणि आत्मविकासाचा मार्ग दाखवतो. यामुळे आपली मानसिकता अधिक मजबूत होते आणि आपल्याला जीवनातील खऱ्या यशाचा अर्थ समजतो.
नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारल्यास, आपल्याला जीवनातील संघर्षांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या धैर्याची आणि संयमाची शिकवण मिळते. नैराश्याच्या काळात आपण जे धैर्य आणि संयम दाखवतो, तेच आपल्याला पुढे जाऊन यश मिळवण्यासाठी सहाय्यक ठरतात. या काळात आपण घेतलेले धडे, आपल्या अनुभवांची शिदोरी बनतात आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला सिद्ध करतात.
अखेर, नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारल्यास, आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करता येतो. या दृष्टिकोनामुळे आपण अधिक सकारात्मक, आत्मविश्वासी, आणि यशस्वी होऊ शकतो. नैराश्याच्या काळातून बाहेर पडल्यावर, आपल्याला आपले जीवन अधिक सुसंवादी, आनंदी, आणि यशस्वी बनवता येते.
नैराश्याचा उपयोग यशस्वी होण्यासाठी करण्याच्या संदर्भात महाभारतातील अर्जुनाच्या जीवनाची कथा आपल्याला प्रेरणा देऊ शकते. अर्जुन हा पांडवांपैकी एक अत्यंत पराक्रमी योद्धा होता, परंतु महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला त्याला नैराश्याने ग्रासले होते.
महाभारताच्या युद्धाच्या रणांगणावर उभा असताना अर्जुनाने आपल्या समोर उभ्या असलेल्या आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि गुरूंना पाहिले आणि त्याला युद्धात लढण्याची इच्छा राहिली नाही. त्याच्या मनात नैराश्याने घर केले, आणि तो भगवद्गीतेतील प्रसिद्ध श्लोकांमध्ये श्रीकृष्णाला म्हणतो की, “माई हात थरथर कापत आहेत. माझे मन गोंधळले आहे. आणि मी युद्ध करणार नाही’
या नैराश्याच्या अवस्थेत, अर्जुनाला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता होती. श्रीकृष्ण, अर्जुनाचे सारथी आणि मित्र, त्याला मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आले त्यांनी अर्जुनाला भगवद्गीतेचे उपदेश दिले, ज्यामध्ये त्यांनी त्याला कर्मयोग भक्तियोग, आणि ज्ञानयोगाचे महत्व सांगितले. श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्या कर्तव्याचा आणि धर्माचा मार्ग दाखवला, ज्यामुळे अर्जुनाचे नैराश्य दूर झाले आणि त्याला आपल्या ध्येयाची जाणीव झाली.
श्रीकृष्णाच्या उपदेशांमुळे अर्जुनाने आपल्या नैराश्याचे रूपांतर आपल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी आवश्यक प्रेरणेत केले. त्याने आपल्या मनातील शंका, निराशा, आणि भीती यांना दूर सारून, युद्ध करण्याचा निर्णय घेतला. अर्जुनाच्या या मानसिक परिवर्तनामुळे तो महाभारताच्या युद्धात यशस्वी झाला आणि धर्माची पुनःस्थापना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
अर्जुनाच्या या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की, नैराश्याच्या काळात योग्य मार्गदर्शन आणि आत्मचिंतनाच्या सहाय्याने आपण आपल्या ध्येयांचा पुनरावलोकन करू शकतो आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणेत बदल करू शकतो. नैराश्याचा उपयोग यशस्वी होण्यासाठी कसा करावा हे अर्जुनाने आपल्या जीवनातून दाखवून दिले आहे. अशा प्रकारे, आपल्या जीवनात आलेल्या नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारून, त्याचा उपयोग आपल्याला यशस्वी होण्यासाठी करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे महान योद्धा आणि संस्थापक, हे आपल्याला नैराश्यावर विजय मिळवण्याच्या संदर्भात एक उत्कृष्ट उदाहरण देतात. त्यांच्या जीवनातील विविध टप्प्यांवर, विशेषतः प्रारंभिक काळात, त्यांनी ताणतणाव आणि नैराश्याला सामना दिला आणि त्यावर विजय मिळवला शिवाजी महाराजांच्या दृष्टीने नैराश्यावर विजय मिळवण्याचे मार्ग अनेक अंगांनी स्पष्ट आहेत.
प्रारंभिक काळात, शिवाजी महाराजांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एका युवकाच्या रूपात, त्यांनी आपल्या किल्ल्यांचे संरक्षण करणे, शत्रूच्या आक्रमणांना तोंड देणे, आणि स्वराज्याची कल्पना साकार करणे हे महत्त्वाचे कार्य पार केले. त्यांच्या सामर्थ्य आणि साहसाचे हेच दर्शन नैराश्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची प्रेरणा देत आहे. त्यांनी नेहमीच धैर्य, आत्मविश्वास, आणि दृढ निश्चयाचे प्रदर्शन केले, ज्यामुळे त्यांना नैराश्यावर विजय मिळवता आला.
शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात प्रत्येक नैराश्याच्या परिस्थितीला एक संधी म्हणून पाहिले. त्यांच्या या दृष्टीकोनातून, नैराश्याच्या काळात अनेक वेळा एक प्रकारे परिश्रम, प्रेरणा, आणि कृतीची आवश्यकता असते. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीतील पहिल्या संघर्षांतून, त्यांच्यावर चाललेल्या परकीय आक्रमणांनी आणि अंतर्गत राजकीय संकटांनी प्रेरणा घेतली आणि या संकटांना आपल्या विजयाच्या आधारस्तंभांमध्ये परिवर्तित केले.
त्यांनी आपल्या चांगल्या सल्लागार आणि विश्वासू सहकाऱ्यांची निवड केली आणि त्यांच्या मदतीने आपले संकटे पार केल्या. शिवाजी महाराजांच्या दृष्टीने, नैराश्यावर विजय मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे, योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य प्राप्त करणे आहे. त्यांनी आपल्या सैन्याची मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे धैर्य वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांच्या प्रेरणादायक नेतृत्वाने आणि योग्य निर्णयांनी नैराश्याचे संकटे कमी झाली आणि यशाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली.
त्यांच्या स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी व्यापक योजना तयार केल्या आणि त्यांच्या योजनांना कार्यान्वित करण्यासाठी कठोर परिश्रम केले. नैराश्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी लक्ष्य निश्चित केले, कार्यवाहीची योजना तयार केली, आणि अडचणींच्या पार्श्वभूमीवर सातत्याने कार्यरत राहिले. या प्रकारे, त्यांनी नैराश्यावर विजय मिळवण्यासाठी ठोस योजना आणि परिश्रमाचे महत्व दर्शवले.
शिवाजी महाराजांनी इतर लोकांसाठी एक आदर्श स्थापित केला आहे की, नैराश्याच्या स्थितीचा स्वीकार आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेल्या धैर्याचा आणि तपश्चर्येचा विकास करणे हे महत्वाचे आहे. त्यांच्या जीवनातील अनुभवांनी स्पष्ट केले की, नैराश्य आणि अडचणींचा सामना करण्यासाठी आपल्याला आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवावा लागतो, योग्य मार्गदर्शन मिळवावे लागते, आणि दृढ निश्चयाने कार्यवाही करावी लागते.
अखेर, शिवाजी महाराजांच्या दृष्टीने, नैराश्यावर विजय मिळवण्यासाठी आपण आपल्या ध्येयांची पूर्तता, योजनांची अंमलबजावणी, आणि संघर्षाच्या काळात आपल्या सामर्थ्यांचा वापर करणे हे महत्वाचे आहे. त्यांच्या जीवनातील अनुभव आपल्याला शिकवतात की, प्रत्येक अडचणीच्या परिस्थितीला संधी म्हणून पाहणे, धैर्य राखणे, आणि कठोर परिश्रम करणे हे नैराश्यावर विजय मिळवण्यासाठी आवश्यक आहे.
७. बदलत्या काळनुरूप बदल स्वीकारायला शिका.
परिवर्तन.. निसर्गाचा असा नियम जो सर्वांना लागू होतो.., जुन्यातून नव्याकडे ज्याला जायला जमतं तो स्पर्धेत टिकून राहतो. कधीकाळी कबुतर, घोडेस्वारामार्फत होणारा पत्रव्यवहार काळानुरूप बदलत गेला आणि संपर्काची नवनवीन साधने तयार होत गेली, जस टेलिग्राम असेल, नंतर टेलिफोन असतील आणि आताची स्मार्टफोन, ईमेलद्वारे असतील. जशी संपर्काची साधने बदलली तशी धोरणे सुद्धा. जगातली ९०% फोटोपेपर बनवणारी कंपनी कोडॅक ही होती पण त्यांनी काळानुरूप तंत्रज्ञानात होणारे बदल न स्वीकारता त्यांच्या धोरणावरच अडून बसली आणि काळाच्या बदलत्या प्रवाहात संपुष्टात आली.
३०-३५ वर्षांपूर्वी जो काळ होता तो नक्कीच आज तसा राहिलेला नाही आणि आज जे बदल, तंत्रज्ञान आपण अनुभवत आहेत ते पुढील ३०-३५ वर्षांनंतर नसणार आहे. वेळेप्रमाणे जे स्वतःमध्ये बदल घडवत जातील त्यांच्यासाठी येणारा भविष्यकाळ हा सुवर्ण असेल आणि ज्यांनी हे बदल स्वीकारण्यास टाळाटाळ केली ते इतिहासात सुद्धा कुठे नसतील.
शिक्षणपद्धती, जीवनशैली, कार्यपद्धती या काळाप्रमाणे जश्या जश्या बदलतील त्यापध्दतीने आपण त्या परिस्थितीसाठी तयार असावं लागणार आहे. आजची पिढी ही वेगवान आहे, त्यांना सर्व गोष्टी तत्काळ हव्या आहेत, त्यापद्धतीने बदल घडत आहेत. हे बदल घडताना हे जग एका विशिष्ट पॅटर्नमध्ये फिरतय याचा सारासार विचार आता आवर्जन करायलाच हवा. व्यवसाय असेल. नोकरी असेल या बदलत्या काळाप्रमाणे निर्माण होतील आणि संपुष्टातही येतील परंतु त्या महत्वाच्या बदलासाठी जो व्यक्ती सक्षम आणि क्षमता सिद्ध करणारा असेल त्यालाच नवीन आव्हान पेलण्याची जबाबदारी नियतीकडन मिळत राहील.
नोकिया नावाच्या सर्वात लोकप्रिय मोबाईल बनवणारी कंपनीने मान्य केलं होतं, त्यांची कुठल्याच बाबतीत कसलीच चूक नव्हती पण ते काळाशी जुळवून घेण्यात सपशेल अपयशी ठरले तर दुसरीकडे अनेक नवीन कंपन्यानी काळाची दिशा ओळखून कार्यशैलीत बदल केले आणि त्या आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
येणारा काळ हा तंत्रशुद्ध असणार आहे, त्यामुळे आपण सध्या काय शिक्षण घेतो, त्या मार्गाने कसा विचार करतो हे ठरवणे खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला आपला कंफर्ट झोन सुटत नाही आणि त्याचमुळे आपण निर्णय घेण्यास कचरत जातो. आपण सर्वप्रथम मनातून सवयीचं गुलाम होणं सोडून द्यायला हवं, जोपर्यंत आपण त्याच त्या चौकटीत अडकून पडू तोपर्यंत बदल स्वीकारणं आपल्याला सहज शक्य होणार नाही. आपल्या मनात जोपर्यंत काहीतरी करण्याची गरज व जिद्द निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्याला बदल काय असतो आणि तो कसा घडवायचा याची जाणीव निश्चितच होणार नाही. येणाऱ्या भविष्यासाठी आपण आजच सराव सुरू करायला हवा.. तेव्हाच.., आपण घडणारे बदल आत्मसात करून स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवू शकू.
महाभारतात जरासंध नावाचा एक बलशाली राजा होऊन गेला, मथुरेवर त्याने तब्बल शेकडोवेळा तरी आक्रमणे केली असतील, श्रीकृष्ण जरी शूरवीर होता तरीही आपल्या प्रजेच्या संरक्षणासाठी, राज्याचं अर्थचक्र सुरळीत राहण्यासाठी त्याने द्वारका उभी केली. या प्रसंगातून आपल्याला शिकायला काय मिळालं? तर सतत त्याच त्या गोष्टी करण्यापेक्षा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी रणनीतीमध्ये बदल करावे लागतात. त्या क्षणाला पळपुटा, भेदरट म्हणून जरी उपाध्या मिळाल्या.. तरी, वेळेशी आपण संधान साधून बदल घडवले पाहिजे. कारण लोक आपल्या आजच्या प्रयत्नांवर जरी हसले, टीका करत राहिले तरी नंतर येणाऱ्या यशाच्या जल्लोषात हीच लोकं सामील होतात. पण हे कधी शक्य आहे, जेव्हा आपण बदल मनापासून स्वीकारतो. कित्येकदा आपण हे बदल स्वीकारायला घाबरतो, कारण आपल्याला चाकोरीबाहेर जगणं मान्य होत नसतं, त्यामुळे आपण स्पर्धेतून बाहेर फेकले जातो. पुरंदरच्या तहावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा अनेकांनी टीका टिपण्ण्या केल्या.. पण, त्याच शिवरायांनी पुढच्या दहा वर्षांच्या काळात पुरंदरसहित ३५० किल्ल्याचं अभेद्य असं स्वराज्य उभे केले. कदाचित महाराजांनी त्यावेळी तह न स्वीकारता सरदारकी स्वीकारली असती तर हे घडलच नसत. परंतु, महाराजांना त्यांच्या शक्ती-युक्तीवर विश्वास होता आणि भविष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन होता. याचाच परिणाम म्हणजे “स्वराज्य.!”
आपल्यालाही जर आयुष्यात यशाची चव चाखायची असेल तर आपण तडजोड आणि धोरणात वेळोवेळी बदल करायला हवे. वेळेसारखा बलवान या संपूर्ण ब्रम्हांडात कोणीच नाही. वेळ ही क्षणात काहीही बदलू शकते त्यासाठी आपण क्षणोक्षणी स्वतःला सज्ज ठेवलच पाहिजे. एक काळ होता जेव्हा नोकरी म्हटलं की शाश्वती असायची पण जसजसा काळ बदलला तसतसा नोकरीमध्येही अनिश्चितता आली. कुठलीतरी एखादी नवीन टेक्नॉलॉजी बाजारात येते आणि तरुणांच्या हातातल्या नोकऱ्या क्षणात काढून घेतल्या जातात, मग हे तरुण कोण असतात तर वेळेप्रमाणे अपग्रेड झालेले नसतात ते. मोठमोठ्या कंपन्या या आज एका बटणावर त्यांची कामे सुरू ठेवतात, पण आपण हे तंत्रज्ञान शिकण्याची जिद्द दाखवत नाही.. उलट, त्यापेक्षा आपण कमी पगाराची का असेना नोकरी स्वीकारतात. एखादा उत्तम खाद्यपदार्थ बनवणारा व्यक्ती जर वेळेच्या हिशोबाने त्याच्या व्यवसायात बदल करत नाही.. तर तो व्यवसायिक आजही तेवढाच ठराविक गल्ला कमावतो. आजकाल लोकांना प्रेझेंटेशन प्रचंड महत्वाचं असतं. आजकाल गुणवत्ता आणि परिमाणासोबत सादरीकरणही गरजेचं ठरतं. त्यामुळे बदल ही काळाची गरज आहे.. हे मनाशी पक्क करायलाच पाहिजे. आणि, त्यादृष्टीने पावलेही उचलायला पाहिजे. बदलत्या काळासोबत बदललं की काय घडतं याच उत्तम उदाहरण म्हणजे जेफ बेजोस.
एकदा एक लहानसा युवक, जेफ बेजोस, शिकागो शहरात एका पारंपारिक कुटुंबात जन्मला. लहानपणापासूनच त्याला तंत्रज्ञानातील गती आणि बदलत्या काळाची ओळख होती. एके दिवशी तो वाचनाच्या आवडीत गोड गुंतलेला असताना, त्याच्या मनात एक विचार आलाः “सध्याच्या बाजारपेठेत काहीतरी नवीन करून दाखवायचे आहे.”
तयारीच्या काळात, जेफने त्याच्या नवीन कल्पनांसाठी एक प्लॅन तयार केला. त्याने निर्णय घेतला की, त्याने एक ऑनलाइन बुकस्टोअर सुरू करावे, जे लोकांना सहजपणे त्यांच्या आवडत्या पुस्तकांपर्यंत पोहोचवेल. त्यांचा हा विचार 1994 साली अमेजॉनच्या रूपात समोर आला. सुरुवातीला, अमेजॉन हा एक साधा ऑनलाइन बुकस्टोअर होता, पण बेजोसने त्याच्या मनातील बदल आणि संधींचा उपयोग करून व्यवसायाचे स्वरूप बदलले.
अमेजॉनच्या सुरुवातीच्या दिवसातच, बेजोसने बदलत्या परिस्थितीला सामोरे जातांना नवकल्पना आणि तंत्रज्ञानाची गरज ओळखली. इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामुळे, बेजोसने ऑनलाइन खरेदीच्या संधींचा फायदा घेतला. तथापि, त्याने याच वेळी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली.. ती म्हणजे, ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि त्यांच्या अनुभवाची महत्त्वता. म्हणूनच, बेजोसने अमेजॉनला एक मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित केले.
आता बेजोसने फक्त बुकस्टोअरच नाही, तर विविध उत्पादनांची श्रेणी अमेजॉनमध्ये समाविष्ट केली. त्याने त्याच्या व्यावसायिक धोरणात बदल करून, अमेजॉनला इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्र, आणि खाद्यपदार्थ यासारख्या क्षेत्रांमध्ये पाय ठेवला. त्याच्या दृष्टीकोनातून, बदलत्या काळाशी समायोजन करणे हे व्यवसायाच्या यशाचे मुख्य घटक होते.
पण बेजोसचे कार्य इतक्यावरच थांबले नाही… 2006 साली, जेफने Amazon Web Service (AWS) सुरू केली, जो क्लाउड कंप्युटिंग क्षेत्रातील एक नवीन क्षेत्र होता. AWS च्या सुरुवातीच्या दिवसात, अनेक कंपन्यांनी या सेवेचा वापर करून आपले डेटा स्टोरेज, प्रोसेसिंग, आणि विविध तंत्रज्ञानाच्या गरजा पूर्ण केल्या. बेजोसने या नवकल्पनाचा उपयोग करून अमेजॉनला एक वेगळा आयाम दिला.
जेफ बेजोसच्या कथेतील दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन. अमेजॉनच्या सर्व सेवांमध्ये ग्राहकाच्या अनुभवाची उत्तमता साधण्याचा प्रयत्न केला. बेजोसने आपल्या ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि गरजांची अचूक माहिती घेतली. यामुळे अमेजॉनने ग्राहकांच्या समाधानावर लक्ष केंद्रित केले आणि त्यांची विशिष्ट मागणी पूर्ण केली.
अखेर, बदलत्या काळाच्या परिस्थितीशी समायोजित होण्यासाठी, बेजोसने लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेनमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केले. त्याने स्वामित्वाच्या वितरण केंद्रांची निर्मिती केली आणि स्वतःच्या लॉजिस्टिक नेटवर्कला मजबूत केले. कोविड-19 महामारीच्या काळात, अमेजॉनने त्वरित प्रतिक्रिया दिली.. आणि, ग्राहकांच्या बदलत्या गरजांना पूर्ण करण्यासाठी व्यवस्थेत बदल केले.
या सर्व गोष्टींमुळे, जेफ बेजोसने अमेजॉनला एक ग्लोबल लीडर बनवले. त्याची कथा बदलत्या काळाशी समायोजित होण्याचे आदर्श उदाहरण आहे. त्याने तंत्रज्ञान, ग्राहक केंद्रितता, आणि व्यावसायिक कार्यप्रणालीत बदल करून व्यवसायात यश प्राप्त केले. जेफ बेजोसच्या कथेने आपल्याला शिकवले आहे की, बदलत्या काळाच्या गरजांनुसार बदलणे, नवकल्पनांना स्वीकारणे, आणि आपली कार्यप्रणाली सुधारणे हे जीवनातील यशाचे महत्त्वाचे तत्त्व आहे.
परिवर्तनावर श्रीकृष्णाच्या विचारांचे विस्तृत मंथन आपल्याला भगवद्गीतेत प्रामुख्याने सापडतं.., त्याचाच काही भाग हा आपण खालीलप्रमाणे बघुयात जेणेकरून आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येईल.
श्रीकृष्णाचे जीवन आणि त्याचे उपदेश, विशेषतः भगवद्गीतेत, हे बदलाच्या संदर्भात महत्वपूर्ण विचार प्रदान करतात. परिवर्तनाच्या संदर्भात श्रीकृष्णाने दिलेले विचार अनेक अंगांनी अंतर्दृष्टी प्रदान करतात आणि जीवनातील विविध परिस्थितींशी जुळवून घेण्याचे मार्गदर्शन करतात.
- जीवनाच्या अनिवार्यतेचा स्वीकारः
श्रीकृष्णाच्या विचारांत बदल हे जीवनाचे एक अपरिहार्य अंग आहे. भगवद्वीतेत. श्रीकृष्णाने जीवनाच्या अस्थायित्वाबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांनी ‘न तस्मिन विन्दति न च तन्मन्यते’ (भगवद्गीता २.२२) या वचनात स्पष्ट केले की, आत्मा अनादि आणि अमर आहे, पण शरीर आणि जगातील सर्व गोष्टी अस्थायी आहेत. याचा अर्थ, बदल हे जीवनाचा नैसर्गिक भाग आहे आणि हे स्वीकारणे आवश्यक आहे. श्रीकृष्णाच्या या दृष्टिकोनामुळे, आपल्याला जीवनातील अनिवार्य बदलांचा स्वीकार करणे आणि त्यांना साहजिक मानणे शिकवले जाते.
- कर्मयोगाचे महत्त्व :
‘योगः कर्मसु कौशलम्’ (भगवद्गीता २.५०) या वचनाद्वारे श्रीकृष्णाने कर्मयोगाच्या महत्वाचा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितले की, कार्यात कौशल्य ठेवणे आणि त्यात समर्पण करणे हे महत्वपूर्ण आहे. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी, कार्याची पद्धत आणि तीव्रतेचा विचार करून कार्य करणे आवश्यक आहे. श्रीकृष्णाच्या या उपदेशाने, कामाच्या यथार्थतामध्ये समर्पण आणि तत्त्वज्ञानाचा समावेश करून बदलांच्या परिस्थितीला सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते.
- आत्मसाक्षात्कार आणि मनोबलः
श्रीकृष्णाच्या विचारानुसार, आत्मसाक्षात्कार ही बदलांच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावते. ‘सुखदुखे समेकुत्वा’ (भगवद्गीता २.१५) याचा अर्थ म्हणजे.. सुख आणि दुःखात समभाव ठेवणे. श्रीकृष्णाने मनाची स्थिरता आणि आत्मसाक्षात्काराची महत्त्वता व्यक्त केली आहे.. ज्यामुळे जीवनातील बदलांना अधिक सहजतेने स्वीकारता येते. हे विचार आपल्याला आत्ममूल्ये आणि मनोबल विकसित करण्याची प्रेरणा देतात, जे बदलत्या परिस्थितींमध्ये धैर्य राखण्यासाठी आवश्यक आहे.
- परिस्थितीशी जुळवून घेण्याची कलाः
श्रीकृष्णाने ‘धर्मसंस्थापनार्थाय सांभवामि युगे युगे’ (भगवद्गीता ४.७) या वचनात सांगितले की, प्रत्येक युगात धर्माची स्थापना करण्यासाठी योग्य वेळ आणि परिस्थिती येते. ती हे दर्शवते की, बदलांच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी योग्य दृष्टिकोन आणि कार्यशक्ती आवश्यक आहे. श्रीकृष्णाच्या या विचारांद्वारे, जीवनातील बदलांच्या अनुरूप धोरणे आणि कार्यशैलीची निवड कशी करावी हे शिकता येते.
- बदलांच्या प्रवाहात स्थिरताः
श्रीकृष्णाच्या विचारांतून एक महत्त्वाचा संदेश हा आहे की, बदलांच्या प्रवाहात स्थिरता राखणे आवश्यक आहे. ‘नहि देहभृता शक्यं त्यागं त्यक्तुमीश्वरः’ (भगवद्गीता १८.१२) याचा अर्थ आहे की, देहधारक व्यक्तीला कधीच कार्य त्याग करणे शक्य नाही, पण त्याच्या कामाचे स्वरूप बदलू शकते. श्रीकृष्णाचे विचार दर्शवतात की, जीवनाच्या बदलत्या परिस्थितींतून मार्गक्रमण करतांना, स्थिरता आणि नियंत्रण राखणे महत्त्वाचे आहे.
श्रीकृष्णाच्या या विचारांद्वारे, बदलाच्या विविध अंगांचा स्वीकार, कार्याची पद्धत आणि आत्मसाक्षात्काराची महत्त्वता याने स्पष्ट दृष्टीकोन प्रदान केले जातात. बदलाच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी, त्यांनी दिलेले मार्गदर्शन जीवनातील अनिवार्य बदलांशी सकारात्मक आणि सुसंगत दृष्टीकोन स्वीकारण्यास मदत करते. श्रीकृष्णाचे उपदेश, बदलाच्या परिस्थितीतील तत्त्वज्ञान आणि कार्यशक्तीचे महत्त्व दर्शवतात, ज्यामुळे जीवनातील बदलांना अधिक सुसंगतपणे सामोरे जाणे शक्य होते.
जीवनातील बदल अनिवार्य आहेत, आणि त्यांना स्वीकारणे हे आपले काम आहे. बदलत्या काळाशी समायोजन करण्याची क्षमता म्हणजेच प्रगतिपथावर पावले टाकण्याची तयारी. आपण कितीही स्थिर असू इच्छित असलो तरी, बाह्य जगातील परिवर्तन नकारता येणारे नसते. याच कारणास्तव, आपल्याला बदल स्वीकारण्याची कला शिकणे आवश्यक आहे. हे शिकलेले कौशल्य जीवनातील अनिश्चिततेसाठी एक मजबूत आधार प्रदान करते आणि आपल्याला नवा दृष्टिकोन आणि क्षमता विकसित करण्यास मदत करते. प्रत्येक बदलामुळे आपल्याला नवीन अनुभव, ज्ञान आणि संधी प्राप्त होतात. म्हणूनच, बदलाला तोंड द्या आणि त्याच्याशी जुळवून घ्या, कारण यामुळेच आपण जीवनाच्या विविध पैलूंचा अधिक चांगला अनुभव घेऊ शकता.
बदल स्वीकारणे हे केवळ मानसिक दृढता दर्शवणारेच नाही, तर जीवनातील विकासाचे संकेतही आहे. ज्याने बदल स्वीकारले, त्याने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नव्या क्षितिजांची गाठ घेतली आहे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपल्याला बदलांना स्वीकारणे आणि त्यांच्यावर यशस्वीपणे मात करणे आवश्यक आहे. प्रत्येक बदल एक नवीन शिक, एक नवीन दृष्टीकोन देतो आणि आयुष्याच्या मार्गावर एक महत्वाचे पाऊल ठरतो. बदलाच्या या प्रवासात, आपले मन आणि आत्मा दृढ ठेवून, त्यात सामोरे जाऊन, आपण नवीन संधींचा लाभ घेऊ शकतो.. आणि, आत्मविकासाच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो.
८. बोलायला शिका.
बोलणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं लाखो किंमतीचं सोनंही विकलं जात नाही.. असं आपल्याला जुन्या पिढ्यांचे लोक सांगून गेलेत. पण ते अस का बोलले असतील याचा विचार आपण कधी केलाय का? कारण जोपर्यंत आपण बोलायला किंवा संवाद साधायला शिकत नाही तोपर्यंत व्यक्तीमध्ये व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण विकसित होत नाही. बोलायला शिका म्हणजे केवळ शब्दांची उधळण नव्हे तर विचारांची मांडणी आहे. कारण बोलायला शिकणे हा सातत्यपूर्ण आणि जीवनभर चालणारा महत्वाचा प्रवास आहे. ज्यामुळे आपले जीवन अधिक अर्थपूर्ण व यशस्वी बनत जाते. संवाद साधण्याची कला ही फक्त वैयक्तिकच नाही तर व्यावसायिक जीवनात सुद्धा मोलाची भूमिका बजावत असते.
बोलणे ही कला आपल्याला सामाजिक व व्यक्तिगत आयुष्यात ओळख आणि प्रतिष्ठा मिळवून देत असते. पण बोलतानाही आपल्या संयमाचं तारतम्य टिकवन् महत्वाचं ठरतं. आपलं बोलणं हे स्वरक्षणार्थ असो किंवा बाजू मांडण्याचं हे अगदी तंतोतंत मुद्द्यांना धरुनच असावं. कारण शांत असलेल्या व्यक्तीचा पुरेपूर वापर लोकांकडून केला जातो.. आणि, बोलणाऱ्या व्यक्तीला मात्र कोणी चुकूनही डिवचत नाही. आपल्या शब्दांनाही तेव्हाच धार येते जेव्हा आपल्या बोलण्यामध्ये ठामपणा व प्रामाणिक उद्देशाची जोड असते. आपलं बोलणं हे गवताच्या पात्यालाही तलवारीची धार आणणार असावं पण एखाद्याच्या मनाला जिव्हारी लागेल अस मुळीच असू नये. कारण आपले शब्द हे मोलाची भूमिका बजावत असतात पण हे कधी होतं.. जेव्हा, आपली वेळ चांगली असते. जेव्हा आपण काहीच नसतो तेव्हा आपल्या अमृततुल्य विचारांना सुद्धा समाज स्वीकारत नाही परंतु आपण जेव्हा स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलेलं असतं तेव्हा मात्र आपल्या प्रत्येक शब्दाला मोत्याचं स्वरूप आपोआप प्राप्त होत जातं.
आपलं बोलणं हे आपल्या विचारधारेशी एकरूप आणि प्रामाणिक असायला पाहिजे, आपण आपल्या विचारांशी इतके ठाम असलो पाहिजे की समोर हजारो लोकांची गर्दी असली तरीही आपल्या शब्दांमुळे त्यांच्यात चैतन्य निर्माण व्हायला हवं. बोलताना मनात कधीही भीती नसावी, कारण ती भीती आपल्या शब्दांना किंबहुना त्या शब्दांच्या अर्थाला अर्थहीन करत जाते. बोलताना आपल्या शब्दांमध्ये विनयशीलता ही महत्त्वपूर्ण बाब आहे, आपल्या शब्दांमध्ये विनाकारण निरर्थक संदर्भाचा वापर टाळावा, यामुळे बोलणं मोजकं.. आणि, शब्दांचं चारचौघांमध्ये वजन वाढतं.. एक उत्कृष्ट वक्ता तेव्हाच बनता येतं जेव्हा आपण चांगले श्रोते असतो. कारण ऐकताना आपल्या मनाचा संयम हा बोलताना त्या विषयाला अनुसरून करत असलेल्या चर्चेत मोलाची भूमिका बजावत असतो. शब्दांचे खेळ हे तेव्हाच जमतात जेव्हा आपल्याकडे ऐकण्याची वृत्ती असते. जोपर्यंत आपण ऐकणार नाहीत तोपर्यंत आपलं बोलणही कोणी ऐकत नाही. तथापि हे श्रोता असण्याचं कौशल्य हे आपल्या पडतीच्या काळातच विकसित होतं.. कारण, तेव्हा आपल्याकडे विचार करायला, अनुभव घ्यायला आणि वाचन करायला पुरेसा वेळ असतो. आपण जितकं वाचतो तितक्याच एकषर्षाने आपले विचार हे ज्वलंत आणि धारदार बनत जातात.
आपण आपल्याच विचारांना बोलण्यापूर्वी पडताळून बघण्याची सवय लावली तर हा समाजही आपल्या शब्दांना आपसूकच स्वीकारत जातो. आणि, आपलं नाव पटलावर गाजायला प्रारंभ होतो.
बोलणे म्हणजेच विचारांचे रूपांतर प्रत्यक्ष संवादात करणे. ‘शब्दांची शक्ती विचारांच्या अंधारात प्रकाशाची किरणे फेकते,’ असे म्हंटले जाते. आपल्या विचारांचे प्रभावी भाषांतर करून संवाद साधण्याची कला म्हणजेच बोलण्याची कला. या कला द्वारे, आपण आपल्या भावनांचा, कल्पनांचा आणि दृष्टिकोनाचा प्रभावीपणे आदान-प्रदान करू शकतो. योग्य शब्दांचा वापर करून, आपल्याला आपल्या इच्छां, उद्दिष्टांची आणि अपेक्षांची स्पष्टीकरण करण्याची क्षमता मिळते. यामुळे, बोलणे हे फक्त व्यक्तिमत्वाची ओळख नाही, तर जीवनाच्या विविध अंगात यश मिळवण्यासाठी अनिवार्य आहे.
तज्ज्ञांचा हा विचार आहे की, ‘संबंध निर्माण करणे आणि प्रभावी संवाद साधणे हे बोलण्याचे दोन मुख्य पैलू आहेत.’ बोलणे हे फक्त विचारांची देवाणघेवाणच नाही, तर इतरांसोबतचे संबंध जिवंत ठेवण्याचे आणि सुधारण्याचे माध्यम आहे. प्रत्येक संवादात, आपण इतरांशी सहानुभूती, समजूतदारपणा आणि आत्मविश्वास दर्शवू शकतो. त्यामुळे, बोलण्याच्या माध्यमातून संबंधांना मजबूत करता येते आणि एकत्रित काम करण्याची क्षमता विकसित केली जाते.
व्यावसायिक दृष्टीकोनातून, ‘प्रभावी संवाद म्हणजेच नेतृत्वाची कुंजी,’ असे म्हंटले जाते. व्यवसायाच्या किंवा नेतृत्वाच्या क्षेत्रात, शब्दांच्या ताकदीचा प्रभाव अत्यंत महत्वपूर्ण असतो. निर्णय घेण्याची प्रक्रिया, संघातील सहकार्य आणि प्रोजेक्टच्या यशात प्रभावी संवादाचे महत्व अनमोल आहे. ‘शब्द आपल्याला जिंकतात किंवा हरवतात,’ हे लक्षात ठेवून, प्रभावी आणि सुसंगत संवाद साधणे आवश्यक आहे. या माध्यमातून, आपल्याला आपल्या उद्दिष्टांची प्राप्ती सहजतेने होऊ शकते आणि व्यवसायातील यश वाढवता येते.
पण… ‘कधी-कधी शब्द हे तात्कालिक समाधान देतात.. त्यांच्या दीर्घकालीन परिणामांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे.’ बोलण्याच्या क्षणिक सुखद परिणामाच्या अलीकडे, त्याच्या दीर्घकालीन प्रभावाचे मूल्यांकन करणे महत्वाचे आहे. शब्दांचे वापर आपल्या संबंधांचे, संधींचे आणि आयुष्याचे एक मोठे अंग असतात. आपल्या संवादाच्या परिणामांचा विचार करून, योग्य शब्दांची निवड करणे आणि त्यांच्या परिणामांची तपासणी करणे आवश्यक आहे.
शेवटी, ‘शब्द हे विचारांच्या यथार्थतेचे प्रतीक असतात,’ हे ध्यानात ठेवून बोलणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. विचारांचे प्रभावी पद्धतीने भाषांतर करून, आपण जगाच्या विविध स्तरांवर प्रभाव पाडू शकतो. संवादाच्या माध्यमातून, आपल्याला आपल्या विचारांची, भावना आणि उद्दिष्टांची स्पष्टता वाढवता येते. म्हणून, बोलण्याचे महत्त्व स्वीकारून, आपल्या संवादाच्या कौशल्यात सुधारणा करून, आपण आपल्या जीवनात आणि समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो.
शब्द आणि विचारांचा समतोल साधणे म्हणजे संवादाच्या प्रभावीतेला महत्त्वाचे आहे. ‘शब्दांचे वजन विचारांपेक्षा अधिक असू शकते,’ असे म्हटले जाते, कारण प्रत्येक शब्दाचा परिणाम आपल्यावर आणि इतरांवर मोठा असतो. विचार हा मुळात अंतर्गत असतो. पण त्याचे बाह्य रूप म्हणजे शब्द, शब्द आपल्या विचारांना प्रकट करतात, त्यामुळे त्यांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. संवाद करतांना, आपल्याला विचारांचा विचार करूनच शब्दांची निवड करावी लागते. जसे विचार स्पष्ट आणि योग्य असावे लागतात, त्याचप्रमाणे शब्द हे विचारांचे योग्य प्रतिनिधी असावे लागतात.
विचारांचे अचूक प्रकटीकरन होणे हे संवादाच्या यशाचे मुख्य अंग आहे. ‘शब्द हे विचारांचे कागदावरील चित्र आहेत,’ असे म्हणता येईल. म्हणजेच, आपल्या विचारांना शब्दांमध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे, पण हे शब्द विचारांच्या अर्थाची अचूक आणि पूर्ण प्रतिनिधित्व करायला पाहिजे. उदाहरणार्थ, एका मुद्द्यावर असमंजस संवादामुळे गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे विचार स्पष्ट असावे लागतात आणि त्यांना योग्य शब्दांमध्ये व्यक्त करणे आवश्यक आहे.
संवादाच्या प्रभावीतेसाठी, विचारांचा समतोल आणि शब्दांचा वापर ही दोन प्रमुख बाबी आहेत. ‘शब्दांचा अर्थ आणि विचारांची स्पष्टता यांचा समतोल साधल्यासच संवाद प्रभावी होतो,’ हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. संवाद करतांना, विचारांची योग्य मांडणी आणि शब्दांची योग्य निवड हा यशस्वी संवादाचा पाया आहे. विचारांच्या गहनतेचा आदर ठेवून आणि शब्दांच्या अचूकतेचा वापर करून, आपण संवाद अधिक प्रभावी आणि परिणामकारक बनवू शकतो.
बोलताना शब्द आणि विचारांचा समतोल साधणे म्हणजेच संवादाच्या गतीला चांगली दिशा देणे. ‘सत्य आणि प्रामाणिकतेचा उपयोग करतांना विचारांच्या यथार्थतेची काळजी घ्या,’ असं म्हटलं जातं. विचारांमध्ये विशिष्टता आणि स्पष्टता ठेवून, त्यांना शब्दांमध्ये अचूक रूप देणे आवश्यक आहे. हे न करता, शब्द विचारांचे प्रतिनिधित्व चुकवू शकतात आणि संवादात गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, संवादाच्या प्रत्येक टप्प्यावर विचार आणि शब्दांचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. शेवटी.., ‘शब्द आणि विचारांचे एकसूत्रीकरण संवादाचा आत्मा आहे,’ असे म्हणता येईल. संवादामध्ये विचारांची आणि शब्दांची सुसंगतता असली पाहिजे. विचार हे संवादाचे आत्मा असतात आणि शब्द हे त्याचे रूप असतात. विचार आणि शब्दांमध्ये संतुलन साधून, आपण संवादामध्ये स्पष्टता, परिणामकारकता, आणि प्रभावीतेची प्राप्ती करू शकतो. या संतुलनाच्या माध्यमातून, आपण नोकरीतील, वैयक्तिक, आणि सामाजिक संवादांमध्ये उत्कृष्टता साधू शकतो.
प्रखर वक्तृत्वशैली म्हणजेच प्रभावी आणि उत्साहजनक बोलण्याची कला. या शैलीचा प्रभाव असा असतो की, ती गवताच्या पात्यालाही धार आणते, म्हणजेच ती अत्यंत परिणामकारक असते आणि अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवू शकते. वक्तृत्वशैली ही केवळ बोलण्याचा किंवा भाषणाचा भाग नसून, ती एक कला आहे जी व्यक्तीच्या मनातील विचार, भावना आणि दृष्टिकोन प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवते. वक्तत्वशैलीचे महत्व अनेक स्तरांवर दिसून येते. ती एक प्रेरणादायी शक्ती असते जी लोकांना त्यांच्या ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करते. नेतृत्त्वात, समाजात आणि वैयक्तिक जीवनात वक्तृत्वशैलीचे अनन्यसाधारण महत्व आहे. महान नेते जसे की महात्मा गांधी, मार्टिन ल्यूथर किंग जूनियर, आणि वॉरेन बफेट यांच्या वक्तृत्वशैलीने लोकांवर गाढा प्रभाव टाकला आहे.
प्रेरणादायी वक्तृत्वशैलीच्या काही मुख्य घटकांमध्ये आत्मविश्वास, स्पष्टता, सुसंगतता, आणि भावनात्मकता यांचा समावेश होतो. वक्ता जेव्हा आत्मविश्वासाने बोलतो तेव्हा त्याच्या शब्दांना एक विशेष वजन आणि महत्व प्राप्त होते. स्पष्टता म्हणजे वक्ताने दिलेला संदेश नेमका आणि समजण्यास सोपा असावा. सुसंगतता म्हणजे विचारांची आणि मुद्द्यांची सलगता असावी, ज्यामुळे श्रोत्यांच्या मनात कुठलाही गोंधळ निर्माण होणार नाही. भावनात्मकता म्हणजे वक्त्याने आपल्या भाषणात भावना ओतून बोलणे, ज्यामुळे श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श होतो. प्रखर वक्तृत्वशैलीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे सत्यता आणि प्रामाणिकता. वक्ता जेव्हा प्रामाणिकपणे आणि सत्यतेने बोलतो.. तेव्हा, त्याच्या शब्दांचा प्रभाव अधिक वाढतो. अशा भाषणांमध्ये वक्ताच्या वैयक्तिक अनुभवांचा समावेश असतो, ज्यामुळे श्रोत्यांना ते भाषण अधिक भावते.
उदाहरणार्थ, कल्पना करा की, एका विद्यार्थ्याला त्याच्या शाळेतील भाषण स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. त्याच्या प्रखर वक्तृत्वशैलीमुळे तो श्रोत्यांना आणि परीक्षकांना आपल्या बाजूला घेऊन जाईल. त्याच्या आत्मविश्वासाने, स्पष्ट विचारांनी, आणि भावनात्मक शब्दांनी तो आपल्या विचारांची प्रभावीपणे मांडणी करेल. अशा भाषणामुळे त्याला विजय मिळवण्याची संधी अधिक असेल. वक्तृत्वशैलीच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होते.., जी समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाची आहे. ती एक प्रेरणादायी शक्ती आहे. जी.., लोकांना त्यांची क्षमता ओळखायला लावते आणि त्यांना त्यांच्या ध्येयाच्या दिशेने चालायला प्रोत्साहित करते. म्हणूनच, प्रखर वक्तृत्वशैली ही केवळ गवताच्या पात्यालाही धार आणते असे नाही.. तर, ती मनुष्याच्या जीवनालाही एक नवीन दिशा देऊ शकते.
९. स्वतःची लढाई स्वतः लढा!
कौरवांनी धर्मराजाला पकडण्यासाठी चक्रव्यूहाची रचना केली, त्या चक्रव्यूहाला भेदण्यासाठी अर्जुनपुत्र अभिमन्यू युद्धात उतरला.. आणि, चक्रव्यूह भेदताना तो धारातीर्थी पडला हे आपल्याला ठाऊकच आहे, पण यापलीकडे जर जाऊन विचार केला तर, तिथे अनेक महावीर असताना देखील अभिमन्यू स्वतः चक्रव्यूहात उतरला. कारण अभिमन्यूला या गोष्टीची पूर्ण कल्पना होती.. की, त्याच्याशिवाय चक्रव्यूह भेदून जाण्याची क्षमता त्या क्षणी कोणामध्येही नव्हती. आपल्याला आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी अश्या कित्येक लढाया आणि युद्ध लढावे लागणार आहेत. जिथे.., आपली इच्छाशक्ती ही आपल्या विरुद्धच उभी ठाकली जाईल. पण खरा योद्धा तोच असतो जो परिस्थितीच्या, प्रवाहाच्या विरोधात जाऊन ते युद्ध लढतो. त्या युद्धाच्या परिणामाची चिंता ज्याच्या मनी असते तो कदाचित पावले मागे घेऊ शकतो.. पण, ज्याला स्वतःवर आणि स्वकर्तृत्वावर विश्वास आहे तो जय पराजयाची फिकीर न करता रणांगणात उतरतो.
प्रत्येकाच्या आयुष्यात भूतकाळामधे असे बरेच प्रसंग घडून गेलेले असतात किंवा घडणार असतात जिथे आपल्या लढाईसाठी आपण दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून बसलेलो असतो.. आणि, आपण तिथेच फसतो., युद्धामध्ये साथ देणारा अचानक साथ देण्यास नकार देतो. आणि त्या युद्धाचे कोणतेही अनुभव नसताना आपल्याला एकट्यालाच सामोरं जावं लागत. सांगण्याचा उद्देश हाच कोणी कितीही सोबत असेल अथवा नसेल तरी आपली लढाई ही आपल्यालाच लढायची असते.
जो व्यक्ती जेवढा जास्त एकटा पडतो तो तेवढाच लढवय्या बनत जातो. भविष्यात येणारे आभाळाएवढे अडथळे सुद्धा त्याला मातीमोल वाटू लागतात. बऱ्याचदा काय होतं… आपल्यावर वाईट वेळ येते, केसेस होतात, लोकं नाव ठेवतात.. आणि, त्या कार्यकाळात ज्या आपल्या जवळच्या व्यक्तींकडून आपल्याला मदतीची, साथीची, आणि आधाराची अपेक्षा असते.. नेमकी.., तीच लोकं साथ देण्यास नकार देतात. का ? तर.., त्यामधे आमची सुद्धा नावे नको यायला.
पण.., या सगळ्या चिखलात तो व्यक्ती एका बंद खोलीमध्ये बसून एकटाच रडतो.., पडतो.., लढतो.. आणि, स्वतः ढाल बनून या सर्व गोष्टींमधून बाहेर पडतो. मग, बाहेर आल्यानंतर तीच लोक म्हणायला लागतात की, अरे वाह आम्हाला माहीत होत तू नक्कीच करून दाखवशील., तुझ्यामध्ये होती तेवढी धमक आणि आम्ही तुझी वाटच बघत होतो.
आणि मग तो व्यक्ती बोलू लागतो की, जेव्हा मला तुमच्या आधाराची गरज होती तेव्हा तुम्ही पळ काढला, आता मला तुमची गरज नाहीये पुन्हा माझ्या आजूबाजूला सुद्धा दिसू नका. आणि मग तीच लोक बोलायला लागतात की अरे। याला तर गर्व झालाय, हा असाच होता अगोदरपासून! पण, ज्या व्यक्तीने आयुष्यात खूप जास्त उतार-चढाव बघितलेले असतात तोच व्यक्ती इतरांच्या ठाईट प्रसंगी धावून जातो.. तो गर्वाच्या छत्रछायेखाली कधीच रेंगाळत बसत नाही, कारण त्याने बघितलेले असतात ते दिवस जेव्हा आपलयाकडे काहीच नव्हते.
सांगण्याचा उद्देश हाच की तो गर्व नसतोच मुळात तो आपल्या आतमधून आलेला निनाद असतो. जो, क्षणोक्षणी या गोष्टीची आठवण करून देतो की, I’m Something! आपल्याला आता लोकांच्या खोट्या आधाराची गरज नाही. ही भावना जेव्हा मनात उत्पन्न होते तेव्हा मोठ्यातल्या मोठ्या संघर्षाला नियतीने पूर्णपणे तयार केलेलं असतं. कारण देवही लढण्याचं बळ त्यालाच देतो जो पूर्ण क्षमतेने फळाची अपेक्षा न करता कर्मसिद्धांतावर चालत असतो. माणसाच्या आयुष्यात चुका होणारच.., त्या चुका स्वीकारून त्यात बदल घडवत ज्याला ठामपणे तोंड देता येतं तोच व्यक्ती खरा योद्धा असतो. आज जी परिस्थिती आहे तिच्यात न गुरफटता ज्या व्यक्तीला फक्त ध्येय प्राप्त करायचं आहे तो व्यक्ती तुटलेल्या तलवारीच्या साहाय्याने सुद्धा जिंकतो.. हे लक्षात घ्यायला हवं.
आपण कर्णाबद्दल बोलतो.. पण, एक गोष्ट आपण कधी समजून घेतली आहे का? की, कर्ण त्याच्या कवचकुंडलांमुळे महारथी नव्हता. कर्ण त्याच्याकडे असलेल्या क्षमतेमुळे महारथी बनला होता. चुकले असतील त्याचे निर्णय.. पण, म्हणून त्याच्या क्षमतांकडे डोळेझाक करून दुर्लक्ष केल्याने त्याच्यामध्ये असलेल्या कौशल्याला आपण नाकारू शकलो का? नाही!.. मग, आपणही या विचाराने लढायला हवं की आपला उद्देश हा लढण्याचा असावा.. ना की, फक्त कोणाच्या तरी विरोधात जिंकण्याचा किंवा कोणाला तरी हरविण्याचा. हे जीवन एक कुरुक्षेत्र आहे आणि या कुरुक्षेत्रावर आपणच अर्जुन.., आपणच कर्ण… आपणच भीष्म.. आणि आपणच श्रीकृष्ण आहोत. इथे प्रत्येक युद्ध हे आधी स्वतःविरुद्ध असतं मगच ते इतरांच्या विरोधात असतं.
परिस्थितीसमोर गुडघे टेकून स्वाभिमान गहाण ठेवण्यापेक्षा मृत्यू जरी समोर ठाकला तरीही लढण्याचं समाधान हे हरण्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त असतं आपले तत्व, आपले संस्कार या परिस्थितीमध्ये आपले शस्त्र अस्त्र म्हणून आपल्या कामी येतात. आपल्या वाईट काळात ज्यांनी आपल्याला झिडकारलं, ज्यांनी आपल्याला नाकारलं.. त्यांच्या वाईट काळात आपण त्यांच्याशी कसे वागतो यावर तुमचा लढवय्या स्वभाव खूप जास्त प्रमाणात प्रभाव टाकतो. योद्धा हा संवेदनशील असावा.., इतरांच्या भावना जपताना स्वतःच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचू न देणं.. हे खऱ्या योद्ध्याच आभूषण आहे. कारण परिस्थितीने दिलेल्या जखमा या त्या योद्धाचा श्रृंगार आहे. ज्या.. मागे वळून बघताना आपल्या मनातून आवाज येतो की अशक्य होतं पण आपण करून दाखवलं.. ही भावना युद्धातील विजयापेक्षा लढण्याचं समाधान देऊन जाते.
जी व्यक्ती आपल्या संघर्षाच्या काळात आधार म्हणून येते.., तीच व्यक्ती आपल्या चांगल्या दिवसांची भागीदार असते, पण सध्या वाईट काळात आधार देणारे सुद्धा लुप्त होत चालले आहेत.. खरं म्हणजे वाईट काळात आधार शोधण्यापेक्षा स्वतःला खंबीर बनवले तर भविष्यात येणारे अडथळे, अडचणी आपण योग्य पद्धतीने हाताळू शकतो.
‘स्वतःची लढाई स्वतः लढा’ या वाक्यात जीवनाच्या संघर्षात्मक प्रवासाचे मूलतत्त्व समाविष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात विविध आव्हाने आणि लढायांचा सामना करावा लागतो. या लढायांत, आपल्या अंतर्गत शक्तीला आणि आत्मविश्वासाला जागृत करणे अत्यंत आवश्यक आहे. दुसऱ्या कुणाच्या सहाय्याशिवाय किंवा त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय, प्रत्येकाने आपल्या स्वप्नांच्या दिशेने स्वतःच लढा देणे आवश्यक आहे. कारण, जीवनातील प्रत्येक लढाई आपली असते आणि त्याची तोंड देण्याची जबाबदारीही आपल्यावरच असते.
स्वतःची लढाई लढणे म्हणजेच आपल्या आंतरिक शक्तीला ओळखणे आणि तिचा उपयोग करणे. ‘स्वतःची क्षमता ओळखून त्यावर विश्वास ठेवणे हे आपल्या यशाचे प्राथमिक तत्त्व आहे.’ अनेक वेळा, दुसऱ्या लोकांच्या अपेक्षांचे वजन आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या किंवा कार्याच्या वातावरणातील दबावांमुळे वाढते. पण आपल्याला ते सर्व पार करून आपल्याच अंतर्गत क्षमतांचा शोध घेऊन आपली लढाई आपण लढावी लागते. हे म्हणजेच आपली मानसिकता मजबूत करणे, आत्मसंतुलन साधणे आणि प्रत्येक आव्हानाचा सामना साहसाने करणे.
स्वतःची लढाई लढणे हे एक शौर्याचे प्रतीक आहे. ‘असे लढायांचे थांग म्हणून जीवनाचा प्रत्येक संघर्ष आणि आव्हान स्वीकारणे म्हणजेच स्वतःच्या क्षमतांना सिद्ध करणे’ यामध्ये, आपल्याला आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे, समस्यांचा तडजोडीचा मार्ग शोधणे आणि आत्मसमर्पण न करता शर्थीन प्रयत्न करणे आवश्यक आहे. लढाई, आपल्या धैर्याचे.., मानसिक शक्तीचे.. आणि इच्छाशक्तीचे परीक्षण करते. यशाची गाथा फक्त त्या व्यक्तींची असते, ज्या आपल्या अंतर्गत युद्धात विजय मिळवतात.
या दृष्टिकोनातून, ‘स्वतःची लढाई स्वतः लढा’ या विचाराचे अनुसरण करणे म्हणजेच स्वतःला सिद्ध करणे आणि आपल्यातील सामर्थ्य शोधणे. ‘प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्गत संघर्षाची गाथा त्यांच्या आत्मिक समृद्धीचा भाग आहे.’ अनेक वेळा, बाह्य परिस्थिती आणि इतरांच्या अपेक्षांमध्ये अडचणी निर्माण होतात.., पण आपण आपल्या अंतर्गत उर्जेवर विश्वास ठेवून त्या परिस्थितीला तोंड देणे आवश्यक आहे. यानेच आपल्याला स्थिरता, शांतता आणि आत्मसंतोष मिळवता येतो.
शेवटी, ‘स्वतःची लढाई लढणे म्हणजेच आपल्या जीवनाच्या पथावर स्वप्नांच्या दिशेने आघाडी घेणे आहे.’ आपल्या जीवनातील प्रत्येक लढाई स्वतःच लढणे म्हणजेच आपल्या आंतरिक उर्जेला जागृत करणे आणि ती योग्य दिशेने वापरणे. आपले ध्येय साधण्यासाठी, आपल्याला आव्हानांना तोंड देऊन, धैर्य राखून आणि आत्मविश्वासाने परिपूर्णपणे लढणे आवश्यक आहे. या मार्गाने, आपण आपल्या अंतर्गत सामर्थ्याचे प्रदर्शन करू शकतो आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विजय मिळवू शकतो.
स्वतःची लढाई स्वतः लढा’ या विचाराचा स्वीकार करून, आपण स्वतःच्या क्षमतांचा विकास करू शकतो. आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो.. आणि, अंतर्गत उर्जेचा उपयोग करून आपल्या ध्येयांची प्राप्ती करू शकतो.
परिस्थिती आणि संकटाचा सामना करतांना स्वतःची ताकद आणि आंतरिक सामर्थ्य शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘ज्याला इतरांच्या आधाराची गरज नसते तोच खरा लढवय्या,’ हे विचार स्वतःच्या आत्मबलाच्या प्रखरतेला दर्शवतात. याचा अर्थ असा की, खरे यश आणि लढाईची विजयप्राप्ती म्हणजेच आपल्या आंतरात्मिक शक्तीला ओळखून आणि त्या शक्तीचा पूर्ण उपयोग करून परिस्थितीचा सामना करणे. प्रत्येक व्यक्तीला जीवनातील विविध संकटांचा सामना करावा लागतो, पण त्या संकटांवर मात करण्यासाठी आत्मनिर्भरता आणि अंतर्गत दृढता महत्वाची आहे.
आपल्याला असे मानावे लागते की, ‘संकटांची खरी परीक्षा आपल्या आत्मसामर्थ्याची असते.’ बाह्य आधाराची आवश्यकता नसून, आंतरात्मिक धैर्य आणि स्थिरता हा खरा आधार असतो. इतरांच्या सहाय्याशिवाय स्वतःच्या कष्ट आणि मेहनतीवर आधारित यश प्राप्त करणे म्हणजेच खरे पराक्रमाचे प्रदर्शन. जेव्हा आपल्याला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवता येतो आणि परिस्थितीच्या प्रतिकूलतेला तोंड देणे शक्य होते, तेव्हा आपण खरे लढवय्या असतो.
स्वतःच्या सामर्थ्यावर आधारित लढाई करण्याचा दृष्टिकोन आत्म-संवर्धन आणि आत्मविश्वासाच्या प्रमाणिकतेला दर्शवतो. ‘परिस्थितीचा सामना करण्यासाठी इतरांच्या मदतीची अपेक्षा न करता स्वतःच्या पायावर उभे राहणे हीच खऱ्या लढवय्याची लक्षणे आहेत.’ यामुळे, आपल्याला आपल्यातील सामर्थ्याचा उपयोग करून स्वतःच्या समस्यांचा सामना करणे आणि समाधान शोधणे शक्य होते. स्वतःवर विश्वास ठेवून, आपल्याला बाह्य आधाराशिवाय परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते.
तसंच, ‘संकटांचा सामना स्वतः करणे म्हणजेच आत्मविकासाच्या मार्गावर एक पाऊल पुढे जाणे,’ असे मानले जाते. आपल्याला परिस्थितीच्या प्रतिकूलतेशी जुळवून घेण्यासाठी आणि आपल्या क्षमतांचा अधिकृत वापर करण्यासाठी, स्वतःला योग्य पद्धतीने सिद्ध करणे आवश्यक आहे. त्यामुळे, खरे लढवय्या होण्यासाठी, आपल्याला स्वतःच्या बलावर विश्वास ठेवणे आणि परिस्थितीला तोंड देताना आपले सर्वोत्तम कार्यप्रदर्शन करणे आवश्यक आहे.
शेवटी, ‘संकटांवर मात करण्यासाठी आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी, आपल्या आत्मविश्वासाची आणि आंतरात्मिक सामर्थ्याची परीक्षा होते.’ यामुळेच, बाह्य आधाराची गरज न ठेवता, स्वतःच्या आंतरात्मिक सामर्थ्यावर आधारित संकटांचा सामना करणे हे खरे लढवय्याचे लक्षण आहे. स्वतःच्या कष्ट आणि सामर्थ्यावर विश्वास ठेवून, आपण प्रत्येक संकटाला सक्षमपणे पार करू शकतो.. आणि, जीवनातील प्रत्येक टप्प्यावर यश मिळवू शकतो.
कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। या श्लोकाने महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला परमज्ञान प्राप्त करून दिल होतं, आपल्या आयुष्यात या श्लोकाला प्रचंड असं महत्त्व आहे.. कारण, आपण जगत असताना एका वळणावर आपल्या संघर्षाचं फलित काय? हे चाचपडण्याचा आपण केविलवाणा प्रयत्न करतो.. आणि, आपल्या प्रयत्नात कसूर करतो, पण नकळतच आपण स्वतःच्या इच्छित ध्येयापासून दूर जाऊ लागतो.. अन् इथेच गोची होते. एकदा का आपण ठरवलं ना.. की, आता लढायच आहे.. मग, काय मिळेल.. काय गमवाव लागेल.. याचा विचार सोडूनच लढायला हवं. गरुड पक्षी जेव्हा गगनात भरारी घेतो तेव्हा तो संपूर्ण आकाश व्याप्त करत असतो.. तेव्हा तो हा विचार करत नाही की त्याचे संवगडी असलेले छोटे पक्षी काय विचार करतील, ते आपल्याला काय म्हणतील. त्याच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त त्याच्या भरारीचं ध्येय असतं आणि तो ते ध्येय आपल्या विशालकाय पंखाच्या छायेत घेऊन झेप घेतो.
त्यामुळे आता हे आपणच ठरवायला हवं की, भंपक अपेक्षांच्या कुबड्या घेऊन जगायचं? की, स्वतः परिस्थितीसमोर पाय रोवून स्वतःच युद्ध स्वतः लढायच!
१०. गुलामी नाही राज्य करा!
लहानपणापासून आपल्याला शिकवलं जात की, चांगलं शिक्षण म्हणजे चांगली नोकरी. आणि नोकरी चांगली असेल तर लग्नाला मुलगी सुद्धा चांगली मिळेल, या भ्रामक कल्पनांच्या मागे पळताना कित्येक तरुण आज धडपडत आहेत. कोणी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दहा दहा वर्ष प्रयत्न करतोय तर कोणी स्वतःच क्षेत्र बदलून दुसऱ्या क्षेत्रात तुटपुंज्या पगारावर काम करतोय. मुळात आपल्या मनावर आधीपासून बिंबवल जातं.., की, नोकरी केली तरच आपल्या गरजा पूर्ण होतील. या गरजा पूर्ण करताना आपसूक आपण त्या गरजांचे गुलाम बनत जातो आणि आपले स्वप्न विसरून फक्त हमाली करायला सुरुवात करतो. नक्कीच नोकरी ही काही चुकीची गोष्ट नाही पण नोकरी कोणी करावी, ज्यांना फक्त गरजा भागवायच्या आहेत त्यांनीच. एका ठरावीक काळापर्यंत नोकरी करणं नक्कीच चुकीचं नाही परंतु जर आपल्याला गुलामीच करायची आहे तर आपण स्वप्न बघणे सोडून देण्यात काहीच वावगं नाही. पण, जोपर्यंत आपल्या विचारांमध्ये राज्य करण्याची ठिणगी पेटत नाही तोपर्यंत साम्राज्य उभारणीचा वणवा हा भडकत नाही. नोकरी ही एका ठराविक काळानंतर मनात गुलामीची भावना निर्माण करते. रोजच्या तासांच्या गर्दीत आपण आपली हरवलेली स्वप्नं शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.. तेव्हा त्या स्वप्नांचा पत्ता सापडणं कठीण होतं.
नोकरी ही कदाचित आपण लाचारी म्हणून स्वीकारतो, घरच्या जबाबदाऱ्या, कर्ज अश्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठीच असते. लाखांचे पॅकेज घेणारी मंडळी शेवटी कोणाच्या तरी हकमाचे ताबेदारच. पण स्वतःच साम्राज्य असणाऱ्या लोकांना बघताना त्यांना स्वतःच्या गुलामगिरीची जाणीव झाल्याशिवाय राहतं नाही. आपल्याकडे व्यवसाय म्हटलं की मोठ ऑफिस, आठ दहा लोकांचा स्टाफ अशी भावना असते.. पण, मुळात स्वतःची रिक्षा चालवणारा, एखादी टपरी चालवणारा व्यक्ती सुद्धा व्यावसायिकच आहे.
नोकरी वाईट आहे असं मी बिलकुल म्हणत नाहीये, मुळात नोकरी वाईट नाहीच पण एका विशिष्ट कालावधीपर्यंत. नोकरी आपल्याला खूप काही शिकवते मग ते व्यवस्थापन असो किंवा वेळेचे नियोजन असो. पण.. जेव्हा आपण नोकरीच्या माध्यमातून एखाद्या क्षेत्रात चांगले कौशल्य गुण आत्मसात करतो तेव्हा त्या कलागुणांचे रूपांतर आपल्याला आपलं स्वराज्य उभा करण्यात कसं कामी येईल याचा विचार नेहमी मनात घोंगावत राहिला पाहिजे. खर तर व्यवसाय करण्याची आणि स्वतःचं साम्राज्य बनवण्याची भावना ही आपल्या अंतर्मनातून जागृत व्हायला हवी. कारण आजही समाजात असे खूप तरुण आणि तरुणी आहेत जे नोकरी करता करता सुद्धा आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने हाताळतात आणि चांगले पैसे कमावतात. नोकरी आणि व्यवसायाचा समतोल साधताना आपल्या गरजा आणि स्वप्नं पूर्ण करणे ह्या दोन्ही गोष्टी संतुलित होणं फार गरजेचं आहे. आज आपल्या गरजा या महिन्याकाठी ३०-३५ हजारात पूर्ण होतात पण पुढच्या वीस वर्षानंतर परिस्थिती वेगळी असेल आणि हाच खर्च लाखाच्या घरात जाणार आहे. कारण, दवाखान्याचा खर्च, घरखर्च, सण, समारंभ, शैक्षणिक खर्च अश्या पद्धतीने हा खर्च वर्षानुवर्षे महागाई सोबत वाढत जाणार आहे. त्यामुळे व्यवसाय करताना आपल्या कौशलयाचा वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आज व्यवसाय म्हणजे फक्त एक काउंटर आणि पैसे जमा करण्याचा गल्ला राहिला नसून आता जग वेगाने बदलत आहे. अश्या अनेक गोष्टी आहेत ज्यातून आपण व्यवसाय करू शकतो. कोणी आपल्या कलेचा उपयोग करून… कोणी आपल्या व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून आज लॅपटॉप, मोबाईल या साधनांचा वापर करून उत्तम व्यवसाय करत आहेत.
व्यवसाय म्हणजे आपल्याकडे असलेल्या उत्तम अश्या कौशल्याचा वापर करून लोकांच्या अडचणी दूर करून त्यांना सेवा देणे. मग आपण अश्या कुठल्या गोष्टी करू शकतो ज्यामुळे आपण अडचणी दूर करताना पैसे कमवू शकतो याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण स्वतःच साम्राज्य उभं करताना आपलं साम्राज्य इतरांच्या साम्राज्यापेक्षा कसं प्रभावशाली आणि सोयीस्कर आहे हे अतिशय महत्वाचं ठरतं. समाजातल्या बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करणं आणि त्यावर आपल्या कल्पना अंमलात आणून जेव्हा त्या अडचणींवर आपण मात करतो तेव्हाच आपण लोकांचा विश्वास संपादन करतो आणि आपल्या साम्राज्याची नीव मजबूत करत जातो. आपण किती विचार करतो त्यावर आपल्या संपत्तीची स्त्रोते अवलंबून राहतात. एक छोटासा कामगार रोजच्या भाकरीची सोय होईल अस काम करतो, त्यानंतर येतात नोकरदार जे महिन्याचा पगार होईल अश्या मार्गाने काम करतात आणि त्यानंतर असतात ते मोठ्या पॅकेजेससाठी काम करणारे, पण त्याही पलीकडे जाऊन काम करणारे लोक असतात. ज्यांचा उद्देश नोकऱ्या देण्याचा आणि मोठा पैसा कमावण्याचा असतो. या लोकांना दूरदृष्टी असते. यांच्याकडे असतं आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे याचं परिपूर्ण नियोजन.. कारण यांच्याकडे प्लॅन A किंवा प्लॅन B नसतो. त्यांच्याकडे असतं ते म्हणजे करा किंवा मरा असं धोरण, त्यामुळे ही माणसं इतक्या झोकून दिल्यासारखे काम करतात की एक दिवस त्यांच्या विचारांना, त्यांच्या स्वप्नांना वास्तविक स्वरूप मिळतं.. आणि, ही माणसं शिखर गाठणाऱ्या लोकांच्या यादीत आपलं स्थान पक्के करून जगत राहतात.
“गुलामगिरी नाही, राज्य करा” या वाक्यात एक महत्त्वपूर्ण आणि विद्रोही विचार व्यक्त केला आहेः गुलामगिरीच्या स्थितीतून बाहेर पडणे आणि स्वातंत्र्य मिळवणे. हे वाक्य स्वातंत्र्य, समानता, आणि आत्मनिर्भरतेच्या विचारांच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. याचा अर्थ आहे की, व्यक्तीला आपल्या हक्कांची, स्वातंत्र्याची आणि सन्मानाची मागणी करण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी तळमळ करून संघर्ष करणे आवश्यक आहे.
गुलामगिरी म्हणजे एक अशी अवस्था जी व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करते. इतिहासातील विविध काळांमध्ये आणि विविध समाजात गुलामगिरीची स्थिती उभी राहिली आहे.. यामध्ये, त्यांनी आपली स्वतःची ओळख, विचारसरणी, आणि आकांक्षा यांचा अभाव अनुभवला. “गुलामगिरी नाही” म्हणजेच या स्थितीला नकार देणे आणि स्वतंत्रता, समानता आणि मानवता यांचे समर्थन करणे.
स्वातंत्र्य प्राप्त करणे म्हणजेच स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवणे आणि आपली जीवनशैली स्वतंत्रपणे निवडणे. “राज्य करा” या विचाराचे अनुसरण करून, व्यक्तीला केवळ स्वतःच नाही तर समाजातील इतर सदस्यांना देखील आत्मनिर्भर बनवण्याचे, सशक्त बनवण्याचे आणि त्यांच्या अधिकारांची पूर्तता करण्याचे काम करावे लागते. राज्य करणे म्हणजेच स्वतंत्रतेच्या आणि हक्कांच्या आस्थापनासाठी प्रयत्नशील राहणे आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि नेतृत्व प्रदान करणे.
ही कल्पना फक्त व्यक्तिगत स्तरावरच नाही तर समाजाच्या व्यापक दृष्टीकोनातूनही पाहिली जाऊ शकते. समाजात गुलामगिरीच्या स्थितीला नकार देणे आणि स्वतंत्रतेची कल्पना स्वीकारणे, समाजाच्या प्रगतीसाठी एक मोठा टप्पा आहे. “गुलामगिरी नाही, राज्य करा” हे एक आदर्श उद्दिष्ट आहे, ज्यात आपल्याला त्यांच्या क्षमता, हक्क आणि समानतेवर विश्वास ठेवून सामाजिक आणि व्यक्तीगत स्वातंत्र्याची प्राप्ती करणे अपेक्षित आहे.
शेवटी, हा विचार व्यक्तिगत व सामाजिक स्वातंत्र्याची, अधिकारांची आणि मानवी सन्मानाची बातमी देतो. या विचाराचा प्रगल्भतेने स्वीकार करून, आपण गुलामगिरीच्या अंधकारमय स्थितीला नकार देऊन, एक स्वतंत्र, समान आणि सशक्त समाजाची दिशा ठरवू शकतो. यामुळे, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या संभावनांची उंची गाठता येईल आणि एक आदर्श समाजाची निर्मिती शक्य होईल.
आजच्या जगात चिक्कार पैसा किंवा पॉवर या दोन गोष्टी प्रचंड परस्परपूरक आहेत, पैसा तेव्हाच येईल जेव्हा तुमच्याकडे पॉवर असेल किंवा तुमच्याकडे पॉवर तेव्हाच येईल जेव्हा तुमच्याकडे खूप पैसा असेल. त्यामुळे तरुणांनो चुकीच्या भ्रमात राहू नका की पैसा हा हाताचा मळ आहे. जो केव्हाही येतो आणि केव्हाही जातो. जर तुम्हाला वर्चस्व हवं असेल तर पैसा कमवा. नाहीतर, पैसा कमवायचा असेल तर तुमचं वर्चस्व सिद्ध करा. बरीच मंडळी येतात आणि सांगून जातात की, पैशात काय ठेवलंय, पण मित्रांनो सगळ काही पैशातच आहे. आपली स्वप्न पूर्ण करायचीये, आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायचीये.. तर, त्यासाठी पैसे महत्वाचे आहेतच, कमाई शून्य व्यक्तीला स्वतःच्या राहत्या घरात सुद्धा किंमत नसते पण जेव्हा खिसा भरलेला असतो तेव्हा समाज सुद्धा त्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन नाचतो.
गुलामी आणि स्वातंत्र्य यांच्यातील संघर्ष हा एक ऐतिहासिक आणि सामाजिक मुद्दा आहे. ‘गुलामी सोडा आणि स्वतः साम्राज्य निर्माण करा’ या विचारात, आपल्याला गुलामगिरीच्या अंधारातून बाहेर पडून स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते. गुलामगिरी म्हणजे एक अशा स्थितीचा अनुभव जिथे व्यक्तीला स्वातंत्र्याचा अभाव आणि स्वप्नांची नाकारण्याची स्थिती असते. या परिस्थितीतून मुक्त होण्यासाठी, व्यक्तीला स्वतःच्या आंतरिक शक्तीचा वापर करून एक सशक्त आणि स्वतंत्र भविष्य घढावे लागते. ‘स्वतंत्रता म्हणजेच तुमच्या क्षमतांचा आणि सामर्थ्यांचा पूर्ण उपयोग करणे,’ हे मानले जाते. आपल्या सामर्थ्याचा आणि अधिकारांचा योग्य वापर करून, व्यक्तीने स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे आणि एक साम्राज्य उभारावे जे त्याच्या स्वप्नांचे आणि आकांक्षांचे प्रतिबिंब असेल. – यामुळे, सामाजिक बदलाची आणि व्यक्तिगत यशाची नवीन दिशा खुली होते.
आपल्याला एक सशक्त जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेलया सर्व घटकांची माहिती प्राप्त होते. ‘स्वतंत्रता म्हणजे आपल्याला आपल्याच आवडीच्या आणि आकांक्षांच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळवणे’ असे मानले जाते. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून, आणि योग्य निर्णय घेऊन व्यक्तीने स्वतःच्या साम्राज्याची निर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तो आपल्या जीवनातील सर्व संकटांचा सामना करू शकतो.. आणि, जीवनात आवश्यक असलेले सकारात्मक बदल घडवू शकतो. ‘स्वतंत्रता आणि साम्राज्य निर्माण’ हे एक आदर्श ध्येय आहे, जे आपल्याला आत्मनिर्भरतेची, समृद्धीची आणि सशक्तीकरणाची दिशा देतो. त्यामुळे, या प्रकरणाचा समारोपात हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, प्रत्येक व्यक्तीने गुलामगिरीच्या अंधारातून बाहेर पडून, आत्मविश्वास आणि सामर्थ्याच्या आधारावर एक स्वतंत्र आणि सशक्त भविष्य गढावे. याच मार्गाने व्यक्ती आणि समाजाच्या विकासाची नवीन दिशा खुली होते.
११. गुरू कोणाला करावे?
स्वामी विवेकानंद हे त्यांच्या गुरूच्या शोधात बरेच भटकत होते, ज्या कुठल्या ज्ञानी लोकांकडे स्वामीजी जात तिथे ते त्या लोकांना विचारत की तुम्ही देव पाहिला आहे का? पण प्रत्येक वेळी समोरून उत्तर नकारार्थी येई. आता आपल्याला गुरू मिळेल की नाही ही शंका त्यांच्या मनात सुरू असताना त्यांची भेट आदरणीय रामकृष्ण परमहंस या विद्वानाशी झाली. स्वामींनी त्यांना विचारलं, तुम्ही देव बघितला आहे का? परमहंसांनी प्रसन्न मुद्रेने त्यांच्याकडे बघितलं.. आणि, प्रतिप्रश्न केला, तुला बघायचा आहे का देव? मग बस इथे! स्वामीजींनी ते उत्तर ऐकून रामकृष्णांचे पाय धरले आणि म्हणाले की गुरुदेव माझा तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा. विवेकानंदांना गुरू मिळाले.., पण, आजच्या जगात आपण नेमके गुरू कोणाला करावे हे बघणं अतिशय महत्त्वाची बाब आहे. आज समाजात जी परिस्थिती आहे ती बघता आपल्याला सल्ले देणारे फार पण मार्ग दाखवणारे कोणीच नाही.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून वेगवेगळ्या माध्यमातून आजची पिढी त्यांचे आदर्श असलेल्या लोकांचे फोटो, व्हिडिओ ठेवून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करताना बघितलं. नक्कीच प्रत्येक जण कोणासाठी ना कोणासाठी आदर्श आहे हे पाहून आनंद वाटला पण आता थोडं थांबायला हवं: आपले आदर्श व्यक्तिमत्त्व भरकटलेले असुनही आपण त्यांना गुरुतुल्य म्हणतो आहोत. अगल गुन्हेगारांचे फोटो पोस्ट करून भेटला विठ्ठल म्हणणारी ही पिलावळ गुरू शिष्य परंपरेला खीळ बसवते आहे. हे लक्षात येऊनही ढिम्मपणे आपण रोज पाहत आहोत. गाड्यांवर छत्रपतींचे स्टिकर्स लावून, केसांचे झपके करून, धर्मांधतेच्या गप्पा मारत दहशतींच सावट आणू पाहणाऱ्या या गुरूंना खतपाणी मिळतं तरी कुठून याचा सखोल विचार व्हायला हवा. आजच्या समाजमाध्यमांच्या दुनियेत मावळत्या आणि उगवत्या पिढ्या एका भयंकर अश्या तफावतीने झाकोळून गेल्याचं भीषण असं चित्र या बुद्धिजीवी समाजासमोर उभं राहिलं आहे. राष्ट्राने प्रगती नक्कीच करावी.. पण, ही प्रगती योग्य पथावर चालून होतेय का? याचं निराकरण कोणी करावं? काळाच्या ओघात या पिढ्या शैक्षणिक अर्हता प्राप्त न करता आज श्रीमंत होण्याचं स्वप्न बघून काहीतरी करू पाहत आहेत.. आणि, हीच विदारक परिस्थिती राहिली तर गुरू-शिष्य म्हणवून घेण्याला अर्थच काय उरतो. संपत्तीने आलेली श्रीमंती कदाचित भौतिक गोष्टीत माणसाला शिखर गाठून देईल. पण, ज्ञानाच्या कक्षाच रुंदावल्या गेल्या नाहीत तर मग अशी संपत्ती काय कामाची. मूळात या समाजात आता गुरूची व्याख्याच पूर्णपणे बदलली की काय असा संभ्रम निर्माण झालाय. धर्मरक्षक, धर्मवीर म्हणून उगवणाऱ्या या पिढ्या नक्की कुठे जाणार याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो. जिथे गुरूच भरकटलेला, असंवेदनशील आणि अज्ञानी असेल तर त्या गुरुपणाला महत्त्व तरी कसं द्यावं.. आणि, का म्हणून ही पिढी ते महत्त्व देतेय. साधी दहावी बारावी पास न होऊ शकणारी ही पिढी उच्च शिक्षणाच्या नावाने खडे फोडताना बघून त्यांच्यावर असलेल्या निरंकुश अश्या अज्ञानी प्रभाव टाकणाऱ्या लोकांच्या कानशिलात ठेवून द्यावी असं वेळोवेळी वाटतं. खरं म्हणजे या भरकटलेल्या दिशाहीन समाजाला आरक्षण, लाडका/लाडकी योजना मुळीच नकोय… या समाजाला योग्य वळण आणि नीतीमत्तेने राष्ट्रनिर्मिती कशी करायला हवी याचं शिक्षण देणं जास्त आवश्यक आहे. कारण एक तत्त्वहीन समाज हा राष्ट्राला पुन्हा एकदा हजारो वर्षांची गुलामगिरी पत्करायला भाग पाडू शकतो हे सत्य पचवणं कदाचित अवघड असेल.. पण, ते नाकारणं म्हणजे आपल्याच वैचारिकतेला डोळसपणे दुर्लक्षित करणं आहे.
आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा व्यक्ती हा कदाचित आपण दुर्लक्षित करतो.. आणि, गोड बोलून चुकीचे सल्ले देणाऱ्याला आपण गुरुतुल्य समजायला लागतो. पण खरा गुरू कसा ओळखायचा हे प्रचंड कौशल्याचं आणि सद्सद्विवेक बुद्धी शाबूत असणाऱ्याचं काम आहे. रस्त्याने चालताना, दैनंदिन आयुष्य जगताना आपल्याला अश्या अनेक घटना घडतात. जे आपल्याला जीवनाच्या जडणघडणीच ज्ञान देऊन जातात आणि आपल्याला मोलाची शिकवण देतात. अगदी कोणाशी कसं वागावं ते कसा विचार करावा ही साधी साधी शिकवण देणारी माणसं आपल्याला रोज भेटतात. पण आपण त्याकडे कानाडोळा करून जगत जातो.. आणि, एखादा मोठा फटका बसला की, मग आपल्याला त्या शिकवणींची आठवण होते. आणि, मनात विचार येतो की तोच व्यक्ती आपला गुरू होता.
गुरूंची तफावत फार आढळते, महाभारतात द्रोणाचार्य हे सर्वांचे गुरू होते पण अढळपद प्राप्त उत्तम शिष्य म्हणून अर्जुनाला स्थान मिळालं, कारण गुरूने शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी अर्थ असतो हे जाणून घेणं गरजेचं आहे नेमका गुरू काय असतो? जो आपल्याला बिकट परिस्थितीमध्ये खंबीर बनून पाय रोवून लढायला, घडायला शिकवतो तोच खरा गुरू. संघर्ष सुरू आहे… आपल्याकडे पैसे येत नाहीये अश्या परिस्थितीत जर आपल्याला कोणी म्हणत असेल की घे बँकेचं कर्ज आणि नंतर फेडत बस असा सल्ला देणारा गुरू कधीच होऊ शकत नाही. जो स्वतःच्या चुकांच्या अनुभवातून दुसऱ्याला त्या चुका करण्यासाठी परावृत्त करतो त्याला गुरू म्हटलं तर दुराग्रह नाही ठरत. आजकाल आपण बघतो की एखाद्या नेत्याच्या मागे असणारी गर्दी त्या नेत्याला गुरू म्हणून संबोधित करते आणि त्याच्या मागे चालते, मग इथे कुठेतरी आपल्या विचारांवर आपण पुनर्विचार करायला हवा. कारण गुरू हा त्याच्या शिष्याला दरिद्यातुन बाहेर काढण्यासाठी भूमिका बजावत असतो, मग ते दारिद्य वैचारिक असेल, आर्थिक असेल किंवा इतर काही असेल. शेळ्या मेंढ्याप्रमाणे जर आपण कळपाच्या मागे धावत सुटलो तर गुरू काय कामाचा. गुरू आपल्याला स्वतंत्र जगायला शिकवतो, स्वावलंबी व्हायला शिकवतो. परावलंबी बना अस कुठलाच गुरू शिकवत नाही आणि असं कोणी शिकवत असेल तर तो गुरू काय गुरुतुल्यसुद्धा नाही. आज आपण जितकेही महान लोक पाहतो ती लोकं गुरुशिवाय मोठे झालेलेच नाही. ज्या गुरूने सद्गुण जोपासण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त केलं तो गुरू आपल्याला कधीच वाममार्गाला जाऊ देत नाही अथवा, त्याची शिकवण आपल्याला तिथे जाण्यापासून रोखत जाते.
गुरूंचा विचार हा टीकात्मक नसावा, गुरू आपल्याला तिरस्कार शिकवत नाही. पण, परिस्थिती हाताळायला शिकवतो. त्या परिस्थितीमधून मनाचं संतुलन साधून त्यावर मात करायला शिकवणे हा गुरूचा धर्म. पण होतय कसं, भेटला विठ्ठल म्हणून आपण चुकीच्या लोकांना गुरूस्थानी ठेवलं तर नाही ना म्हणून त्यावर विचार करायला पाहिजे. आपल्या आयुष्याला वेग प्राप्त करून देण्यासाठी गुरूच्या शिकवणीची आवश्यकता असते. गुरू आपल्याला संयम, निर्णय क्षमता आणि आकलनाची सिद्धता प्राप्त करून द्यायला सतत मार्गदर्शन देत असतो.
गुरू हा एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व असतो, जो जीवनाच्या मार्गदर्शनात आणि शिक्षणात अत्यंत प्रभावी ठरतो. ‘गुरू कोणाला करावे?’ हे प्रश्न आपण व्यक्तिमत्त्व, कौशल्य, आणि जीवनशैलीच्या विविध अंगांवर आधारित विचारले पाहिजे. एखाद्या व्यक्तीला गुरू म्हणून स्वीकारण्याची प्रक्रिया ही त्याच्या ज्ञान, अनुभव, आणि शिक्षणाच्या क्षमतेवर आधारित असावी लागते. एक योग्य गुरू म्हणजे त्या व्यक्तीची तीव्र बुद्धिमत्ता, जीवनातील अनुभव, आणि ज्ञान यांचा एकत्रित संगम असावा लागतो.
गुरूची निवड ही केवळ विदयार्थ्याच्या शैक्षणिक आस्थेपर्यंत मर्यादित नसावी. ‘गुरूला निवडताना त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक मूल्यांचा विचार करणे आवश्यक आहे.’ उदाहरणार्थ, एक शिक्षण घेत असलेला विद्यार्थी, व्यवसायिक जीवनात आलेली आव्हाने, किंवा व्यक्तिगत समस्या असलेली व्यक्ती यांच्यासाठी एक आदर्श गुरू तो असावा लागतो, जो त्याच्या वयाच्या आणि जीवनाच्या टप्प्याशी सुसंगत असेल. योग्य गुरू हा फक्त ज्ञान देणारा नसून प्रेरणादायक, मार्गदर्शक, आणि एक विश्वासू मित्र असावा लागतो.
गुरूची निवड करतांना, त्या व्यक्तीच्या आपल्या ध्येयांशी सुसंगत असलेली क्षमता आणि कौशलय असावे लागते. ‘गुरू असावा लागतो तो अत्यंत विवेकी प्रगल्भ, आणि जीवनातील विविध अंगांचा अनुभव असलेला असावा लागतो. याशिवाय, त्या व्यक्तीला संवादाची उत्कृष्ट क्षमता असावी लागते, ज्यामुळे तो शिक्षण व मार्गदर्शनामध्ये प्रभावी ठरतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील विविध टप्प्यांवर, योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी, योग्य गुरू असणे अत्यंत आवश्यक आहे.
तसेच, गुरूची निवड करतांना, ‘त्याच्या विचारांची आणि तत्त्वांची सुसंगतता देखील विचारात घेतली पाहिजे.’ गुरूच्या मूल्यांचं, नैतिकतेचं आणि विचारशास्त्राचं आपल्या विचारशास्त्राशी सुसंगत असणे आवश्यक आहे. एका आदर्श गुरूने न केवळ.. ज्ञान, माहिती, आणि तांत्रिक कौशल्ये प्रदान करावीत, तर.. एक स्थिर आणि सकारात्मक दृष्टिकोनही शिकवावा लागतो. यामुळे, गुरूच्या सहाय्याने, विद्यार्थी किंवा शिष्य याने आयुष्यात योग्य दिशा आणि निर्णय घेतल्यास त्याचा जीवनाच्या विविध अंगांवर सकारात्मक परिणाम होईल.
एक गुरू असावा लागतो जो जीवनातील विविध अनुभव, ज्ञान, आणि मूल्ये समजून त्यानुसार मार्गदर्शन करू शकेल. योग्य गुरू निवडणे म्हणजेच आपल्या जीवनाच्या विकासासाठी, शिक्षणासाठी, आणि व्यक्तिमत्त्वासाठी एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. त्यामुळे, गुरूची निवड करतांना, त्याच्या तत्त्वज्ञानाचे, अनुभवाचे, आणि व्यक्तिमत्त्वाचे योग्य मूल्यांकन करणे आवश्यक आहे. याच मार्गाने, जीवनातील प्रत्येक टप्यावर योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल आणि आपण आपल्या ध्येयांची साधना सक्षमपणे करू शकू.
खरं तर एखादा व्यक्ती ज्या तळमळतेने त्याच्या अनुभवातून.. तुम्ही ह्या चुका करू नका.. ज्या आपण करतोय. त्या अनुभवांना आपल्याला ऐकायचं नसतं.. कारण, आपल्या डोक्यात अविचारी भावनांचं भूत चढलेलं असतं. तो या गोष्टी का सांगत असतो?, कारण, त्याला मनोमन हेच वाटत असतं की ज्या चुका आपण करतोय त्या चुका आपण करू नये. आपण ते गमावू नये हीच त्याची इच्छा असते. पण आपण काय करतो तर त्या व्यक्तीला तुलाच जमलं नाही तर आम्हाला कशाला सांगतो अस बोलत असतो. पण, खरं म्हणजे तो आपल्याला सांगत नसतो.. तो व्यक्ती स्वतःला त्या चुकांसाठी कोसत असतो. त्याची तळमळ ही स्वतःसाठी असते, की त्याच्यामुळे कोणाचं तरी आयुष्य सुधारलं जावं. त्यामुळे आपण कोणाच्या संगतीत बसून कोणाकडून काय शिकतो याचा पडताळा आपण स्वतःच केला तर आपल्याला आपल्या चुका लक्षात येतील आणि आपलं आयुष्य सुखकर होईल.
गुरू ही एक महत्त्वपूर्ण भूमिका असते.. जी, जीवनातील अनेक टप्प्यांवर मार्गदर्शन करते. ‘आपला गुरु हा भरकटलेला नसावा’ हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे कारण गुरूचा स्थिरता आणि अनुभव हा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कळसा सारखा असतो. एक गुरू जो विचारशून्य, दिशाहीन, किंवा स्वपरिस्थितीत भासतो, तो आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शन देऊ शकत नाही.
गुरूची भूमिका म्हणजे ज्ञान, अनुभव, आणि संस्कारांच्या आधारे मार्गदर्शन करणे. जर गुरूंच्या विचारांमध्ये आणि आचारधारेत असंतुलन असेल तर त्या शिक्षणाचा परिणाम विद्यार्थ्यांवर असू शकतो. ‘गुरूचं भरकटलेलं मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थीला दिशाहीन आणि उलट-सुलट विचारांची जडणघडण होणे, असे म्हणता येईल. एका स्थिर, समर्पित, आणि अनुभव असलेल्या गुरूचा मार्गदर्शन, शिष्याला जीवनाच्या विविध टप्प्यांवर योग्य निर्णय घेण्यात मदत करू शकतो आणि त्याला स्पष्टता देऊ शकतो.
गुरू हा विचारशुद्ध आणि ठराविक मूल्यांचे अनुसरण करणारा असावा लागतो. ‘गुरूच्या विचारांमधील स्थिरता आणि स्पष्टता विद्यार्थ्यांना एक ठराविक दिशा देतात.’ एका आदर्श गुरूने योग्य दृष्टीकोन, नैतिक मूल्ये, आणि विचारशास्त्र दिले पाहिजे. अशा गुरूंच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी त्यांच्या जीवनाच्या उद्दिष्टांचा ठराविक आणि सकारात्म मार्ग अनुसरू शकतात. यामुळे, गुरूच्या विचारांची आणि आचारधारांची स्पष्टता अत्यंत आवश्यक असते, कारण ती विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी आधारस्तंभ ठरते.
तसंच, ‘गुरूच्या अस्थिर विचारांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते.’ गुरूच्या विचारशुद्धतेचा अभाव विद्यार्थ्यांना असमंजसपणात आणि दिशाहीनतेत ढकलू शकतो. त्यामुळे, योग्य मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी, गुरूची स्थिरता आणि विचारशुद्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शनासाठी, गुरुने आपल्या शिक्षणातील ज्ञानाचा आणि अनुभवाचा आधार घेतल्यासच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्याचा प्रभावी उपयोग होईल.
‘आपला गुरु हा भरकटलेला नसावा’ या विचाराचे पालन करणे म्हणजेच, गुरुच्या स्थिरतेचा, विचारशुद्धतेचा, आणि नैतिकतेचा आदर करणे. यामुळेच, विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते.. आणि, त्यांचे शिक्षण अधिक प्रभावी आणि परिणामकारक बनते. गुरूचा स्थिरतेचा आणि स्पष्टतेचा आधार घेतल्यास, विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल आणि योग्य निर्णय घेण्यात मदत होऊ शकते.
अखेर, ‘गुरू या संकल्पनेला आदर्श आणि स्थिर मार्गदर्शनाच्या रूपात स्वीकारणे,’ हे जीवनाच्या प्रत्येक टप्यावर योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी अनिवार्य आहे. गुरूची निवड करतांना, त्याच्या ज्ञानाच्या, नैतिकतेच्या, आणि अनुभवाच्या गुणांचा विचार करून, एक ठराविक आणि सशक्त मार्गदर्शन प्राप्त करणे हे आवश्यक आहे. यामुळेच, ‘गुरू’ हा जीवनातील एक अनिवार्य आणि प्रेरणादायक घटक ठरतो. गुरूच्या योग्य निवडीने आणि स्थिरतेने, आपण आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती करू शकतो, आणि एक आदर्श, सशक्त आणि प्रेरणादायक जीवन जगू शकतो.
१२. यशाची व्याख्या नेमकी काय?
बऱ्याचदा आपण हा विचार करत असतो की मला यशस्वी व्हायचं आहे? मी यशस्वी होणार आहे? पण नेमकं यश म्हणजे काय? यशाची नेमकी व्याख्या तरी काय? तर यशाची व्याख्या ही निरनिराळ्या लोकांच्या मते वेगवेगळी आहे. एखाद्याच्या घरात मागच्या सात पिढ्या अशिक्षित असताना एखादा मुलगा किंवा मुलगी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो.. तेव्हा, त्या घरासाठी ते यश असतं. एखाद्या उच्चविद्याविभूषित कुटुंबातला मुलगा/मुलगी आणखीन चांगलं शिक्षण घेऊन किंवा त्याच्या क्षमतेपेक्षाही मोठ्या हुद्द्यावर जर नोकरीला / व्यवसायात प्रगती करत गेला तर ते त्याचं यशस्वी होणं आहे. यशाचं मोजमाप करण्यासाठी कुठलं एकक नाही, किंबहुना ते तयारही होऊ शकत नाही. पण आपलं यश हे आपल्या मागच्या आयुष्यापेक्षा आपण आज काय आहोत यावर अवलंबून असतं.
एखाद्या व्यक्तीसाठी कधीकाळी जगण्याचा संघर्ष होता.. आणि, आज तो व्यक्ती एक चांगलं आयुष्य जगून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत असतो त्या व्यक्तीसाठी यशस्वी होणं म्हणजे त्याचं आजचं आयुष्य आहे. आपल्याला समाजाने यशाचे मापदंड घालून देताना मोठ घर.., एखादी चार चाकी गाडी.. आणि, बँकेत लाखो रुपये पडून असेल तर तो व्यक्ती यशस्वी आहे अशी समजूत घालून दिली. पण यश नक्की काय असतं ते आपल्या विचारांवर अवलंबून आहे. आपण निश्चित केलेलं ध्येय जर आपण मिळवलं तर आपल्यासाठी ते यश असेल पण एखाद्याला जर आपल्याही पेक्षा अधिक काही मिळवायचं आहे तर त्या व्यक्तीसाठी यश अजून मिळालेलं नाही असच वाटत राहणार. बऱ्याचदा आपण तुलनात्मक यशाच्या गराड्यात फसत जातो, अमुक व्यक्ती गाडी घेतोय मग मलाही आता गाडी घ्यावी लागेल अशी भावना आपला संघर्ष ताणून धरते. पण संघर्ष हा निर्मळ असावा, स्पर्धा ही खिलाडू वृत्तीने होणारी असावी. तरच आपल्याला मिळणाऱ्या यशाची गोडी ही दीर्घकाळ टिकून राहते. यश मिळवण्यासाठी आपल्याला तीन मूलभूत गोष्टींची गरज भासते ती म्हणजे शिक्षण किंवा अनुभव, दुसरं कलागुण, तिसरं आणि महत्त्वाचं अथक परिश्रम.
यश मिळवण्यासाठी आपल्याला शिक्षण हे गरजेचंच आहे, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे अस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. शिक्षणाच्या जोरावर तळागाळातील व्यक्ती संपूर्ण जग पादक्रांत करू शकतो. आणि, त्याच शिक्षणाच्या बळावर संपूर्ण व्यवस्थेला सुद्धा आपण बदलवू शकतो अथवा खडबडून जाग करू शकतो. शिक्षणाचा मुळ उद्देश काहीतरी मिळवणं नसून त्या माध्यमातून विचारसरणी शुद्ध करून ज्ञान वाढवणे आहे. हे ज्ञान आपल्याला योग्य निर्णय कसा घेतला पाहिजे यापेक्षा घेतलेला निर्णय योग्य करून दाखवण्यासाठी मदत करते. पाठ्यपुस्तकातून आपण कदाचित माहिती मिळवू शकतो.. पण, खरं शिक्षण हे आपण अनुभव, अवांतर वाचन, प्रवास या माध्यमातूनच मिळवता येतं. आपल्याला जर शिकायचं असेल तर आपण जमेल तेवढा शक्य होईल तेवढा प्रवास करायला हवा, आपण जोपर्यंत प्रवास करत नाही तोपर्यंत आपल्याला बाह्यजगात काय सुरू आहे याची जाणीव होणार नाही डोंगरदऱ्यामध्ये फिरणं हा प्रवास होऊ शकत नाही. ते पर्यटन आहे. फिरणं म्हणजे काय तर आपण जगत असलेल्या आयुष्यापेक्षा विपरीत आयुष्य जगणाऱ्या लोकांची जीवनशैली अनुभवणे, तेथील संस्कृती जाणून घेणे, त्यांच्या दैनंदिन आयुष्याची कसरत बघत आपण नेमके काय करतो आहोत याचा बोध घेऊन आपल्या जगण्याला दिशा देणे हा प्रवासाचा खरा अर्थ होय.
दुसरी बाब म्हणजे कलागुण…, व्यक्तीच्या आयुष्यात व्यक्त होण्यासाठीचं मुख्य साधन म्हणजे आपल्या अंगी एक तरी कला असावी.., मग ती लेखन, गायन, नृत्य, श्रृंगार, खेळ कुठलीही असेल. कला ही माणसाला कठीण काळात टिकवते, चांगल्या काळात जमिनीवर पाय ठेवून जगायला शिकवते आणि वाईट परिस्थितीमध्ये मनावरचं संतुलन शाबुत ठेवते. या जगात कला आहे म्हणूनच जगाची क्रिया सुरळीत सुरू आहे, कला माणसाच्या अंतर्मनात असलेल्या सुप्त भावनांना बाहेर काढून व्यक्त करत व्यक्तीच्या व्यक्तित्वाला शुद्ध सोन्यात परावर्तित करत जाते. एक तरी कला आपण प्रत्येकाने जोपासली पाहिजे, त्यातूनच आपल्या भावना नियंत्रित राहतात.. आणि, भावना नियंत्रित असल्या की मन शांत राहतं.. आणि, या शांत मनाने व्यक्ती निर्णय घेताना पुरेपूर सदसद्विवेक बुद्धीचा वापर करतो. या कलेच्या बाबतीत महाराष्ट्राचे लाडके लेखक पुलं देशपांडे म्हणतात की.., आयुष्यात मला भावलेले एक गूज सांगतो… जीवनात गरजेपुरतं शिक्षण जरूर घ्या.., पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा… पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, शिल्प, कला, खेळ यातील एकतरी कलेशी मैत्री अवश्य जमवा. पोटापाण्याच्या उद्योग तुम्हाला जगवील… पण कलेशी जमलेली मैत्री.. तुम्ही का? जगायचे.. हे सांगून जाईल.
तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे अथक परिश्रम, यश प्राप्तीमध्ये अथक परिश्रमाची मोठी भूमिका असते, आपल्याकडे शिक्षण असेल किंवा कला असेल पण त्यातून जो संघर्ष करायचा आहे त्याला जोड ही परिश्रमाचीच द्यावी लागणार. त्याशिवाय यशाच्या व्याख्येला मात्र कोणताच अर्थ नाही. ही यशाची व्याख्या जमवायची असेल तर कशाचीही तमा न बाळगता आपण परिश्रम घ्यायलाच हवे. हे परिश्रम आपण कसं जगणार आहोत हे ठरवतात. होईल., बघता येईल., करता येईल… अश्या गृहीत धरणाऱ्या गोष्टींना बाजूला सारून जो काम करत राहतो तो व्यक्ती नक्कीच यशस्वी होतो. आणि, त्या यशाच्या व्याख्या या त्याच्या पद्धतीने निर्माण करत असतो. कारण यश हा मैलाचा दगड आहे. एखाद्याने मिळवलेले यश हे पुढच्या पिढ्यांच्या संघर्षाला नवीन आव्हान निर्माण करून त्या पिढ्यांना अजूनच कणखर बनवत जातात.. आणि, यशाचे नवनवीन मापदंड घालायला त्या पिढ्या तयार होतात.
यशस्वी होणं आणि स्वप्न पूर्ण करणं यात खूप फरक आहे. कारण, सातत्य आणि अथक परिश्रम असलेला माणूस हा रोज यशस्वी होत असतो. फक्त मनाशी बाळगलेल स्वप्न पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागतो. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे जो कधीच समाधानी नसतो आणि नसला पण पाहिजे. कारण, ज्या दिवशी आपण असलेल्या गोष्टींवर समाधान मानायला लागू तिथेच आपली प्रगती खुंटते.
रामायणात यशस्वी व्यक्तींची दोन उदाहरणे सापडतात.., एक म्हणजे राम आणि दुसरं म्हणजे रावण. राम मूलतः मर्यादापुरोषात्तम आणि रावण म्हणजे अभिमानी, महत्त्वाकांक्षी. रावणाने त्याकाळात व्यवस्थेच्या विरोधात शड्डू ठोकून साम्राज्य उभं केलं होतं. तर, श्रीरामांनी स्वतःच्या गुणांच्या जोरावर जग आपलंस केलं होतं. बघायला गेलं तर त्यांच्यात फक्त विचारांची तफावत होती, ही तफावत एकाला विनाशेच्या दिशेने घेऊन गेली. आणि, एकाला अनंतकाळासाठी दैवत्त्वच प्रदान करून गेली. दोघांच्याही दृष्टीने ते यशस्वी शासकच होते. पण, फरक होता तो व्यक्त होण्याचा. रावण अहंकारातून राजा झालेला आणि राम परोपकारी भावनेतून राजा बनलेला. राक्षस कुळाचा उध्दार रावणाच्या अभिमानाने झाला खरा.. पण, त्याचा -हासही त्याच वेगाने झाला.
दुसरीकडे राम मात्र चिरकाल टिकले., त्याच्या संघर्षात परिश्रमाला जोड होती. ती, सद्गुणांची. आणि, रावणाच्या जोडीला होते अवगुण. ज्यांना षड्विकरांवर विजय मिळवता आला त्यांचं यश हे अमरत्वाच्या वाटेने जातं.. आणि, इर्षा., तुलना., राग.. यातून मिळवलेल्या यशाची मात्रा ही भव्यदिव्य असेलही.. पण, त्या यशाचं आयुर्मान हे अतिशय कमी कालावधीसाठी असतं. त्यामुळे आपल्याला यश कुठल्या मार्गाने मिळवतो यालाही प्रचंड असं महत्त्व आहे. अहंकारही तेव्हढाच असावा.. जितकी आपण सहन करण्याची क्षमता ठेवतो, कारण, यश पेलनं हे काही येड्याबागड्याच काम नाही. रावणाला त्याच्या शक्तीचा, यशाचा गर्व झाला. त्यातून अहंकार जन्माला आला. आणि, तो विनाशाच्या विहिरीत पडला. दुसरीकडे राम वनवास भोगूनही त्यांचं कार्य करत राहिले., धर्म जोपासत राहिले.. त्यामुळे वनवासानंतरही त्यांचं राज्य उत्तम असं सुरू राहिलं. कारण यशात सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे मातीशी जोड़न राहणं. आपण जितकं साधं राहणीमान ठेवू त्याहून अधिक आपलं महत्त्व समाजात वाढत जातं. आणि, आपल्या यशाचे दाखले वेगवेगळ्या पद्धतीने घेतले जातात. यशाची व्याख्या नाही पण ते यश ज्याच्या त्याच्या परीने अधोरेखित असतं., हे यश टिकवनं सर्वात मोठा अटीतटीचा भाग.. एकदा का यश टिकवायला शिकलो की मग आपण यशस्वी झालो. असे म्हणता येईल.
यशाची व्याख्या एका व्यक्तीच्या जीवनातील उद्दिष्टे, आकांक्षा, आणि प्रयत्नांच्या यशस्वीतेच्या दृष्टीने अत्यंत वैयक्तिक असू शकते. यश म्हणजे केवळ बाह्य मान्यता, पुरस्कार, किंवा आर्थिक लाभ नाही. तर, ते व्यक्तीच्या अंतर्गत संतोष, स्वतःची ओळख, आणि पूर्णत्वाचे प्रतीक आहे. ‘यशाची खरी व्याख्या म्हणजे व्यक्तीच्या ध्येयांची प्राप्ती. आणि, त्या प्रक्रियेत असलेला आत्मसंतोष,’ हे मानले जाते. यश म्हणजे आपल्या उद्दिष्टांना साध्य करण्याच्या प्रक्रियेत दिलेली आव्हाने. आणि, अडचणींचा सामना करून, आपल्याला प्राप्त झालेले समाधान आणि आनंद. यशाच्या मार्गावर येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून, आपण स्वतःच्या क्षमता आणि कष्टांचे प्रदर्शन करतो.., आणि, या संघर्षात मिळवलेला आत्मसंतोषच यशाचे खरे मापदंड असते.
दुसऱ्या अंगाने, यशाची व्याख्या सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावर देखील विचारली जाऊ शकते. ‘सामाजिक यश म्हणजे समाजात मान्यता मिळवणे, दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनणे, आणि समाजातील सकारात्मक बदल घडवणे.’ यशाच्या या प्रकारात, व्यक्तीच्या कार्यांनी आणि उपलब्धीनी समाजातील मूल्ये आणि आदर्शाचे उल्लंघन न करता, सकारात्मक परिणाम साधले जातात. समाजात योगदान देणे, नवीन संकल्पना आणणे, किंवा इतरांशी सहयोग करून उद्दिष्ट साध्य करणे, हे देखील यशाचे एक अंग आहे. अशा प्रकारे, सामाजिक स्तरावर यश मिळवणे म्हणजेच समाजाच्या हितासाठी कार्य करणे. आणि, त्यातून मिळालेल्या मान्यतेची प्राप्ती करणे.
अखेर यशाची व्याख्या अंतर्गत समाधानाच्या आणि वैयक्तिक उन्नतीच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. ‘वैयक्तिक यश म्हणजे आपल्या स्वप्नांची प्राप्ती, आणि स्वतःच्या क्षमतांचा पूर्ण उपयोग करून जीवनातील उद्दिष्टे साध्य करणे.’ यशाच्या या दृष्टिकोनात, व्यक्तीने स्वतःच्या आंतरिक आकांक्षांचे पालन करणे, स्वतःच्या धोरणांनुसार जीवनाची दिशा ठरवणे, आणि स्वतःच्या यशाची व्याख्या तयार करणे महत्त्वाचे आहे. व्यक्तीच्या जीवनातील आव्हाने आणि यशाच्या पायऱ्या त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर आणि आत्मसंतोषावर आधारित असतात. त्यामुळे, यशाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी असू शकते, परंतु त्या यशाच्या प्राप्तीसाठी आवश्यक असलेली मेहनत, धैर्य, आणि आत्मसंतोष हेच यशाचे खरे मापदंड आहेत
भारतीय पुराणे आणि महाकाव्यांमध्ये यशाची व्याख्या आणि त्याच्या प्राप्तीचा मार्ग स्पष्टपणे दर्शवला आहे. यशाच्या प्रतिमेत विविध देवता, नायक, आणि आदर्श व्यक्तींच्या कथा वाचनाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करणे शक्य आहे. यशाचे पौराणिक संदर्भ व्यक्तीच्या धैर्य, संघर्ष, आणि सत्याच्या शोधाचे प्रतीक असतात, ज्यात एकात्मता आणि नैतिकतेचे महत्व सांगितले जाते.
महाभारताच्या संदर्भात, अर्जुन आणि कृष्ण यांचे संबंध यशाच्या संकल्पनेला नवा अर्थ देतात. अर्जुन, जो एक महान योद्धा होता, त्याने स्वतःच्या आत्मसंतोषासाठी आणि धर्मासाठी केलेले संघर्ष आणि त्याच्या यशाची प्राप्ती दर्शवते. कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनने धर्मसंकटाची स्थिती स्वीकारली आणि स्वतःच्या कर्तव्याच्या मार्गावर दृढ राहिला. ‘धर्म आणि कर्तव्य’ हे दोन महत्त्वाचे मूल्ये अर्जुनच्या यशाच्या परिभाषेत आहेत, ज्यामुळे त्याने युद्धाच्या रणभूमीवर विजय प्राप्त केला.
त्याचप्रमाणे, रामायणात श्रीरामाचा यशाच्या आचारधारेवर दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. श्रीराम, जो धर्मसत्ता आणि नीतिमूल्यांचे प्रतीक आहे, त्याने आपल्या जीवनातील विविध अडचणींवर मात केली. सीतेच्या हरणाचे संकट असो, किंवा रावणाच्या विरोधात युद्ध असो, श्रीरामने धर्माच्या मार्गाचे पालन केले आणि अखेरीस विजय प्राप्त केला. यशाचे या पौराणिक संदर्भातलं अर्थ म्हणजे सत्य, धर्म, आणि कर्तव्याच्या मार्गावर टिकून राहून विजय प्राप्त करणे.
यशाच्या पौराणिक संदर्भातील कथा आणि उदाहरणे आपल्या जीवनात प्रेरणादायक ठरतात, कारण त्या व्यक्तीला सत्य, धैर्य, आणि कर्तव्याच्या मार्गावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देतात. ‘यशाचे गुपित म्हणजे आपल्या आचारधारेच्या अनुसार जीवन जगणे,’ हे मानले जाते. या संदर्भात, पौराणिक कथा हे एक मार्गदर्शक उदाहरण आहेत, जे यशाच्या प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या नैतिकता, धैर्य, आणि समर्पणाची शिकवण देतात. यामुळे, पौराणिक संदर्भातील यशाच्या कथा आणि पात्रे व्यक्तीला आपल्या जीवनात सामर्थ्य मिळवण्यासाठी आणि यशाच्या मार्गावर दृढ राहण्यासाठी प्रेरित करतात.
१३. तत्त्वांशी निष्ठावंत रहा!
आपल्या आयुष्यात आपण कशापद्धतीने जगलो याला महत्त्व आहे., हे महत्त्व आपल्याला आदर्श जीवनाचा गाभा दर्शवित असतं. संघर्ष, परिस्थिती, आलोचना, कौतुक, निंदा, शाबासकी अश्या विशेष भावनांसाठी तोच व्यक्ती योग्य असतो ज्याच्याकडे स्वतःची तत्त्व आहेत. तत्त्व निर्माण होतात ती आपल्या संस्कारांमधून, आपले हे संस्कार आपल्या आयुष्याला आकार तर देतातच परंतु, त्यातून आपल्या व्यक्तित्त्वाला घडवत असताना आपल्यात ज्या तत्त्वांची रुजवणी करतात तिथूनच आपल्या उज्ज्वल भविष्याची अंकुरे फुटत असतात. लहानपणी आपल्याला आई वडील काही चांगल्या संस्काराची मुल्ये रुजवतात.. तेव्हाच, आपल्या आयुष्याला सुबकता यायला सुरुवात होते. पण, जरो जरो आपण मोठे होतो तसतसं आपल्याला बाहेरचं जग कळत असताना आपण आई वडिलांनी त्यांच्या परीने दिलेल्या संस्कारांना उपेक्षित ठेवू पाहतो, आपल्याला आपला तुटपुंजा अनुभव हाच सर्व काही वाटायला लागतो. पण आता इथे थांबायला हवं, थोड्याफार अनुभवात आपण जग पाहिल्याच्या गप्पा करतो पण ते आपलं अज्ञान असतं, खोट्या दिसणाऱ्या भ्रमाला आपण सत्य समजू तागतो आणि आपोआपच भरकटत जातो.
मार्ग भटकल्यानंतर आपले चुकीचे निर्णय हे कदाचित त्या वेळी योग्य वाटत असतात पण जेव्हा आपण आपल्या आई वडिलांच्या वयात पदार्पण करतो तेव्हा या गोष्टीची जाणीव होते की, आपले आई वडील जे सांगायचे ते बरोबर होतं. मग आठवतं की. आई सांगायची… की माणसं धूर्त असतात, त्यांना ओळखायला शिक रे बाबा!, वडील सांगत असायचे की शिकण्याच्या वयात शिक्षणच घे, कमवायला पूर्ण आयुष्य पडल आहे.. पण, तेव्हा आपण काय करायचो तुम्हाला काय कळतं? हे एक वाक्य बोलून त्यांचा अपमान करायचो. कसंय मित्रांनो, जोपर्यंत मुलगी आई होत नाही आणि मुलगा बाप होत नाही तोपर्यंत आईबाप काय असतात हे कळत नाही.
आपला बाप आयुष्य गरिबीत काढत असतो. कारण, आपल्या मुलांच्या पंखात बळ भरण्यासाठी. आई काबाडकष्ट करून दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करते.. कारण, तिला तिच्या भुकेपेक्षा आपल्या लेकरांच्या तोंडात सुखाचे दोन घास भरवायचे असतात. नकळत जगरहाटीमध्ये, खोट्या झगमगाटापायी आपण त्यांनी दिलेली मोलाची शिकवणूक विसरून जातो.
त्यामुळे मित्रांनो विचार करा आणि आयुष्यात तत्त्व जोपासा, ज्याच्याकडे स्वतःची विचारसरणी असते तो ठामपणे स्वतःची तत्त्वे टिकवतो. तत्त्व काय असतं तर आपल्या जगण्याचा आदर्श सिद्धांत. हे सिद्धांत कधीच आपल्याला मान खाली घालू देत नाही. हे तत्त्व मरण जरी समोर आलं तरीही आपल्याला झुकू देत नाही. हीच आई वडिलांच्या संस्कारांची ताकद. जगात आपण कुठेही असो तरी मनातून आपल्याला या धाकाने जगायला हवं की आपल्याकडून अशी कोणतीच गोष्ट घडू नये ज्यामुळे आई वडिलांच्या संस्कारांना बट्टा लागेल. ही भावना मनात ठेवून जो व्यक्ती जगत जातो तो खरा तत्त्वनिष्ठ मनुष्य.
चुकूनही आपण चूक करू नये हे जेव्हा आपल्या मनाला पटत जातं तेव्हा आपण आपले तत्त्व जोपासतो आहोत हे स्पष्ट होत जातं. मित्रांनो आपले तत्त्व जपा कारण ते तत्त्व हे आईवडिलांनी आपल्याला दिलेल्या संस्कारातून आलेले आहेत. आणि, आई वडिलांचे संस्कार हे जगातल्या कुठल्याही मोठ्या विद्यापीठात शिकवले जात नाही. कारण जगाच्या पाठीवर आई वडिलांसारखं विद्यापीठ नाही. तिथून तुम्ही जे शिकता ते कुठल्या पाठ्यपुस्तकात शिकवलं जातं नाही. उदाहरण घ्या, छत्रपती शिवाजी महाराज! राजमाता जिजाऊंनी महाराजांना शिकवण दिली.., प्रेरणा दिली.. तेव्हा कुठे शिवबाराजे घडत गेले. शिवराय शिकण्यासाठी कुठल्या ऑक्सफर्डमध्ये गेले नव्हते. कारण साक्षात त्यांनी गुरुकुलच आपल्या आईत बघितलं होतं. त्याच शिकवणीनुसार ते जगले… झुंजले.. आणि, जिंकले सुद्धा. तेही अगदी तत्त्वनिष्ठ राहून!
स्वतःच्या नैतिक तत्त्वांशी एकनिष्ठ राहून यशाकडे वाटचाल करणे म्हणजे जीवनातील सर्वोच्च आदर्श. आणि, स्थिरता प्राप्त करणे. ध्रुवताऱ्याच्या अढळपदाचे प्रतीक असलेल्या व्यक्तीने, आपल्या नैतिकतेच्या आणि मूल्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांवर दृढ विश्वास ठेवून, प्रत्येक आव्हानाचा सामना करणे आवश्यक आहे. ध्रुवतार्याच्या अढळपदाप्रमाणेच, एका व्यक्तीची नैतिक तत्त्वे आणि विचारधारा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्थिरता आणि दिशादर्शन प्रदान करते.
ध्रुवतारा, जो आकाशात स्थिर असतो आणि सर्व दिशांना मार्गदर्शन करतो, त्याप्रमाणे एक व्यक्ती जी आपल्या नैतिक तत्त्वांशी एकनिष्ठ राहते, ती त्याच्या विचारधारेने आणि आदर्शानी मार्गक्रमन करते. स्वातंत्र्य, सत्य, आणि न्याय या मूलभूत तत्त्वांच्या आधारावर निर्णय घेणारा व्यक्ती, जीवनाच्या प्रत्येक पायरीवर स्थिरता आणि यश प्राप्त करतो. यशाच्या मार्गावर नैतिक तत्त्वांची एकनिष्ठता असलेली व्यक्ती यशाच्या उच्च शिखरावर पोहोचते. आणि, तिच्या आत्मसंतोषाच्या आणि समर्पणाच्या पायऱ्या पार करून, एक आदर्श जीवन जगते.
नैतिक तत्त्वांशी एकनिष्ठ राहून यशाकडे वाटचाल करताना, व्यक्तीने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या प्रवासात, नैतिकता आणि मूल्ये यांची कदर करून, व्यक्तीने वचनबद्धतेने आणि सातत्याने आपल्या ध्येयांचा पाठपुरावा करावा लागतो. ‘ध्रुवताऱ्याच्या स्थिरतेची कल्पना यशाच्या मार्गावर एक उदाहरण म्हणून पाहता येते. कारण तंत्रज्ञान आणि परिस्थिती कितीही बदलले तरी, ध्रुवताऱ्याचे स्थान निश्चित असते. त्या प्रमाणे, नैतिक तत्त्वांवर आधारित असलेले मार्गक्रमन आपल्याला जीवनातील अस्थिरतेला तोंड देण्यास मदत करते. आणि, आपल्याला एक स्थिर आणि यशस्वी जीवनाकडे नेत असते.
अंततः स्वतःच्या नैतिक तत्त्वांशी एकनिष्ठ राहून यशाकडे वाटचाल करणारा व्यक्ती हा ध्रुवाचे अढळपद प्राप्त करतो.’ या विचाराने, जीवनातील सर्व समस्यावर विजय मिळवण्यासाठी आणि एक आदर्श जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते. नैतिकता आणि मूल्यांच्या आधारावर यश प्राप्त करण्याची प्रक्रिया ही एक दीर्घकालीन आणि स्थिर मार्गदर्शक असते, जी व्यक्तीला तिच्या आदर्शाकडे आणि ध्येयाकडे दृढतेने व प्रेरणादायी पद्धतीने नेत असते. यामुळे, व्यक्ती आपल्या नैतिक तत्त्वांशी एकनिष्ठ राहून यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकते आणि जीवनात एक स्थिर, आदर्श, आणि यशस्वी भविष्य निर्माण करू शकते.
१४. सोशल मीडिया हेच भविष्य
आज सोशल मीडिया, टेक्नॉलॉजी मुळे संपूर्ण जग एका क्लिकवर सर्वांच्या संपर्कात आलंय, त्यात भरीस भर पडली ती समाजमाध्यमांची. म्हणजेच, सोशल मीडियाची. आज सोशल मीडिया हे फक्त आपण काय करतो हे जगाला दाखवण्याचं साधन राहिलेलं नाही. सोशल मीडिया हे व्यवसायाला वाढवण्यासाठी, आपली कला प्रदर्शित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. सोशल मीडिया वेळेचा अपव्यय करण्यासाठी मुळीच नाही, आज मोठ्यात मोठ्या व्यवसायाचा बेस हा सोशल मीडियामुळे पक्का झालेला आहे. सोशल मीडियाची ताकद इतकी आहे की, ते वापरताना आपण त्याचा उपयोग कशापद्धतीने करतो याचा परिणाम आपल्या आयुष्यावर कायम पडत असतो. सोशल मीडिया मुळातच वेळ घालवण्याचं, मनोरंजनाचं साधन नाही. त्यामुळे सोशल मीडियाची ताकद आपण ओळखायला हवी कारण आज सोशल मीडियाने संपूर्ण जग व्यापून टाकलं आहे. क्षणात आपण आपल्या गोष्टींना, व्यवसायाला, आपल्या कलेला जगभरात पाठवून प्रसिद्ध होऊ शकतो. पण ही एका दिवसात होणारी गोष्ट नाही. या गोष्टी घडवून आणायला सातत्य लागेल. आणि, हे सातत्य आपल्याला सतत ठेवावं लागेल.
आज सोशल मीडियाचा वापर हा फक्त मनोरंजन आणि शोबाजीसाठी होतोय, आणि आजची तरुणाई यामध्ये वाहवत चाललीय. या वाहवत जाणाऱ्या तरुणाईमध्ये १५-२५ च्या वयोगटातील मुलं मुली प्रकर्षाने आढळून येतात. आज भारतातील या वयोगटातील तरुण दिवसातले १६ तास फक्त सोशल मीडियावर स्क्रोलिंग करण्यात वाया घालवत असताना, सोशल मीडियाच्या माध्यमातून कित्येकजण अशे आहेत की, उत्तम कंटेंट प्रदान करून लाखो करोडो रुपये कमवत आहेत. समाजाला काहीतरी चांगलं देत आहेत. सोशल मीडिया हे स्वतःच्या जडणघडणीच प्रखर साधन म्हणून आपण आता स्वीकारायला हवं. सोशल मीडियाची ताकद आपण वेळीच ओळखायला पाहिजे, नकळत आपण त्यात गुरफटून न जाता त्या माध्यमातून युनिक अस काय करू शकतो हे शोधायलाच हवं. त्यावर कार्य करायला सुरुवात ही आजच आणि आताच करायला पाहिजे. जर आपण चांगले वक्ते असू तर आपण आपली वक्तृत्वशैलीचा वापर करून मार्गदर्शनपर व्हिडीओ रोज पोस्ट करायला हवेत, आपण जर चांगले मार्केटिंग कौशल्य जोपासणारे असू तर रोज त्या संदर्भात व्हिडिओ टाकून लोकांनाही त्या संदर्भात शिकवलं पाहिजे. अश्या एक ना अनेक गोष्टी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून करू शकतो. आपण नको त्या झगमगाटापासून दूर राहायला हवं, सोशल मीडियावर आपल्याला चकचकीत दिसणाऱ्या जीवनशैलीचं सत्य काय?, त्याच वास्तविक स्वरूप काय? हे परखडपणे माहित करून घ्यायला हवं.
मागील काही वर्षांपूर्वी जर आपल्याला लोकांसमोर झळकायच असेल तर एकच माध्यम होतं ते म्हणजे दूरचित्रवाणी. या माध्यमात झळकण्यासाठी आपल्याला बरेच संघर्ष करावे लागायचे.., वशिला हवा असायचा.. किंवा, तुमच्या पाठीशी त्या क्षेत्रातल्या मोठ्या कोणाचा तरी वरदहस्त असणं आवश्यक होतं. पण, आज सोशल मीडियामुळे ती परिस्थिती बदलली आहे, आपण आपलं टॅलेंट हे लोकांसमोर सहज आणू शकतो, त्याचं प्रदर्शन करू शकतो. चांगलं गाता येत असेल, चांगलं बोलता येत असेल, विनोद करता येत असेल, स्वयंपाक करता येत असेल, नृत्य सादरीकरण करता येत असेल, उत्तम लेखन करता येत असेल किंवा शोधपर सामग्री बनवता येत असेल तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कौशल्य आज संपूर्ण जगभरात पोहोचवू शकतो. इतकी प्रचंड ताकद इंटरनेट या प्रवाहातून निर्माण झालेल्या सोशल मीडियामध्ये आहे. काही वर्षांपर्यंत बातमी बघायची असेल, वाचायची असेल तर वृत्त वाहिन्या, वृत्तपत्र इतकीच साधने होती पण सोशल मीडियामुळे जगात काय घडतंय याची माहिती आपल्या खिशात त्या मोबाईलमध्ये आपल्याला बघायला मिळते. इतकं सहज आणि सोपं काम आज या माध्यमातून आपल्याला करायला मिळत आहे.
जगात अशे लाखोंच्या संख्येने व्यवसाय आहे.. ज्यांची मिळकत ही मर्यादित आहे, भले त्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगली क्वालिटी आहे. पण, मात्र त्यातून येणारी कमाई ही ठराविक आहे. कारण हे व्यवसाय ऑफलाईन सेक्टरमध्ये काम करत आहेत, जर आपल्याला हा व्यवसाय वाढवून चांगलं उत्पन्न मिळवायचं असेल तर आपल्याला ऑफलाईनवरून ऑनलाईन जगात प्रवेश करावाच लागणार आहे, आपला व्यवसाय हा सोशल मीडियावर आणावाच लागणार आहे. मग या सोशल मीडियावर आपल्याला आपला व्यवसाय अथवा इतर काही उपयोगाच्या साधनांना वाढवायचं असेल त्यामध्ये आपल्याला सातत्य ठेवण आवश्यक आहे. हे सातत्य म्हणजे लोकांपर्यंत आपल्या व्यवसायाची दैनंदिन माहिती अपडेट करणे. आपण आपल्या व्यवसायात काय नवीन बदल करतोय, या व्यवसायात आपण काय उत्तमरित्या देतो आहे याची मांडणी सोशल मीडियावर सादर करून आपला व्यवसाय भरभराटीच्या दिशेने न्यायचा आहे. जगभरातील मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कंपन्या सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले ७०% व्यवसायिक उत्पन्न मिळवत आहेत. पण आज काय झालंय सोशल मीडिया वापरणाऱ्या ८०% तरुण तरुणी याचा वापर स्वतःच्या जडणघडणीसाठी करून न घेता फक्त मनोरंजन आणि अंगप्रदर्शनासाठी करत आहेत. मग इथे आपण चुकतो आहे हे आपण समजून घ्यायला नक्कीच कमी पडतो आहे.
सोशल मीडियावर होणाऱ्या टाइमपास वृत्तीमुळे आजच्या तरुणांमध्ये तुलनात्मक भावना तयार होऊन नैराश्याच्या गर्तेत अडकणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे, आणि यामुळेच घडतंय अस की, आपल्याला सोशल मीडियावर दिसणारा झगमगाट हा आपण आपल्या आयुष्याशी जोडू पाहत आहोत, त्याची तुलना करू पाहत आहोत. एखाद्याने नवीन गाडीसोबत फोटो टाकला, तर आपल्याला वाटत आपणही असच काहीतरी करायला हवं.. सा. त्यामागे आपण ते सत्य पूर्ण पडताळून बघत नाही की त्या व्यक्तीने इथपर्यंत होचण्यासाठी काय मेहनत घेतली आहे, रात्रीचा दिवस करून त्याने कित्येक ची मेहनत घेतली आहे. पण आज तरुणांना सर्व काही इन्स्टंट हवं आहे. सादी मॅगी सारखं.. दोन मिनिटात! जे की शक्य नाही. आणि, याच एका रात्रीत एड होण्याच्या शर्यतीत गुरफटल्यामुळे आजचा १५-२५ वयोगटातील तरुण ज्याला नैराश्य या शब्दाची व्याख्या सुद्धा माहित नाही. तो सुद्धा बोल लागलाय की, तो डिप्रेशनमध्ये आहे. यामुळे आत्महत्येचं प्रमाणही मोठ्या टक्केवारीत दिसून येतं आहे. तुमचे फॉलोवर्स, लाईक, कमेंट हेच फक्त सोशल मीडियाचं आयुष्य नाही.. हे आपण अजूनही स्वीकारत नाही आहोत. ही भीषण वास्तविकता तरुणाईला एका मोठ्या खड्याकडे घेऊन जात आहे. आणि हेच वाईट दिवस हाताळण्याचे, कौशल्य अंगी नसल्याकारणाने, इतरांसोबत सतत तुलना करत राहिल्याने, अवास्तव स्पर्धा करत राहिल्याने वास्तविक जीवनाचा अनुभव नसल्यामुळे १५-२५ या वयोगटातील तरुणाईची आत्महत्या करण्याची संख्या पुढील काही वर्षात नक्कीच झपाट्याने वाढणार हे अधोरेखित भीषण असं सत्य आपल्यासमोर आहे. आणि, हेच आव्हान आपल्याला पुढे पेलाव लागणार आहे.
सोशल मीडियाचा योग्य वापर जर सातत्य ठेऊन आपण आपल्या ध्येय प्राप्तीसाठी करत असेल तर उराशी बाळगलेले स्वप्न नक्कीच सत्यात उतरते, आणि हेच सत्य माणसाला यशाच्या समीप नेत असत. सातत्य ठेवताना सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे ‘थकवा’. थकवा हा माणसाच्या विचारांच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. जर कुठलंही आवडीचं काम आपण पूर्ण सातत्य ठेवून करत असू तर त्या कामाचा शीण मनाला शिवतही नाही. जर आपल्याला यशस्वी व्हायचं आहे तर त्यात सातत्य महत्त्वाचं ठरतं, हे सातत्य ठेवताना वेळेचं भान उरत नाही. माणूस दिवसरात्र, उन वारा, वादळ पाऊस याचा विचार न करता झोकून देऊन काम करतो. आपल्याला कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर त्यात आपण १०१ दिवसाचं आव्हान स्वीकारून काम करायला सुरुवात करावी. १०१ दिवस फक्त त्याच त्या कामात सातत्य ठेवावं, इतका सराव करावा की, त्या १०१ दिवसांच्या प्रॅक्टिसनंतर आपल्याला त्या गोष्टीत कोणीही पराजित करू शकत नाही.
एखादा व्यवसाय असेल, तर त्याला यशस्वी करण्यासाठी आपण त्या व्यवसायाच्या आखीव रेखीव गोष्टींवर पुढचे १०१ दिवस जर सातत्यपूर्ण काम केलं तरच तो व्यवसाय दीर्घ काळासाठी स्पर्धेत टिकू शकतो. १०१ दिवसाचं बेसिक चॅलेंज नंतर आपण हा कालावधी आपआपल्या क्षमतेनुसार वाढवून त्यात सातत्य ठेवू लागलो तर आपल्याला शिस्तीची इतकी सवय होऊन जाते की आपण ऑर्गनाइझ होऊन जातो. कुठल्या गोष्टींना किती वेळ द्यायचा, कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे आपल्याला समजूनच जातं.
या १०१ दिवसांमध्ये आपण काय करतो किती सातत्य ठेवतो यावर आपले पुढील १००० दिवस आवलंबून आसतात, फक्त या १०१ दिवसांमध्ये आपण जर गढवासारख काम केलं तरच पुढील दिवस आपल्याला राजासारखे जगता येऊ शकतात. मग आता या १०१ दिवसांच चॅलेंज म्हणजे नेमकी काय ? तर याच १०१ दिवसांमध्ये आपण करत असलेल्या कामामध्ये स्वतःला झोकून द्यायचे आहे. उन, वारा, पाऊस, कार्यक्रम, मित्र, नातेवाईक, समाज, या सगळ्या गोष्टी या १०१ दिवसांमध्ये बाजूला ठेवायच्या आहेत आणि आपण करत असलेल्या कामामध्ये आपला जीव ओतून संघटन बांधणी, कामाचे व्यवस्थापण, आपल्या कामात पेणाऱ्या अडचणी आणि चॅलेंजेस या सर्व प्रश्नांवर उत्तर शोधून त्याला आपल्या अनुभवाच्या तिजोरीत भर घालायची आहे.
आजच्या काळात सोशल मीडिया जीवनाच्या विविध अंगांमध्ये एक प्रमुख भूमिका निभावत आहे. डिजिटल माध्यमांच्या या युगात, ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सन संवाद साधण्याचे, माहितीच्या देवाणघेवाणीचे, आणि सामाजिक सहभागाचे एक नवीन परिमाण साकारले आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, आणि लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्म्सद्वारे लोक सहजपणे संपर्क साधू शकतात, विचारांची देवाणघेवाण करू शकतात, आणि विविध विषयांवर चर्चा सुरू ठेवू शकतात. यामुळे, व्यक्तींच्या आणि संस्थांच्या संवादाच्या पद्धतीत मोठा बदल झालेला आहे, आणि सोशल मीडिया एक महत्वाचा घटक बनला आहे.
व्यवसायिक क्षेत्रात, सोशल मीडिया अत्यंत प्रभावी विपणन साधन म्हणून वापरला जातो. कंपन्या आणि व्यवसाय त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी, ग्राहकांशी थेट संवाद साधण्यासाठी, आणि ब्रँडची ओळख निर्माण करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करतात. डिजिटल प्रचार आणि विपणनाच्या माध्यमातून व्यवसाय आपल्या लक्ष्यित ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात, त्यांच्या गरजा समजू शकतात, आणि प्रतिसाद मिळवू शकतात. त्यामुळे, व्यवसायाचे यश आणि विकास सोशल मीडियाच्या प्रभावी वापरावर अवलंबून असते.
सामाजिक बदल आणि जागरूकता यासाठी सोशल मीडिया एक प्रभावशाली साधन ठरले आहे. विविध सामाजिक, राजकीय, आणि पर्यावरणीय विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी याचा वापर केला जातो. हे माध्यम समाजातील समस्या स्पष्टपणे दर्शवते, जनतेचा आवाज उठवते, आणि सामाजिक आंदोलने प्रोत्साहित करते. सोशल मीडिया नेहमीच सामाजिक मुद्द्यावर लक्ष केंद्रित करतो. आणि, सामाजिक न्यायाच्या दिशेने काम करतो, त्यामुळे लोकांच्या जीवनातील सकारात्मक बदल घडवता येतात.
शेवटी, सोशल मीडियाच्या वर्चस्वामुळे इंटरनेटवरील माहितीची खात्री आणि योग्यतेची तपासणी महत्वाची आहे. वापरकर्त्यांना खोटी माहिती आणि फेक न्यूजपासून सावध राहावे लागते, त्यासाठी योग्य माहितीची निवड करणे आवश्यक आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात, सोशल मीडियाचे प्रभावी आणि सजग वापराने एक सशक्त, माहितीपूर्ण, आणि सुसंगत समाज निर्माण करणे शक्य आहे. यामुळे, एक उत्तम भविष्य तयार करण्यासाठी, सोशल मीडिया हे एक महत्वाचे साधन ठरते.
१५. अंतः अस्ति प्रारंभ
अंतः अस्ति प्रारंभ! शेवट हीच खरी सुरुवात आहे. कुठल्याही गोष्टीचा अंत ही नवीन गोष्टीची सुरुवात आहे, या भूतलावर शाश्वत अस काहीच नाही तरीही इथे काहीच नाशवंत नाही. कारण जिथे संपतं तिथूनच काहीतरी सुरू होतं. रात्र संपली की दिवस सुरू होतो, सूर्य मावळला की चंद्रोदय होतो, झाड पडल की त्याठिकाणी नवीन बीजारोपण होतं, माणूस मेला की त्याचा आत्मा दुसऱ्या जन्माकडे प्रस्थान करतो अश्या एक ना अनेक घटनामधून आपल्याला निसर्ग, अध्यात्म, अनुभव हेच सांगत असतात की शेवटातून नवीन काहीतरी सुरुवात होणार असते.
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रारंभ आणि समाप्ती या दोन अंशांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. प्रत्येक गोष्ट, असो ती साधी प्रारंभाची प्रक्रिया असो किंवा संपुष्टात येणारा समारोप, या दोन घटकांच्या संयोगानेच व्यक्तीच्या यशाची गाथा लिहिली जाते. प्रारंभ म्हणजे नवे संकल्प, नवीन आव्हाने, आणि जीवनाच्या नवीन वाटा शोधण्याची क्षमता, तर अंत म्हणजे पूर्णत्व, शिस्त आणि त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा समारोप.
प्रारंभाच्या काळात, नव्या मार्गाचे अनुसरण करतांना अनेक अडचणी आणि संकोच येतात. परंतु, त्या अडचणींना सामोरे जाताना, आपण आपल्या अंतर्गत सामर्थ्याचा शोध घेतो आणि एक नवीन दृष्टीकोन प्राप्त करतो. प्रारंभाची गोडी त्या खऱ्या जिद्दीची आणि धैर्याची तपासणी असते. जी.. व्यक्तीच्या संकल्पशक्तीला उत्तेजन देते. प्रत्येक प्रारंभ हा एक नवीन शिकण्याची संधी असते, जो व्यक्तीला आत्मज्ञान, समर्पण, आणि दृढतेच्या मार्गावर नेतो.
अंताच्या टप्प्यावर, एका प्रक्रियेला पूर्णत्व प्राप्त होत असते, आणि त्या प्रक्रियेतून शिकलेल्या गोष्टींने सारांश मिळवता येतो. प्रत्येक समाप्तीच्या स्थितीत, आपण पुर्वीच्या प्रयत्नांचा आणि संघर्षांचा विचार करतो, आणि त्या आधारावर भविष्याची दिशा ठरवतो. अंतीम टप्प्यावर प्राप्त झालेल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग भविष्याच्या योजनांमध्ये केला जातो. यामुळे, ‘अंतः अस्ति प्रारंभः’ हे म्हणणे म्हणजेच, प्रत्येक समाप्तीचा प्रारंभ करण्यासाठी एक पायरी आहे आणि प्रत्येक प्रारंभाचा अंत म्हणजेच पुढील यशाच्या मार्गावर एक नवीन प्रारंभ.
शेवटी, प्रारंभ आणि अंत या दोन्ही प्रक्रियांचा समावेश जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असतो. हे दोन घटक एकमेकांवर अवलंबून असतात, आणि त्या एकत्रितपणे व्यक्तीच्या संपूर्ण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘अंतः अस्ति प्रारंभः’ या तत्त्वज्ञानानुसार, प्रत्येक समाप्ती एका नवीन प्रारंभाची जणू वाच्यता करते, आणि प्रत्येक प्रारंभ हा जीवनाच्या असीम आणि प्रगल्भ यात्रेचा एक भाग ठरतो. त्यामुळे, जीवनात यशाच्या दिशेने चालताना, प्रारंभ आणि अंत यांचा योग्य समज ठेवून, त्यांच्या दरम्यानच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ घेत, आपले मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
आपण जर हे पुस्तक वाचताना या शेवटच्या पानापर्यंत आले असाल तर तुमच्या अंतानंतरच्या आरंभाला सुरुवात झालेली आहे. आरंभ आणि अंत या नाण्याच्या दोन बाजू आहेत, दोन्ही बाजू एकमेकांपासून विभक्त नाहीत की एकमेकांशिवाय पूर्ण नाही. आयुष्यात अश्या अनेक परिस्थिती येतात.. जिथे, आपल्याला सगळं काही संपलं आहे अशी भावना उफाळून येते. आणि, आपण अचानकपणे थांबून जातो. थांबतो म्हणजे काय, आपण विचार करणेच सोडून देतो. आपले विचार आपल्या कृतीत उतरावयाचे असताना, आपण निराश होऊन थांबून जातो. ही निराशाच आपल्याला अपयशाच्या दरीत ढकलून देते आणि मग आपण एका अश्या कोषात जाऊन अडकतो जिथून निघणं कदाचित आपल्याला शक्य होत नाही. हळू हळू आपण सर्वार्थाने विरक्त होऊ पाहत असताना एक हलका असा आशेचा किरण आपल्या नजरेच्या टप्प्यात येतो आणि मग सुरू होतो एका नव्या दिशेने ध्येयाचा प्रवास. हा प्रवास उलगडत जातो, या प्रवासात आपण केलेल्या चुकांमधून शिकत जातो, आलेल्या अनुभवांची शिदोरी घेऊन नवीन ध्येयाकडे वाटचाल करू लागतो. या नवीन प्रवासात सुद्धा अनेकदा अशी वेळ येते की गत काळापेक्षाही भयंकर अनुभव आपल्याला येतात, नैराश्याची तीव्रता ही प्रचंड प्रखर अशी असते आणि एका क्षणाला व्यक्ती जीवन संपवण्याच्या उद्देशाने विचार करू लागतो.
पण मित्रांनो थोडसं थांबा! आत्महत्या हा काही शेवटचा पर्याय नव्हे किंबहुना हा कुठला पर्यायच नाही. आत्महत्या ही भेकड आणि पळपुट्या स्वभावाचा आणि निर्णय न घेऊ शकणाऱ्या वृत्तीचं प्रतिनिधित्व करतो. ज्याला खंबीरपणे संकटांना तोंड देता येत नाही तो जीवन संपवण्याचा विचार करतो. पण, धर्म सांगतो की, जीवन देणं आणि संपवणं हे ईश्वराच्या हातात आहे. आणि, ईश्वराच्या निर्णयात आपण हस्तक्षेप करणं म्हणजे मूर्खपणा आहे. या भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाच्या जीवनाचं काही ना काही उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टांची पूर्तता झाल्याशिवाय मृत्यूचा देखील स्वीकार करू नये. हेच श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं आहे.
अंत ही न टाळता येणारी घटना आहे पण अंत त्यालाच असतो ज्याला आरंभ असतो. कारण कसं असतं ना की, आपण जीव झोकून जोपर्यंत संघर्ष करीत नाही तोपर्यंत आपण सुरू केलेल्या कुठल्याच गोष्टीला महत्त्व नसतं, आणि जे सुरू होणार आहे ते कधी ना कधी संपणार आहे ही स्वीकृत भावना आपल्या मनात अनंत काळासाठी जेव्हा आपण रुजवतो तेव्हा आपली निवड संघर्षमय परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी नियतीने केलेली असते. पण सुरुवात करणं कठीण आहे, आणि हे कठीण पाऊल आपण आवर्जून उचलायला हवं. हे पाऊल उचलताना विचारांची प्रखरता, ध्येयप्राप्तीची जिद्द आणि आपल्या तत्वांशी एकनिष्ठता जर असेल तर कोणतीही गोष्ट कठीण नाही.
पण हा प्रवास करत असताना आपण नेमक्या आयुष्यात काय काय चुका केल्या यावर पूर्ण विचार करून त्या पुन्हा होऊ नये यावर भर दिला पाहिजे. कारण, आपल्याला आयुष्य पूर्णपणे घडवायचं आहे. त्यामुळे चुका स्वीकारून आपल्याला जायचंय. त्या स्वीकारलेल्या चुकांमधून घटनात्मक बदल घडवत आपल्याला उज्वल अस भविष्य घडवायचय हा माईंडसेट घेऊनच काम करायला शिकायचं आहे. आपण जितके भूतकाळात अडकून पडू त्याहून अधिक मागे खेचले जाऊ त्यापेक्षा मुव्ह ऑन करायला जमवायचं आहे.
मित्रांनो मुव्ह ऑन करायचं असेल तर आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचं धाडस करायला आपण पाऊल उचललं पाहिजे. कारण धाडस तोच करू शकतो ज्याच्यात हिम्मत असते. आणि, त्यालाच या जगात किंमत असते हे आपल्याला विसरून चालणार नाही. धाडसाने जीवनाला सामोरं जाता आलं की आपोआप मनातून नैराश्याच्या विचारांचा त्याग होतो. आपल्याकडे जुने जाणते लोक सांगायचे की, जीवघेणे धाडस करू नये, कोर्टाची, पोलीस ठाण्याची पायरी चढू नये.. पण, मी म्हणेन की, आयुष्यात एकदा तरी अश्या गोष्टींचा अनुभव घ्यायला हवा. कारण हा अनुभव आल्यानंतर आपल्याला कळतं की, त्या त्या प्रसंगात आपण काय करायला हवं. कुठल्या गोष्टीसाठी कोणत्या अधिकाऱ्याला भेटायचं, कोणत्या कोर्टात काय दाखले द्यायचे? हे शिकायला मिळतं, आणि मित्रांनो मी म्हणेन की, अशे अनुभव घेतल्यानंतर आपण काय करावं आणि काय करू नये याची शिकवण मिळून जाते.
या शिकवणीमधून वेगवेगळ्या संधी आपल्याला मिळतात, त्या प्रत्येक संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचाय, त्या संधीचं सोनं करून काहीतरी चांगलं अस करून दाखवायचं आहे. आपण नाही केलं तरी दुसरं कोणीतरी ते कार्य करणारच आहे. मग ते काम आपण का करू नये? त्याचा उपयोग आपण का करून घेऊ नये?. त्यामुळे संधी ओळखून काम हातात घ्या.. आणि, लवकर कामाला लागा.
संधी आली म्हणजे अडथळे आलेच, आणि त्या प्रत्येक अडथळ्याला आपल्याला हिंमतीने सामोरं जायचं आहे, त्या अडचणींवर आपल्याला मात करायची आहे. ही मात करताना आपल्याला तंत्रशुद्ध, कौशल्यपूर्ण असणं आवश्यक आहे. संधीच्या शोधात निघालेल्या व्यक्तीला कधी ना कधी ती संधी आपल्या दृष्टिपथात येते.. मग आपण कुशाग्र बुद्धिमत्तेची चुणूक याक्षणी दाखवायला पाहिजेच.
बद्धिमत्ता, कलागुण हे प्रत्येक व्यक्तीत जन्मतः असतात, काहीजण ते स्वतःमध्ये विकसित करत जातात. पण आपल्यावर आलेल्या वाईट वेळेत या सर्व गोष्टी धूसर होत असलेल्या बघून आपण खंत करीत बसतो, पण मित्रांनो वेळ ही प्रत्येकाची येते. आज आपला काळ जरी वाईट असला तरी आपल्याला तो आपल्या प्रयत्नामधून ती वाईट वेळ आपण बदलवू शकतो यावर ठाम असा विश्वास आपण स्वतःवर दाखवायला हवा. परिस्थितीला घाबरु नका, देव संघर्षही त्याच्याच वाट्याला आणतो ज्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता असते. त्यामुळे वेळेला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देऊन कामाला लागा आणि जग पादक्रांत करायला सुरुवात करा.
या वाईट काळात मात्र तुम्ही संगत कशी निवडता यावर तुमचं पुढचं भवितव्य आधारित आहे, वाईट काळात सोडून देणाऱ्या लोकांना तुम्ही चांगल्या वेळेत जर महत्त्व देत असाल तर तुम्ही पुन्हा त्याच चुका करत आहात. आणि, तीच वाईट वेळ पुन्हा आयुष्यात आणत आहात. याचं भान ठेवायला शिकायला हवं. जोपर्यंत आपण सिद्ध होऊन दाखवत नाही तोपर्यंत अज्ञातवास स्वीकारून तयारी करायला हवी. कारण आपल्या वाईट काळात शंभर रुपयाची मदत न करणारे लोक आपल्या चांगल्या काळात आपल्याला कर्जबाजारी करायलाही मागे पुढे पाहत नाही. त्यासाठी संगत ही विचार करूनच निवडा आणि येणारे धोके खोडून काढा.
ध्येयाकडे मार्गक्रमण करताना आपल्याला बोलता येणं फार आवश्यक आहे, आणि त्या प्रवासात आपण काय बोलतो, कस बोलतो याकडे लक्ष देऊन त्यावर काम करायला हवं. कुठे निर्णयक्षमता दाखवायची, कुठे नाही बोलायचं आणि किती मयदित बोलायचं यावरून आपली माणूस म्हणून किंमत ठरते. जर आपण अवास्तव बोलत असलो तर जग आपल्याला वेडा म्हणून सोडून देतं.. त्यापेक्षा, आपण स्वतःच्या बोलण्याकडे लक्ष देऊन त्याच्यावर भर दिला तर कदाचित लोकांमधे आपली प्रतिमा महत्त्वाचा व्यक्ती म्हणूनच अधोरेखित होते आणि आपल्या शब्दांना वजन प्राप्त होतं. त्यामुळे आपण बोलण्यावर नियंत्रण आणि शब्दांच महत्त्व वाढवून जगायला सुरुवात मात्र करायलाच हवी.
माणसाचं महत्त्व वाढायला लागलं की, हितशत्रूची संख्या वाढायला लागते, ही संख्या वाढली की मग महाभारत घडतं हा इतिहास आहे. जर आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायच आहे तर आपल्याला लढायला शिकलं पाहिजे. कारण ज्याला लढता येतं तोच खरा योद्धा असतो आणि तोच या विश्वात स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवू शकतो.
ज्याला लढता येत नाही त्याला हे जग गुलाम बनवतं. आणि, ज्याला गुलामी स्वीकारार्हा नाही तो व्यक्ती राज्य करणारा असतो. हे विसरून चालत नाही. तुमच्यात लढवय्या बाणा, उत्तम वक्तृत्व शैली, कुशाग्र निर्णयक्षमता असेल तर आपल्याला राज्य करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आणि आपल्याला राज्य करायचं असेल तर आपण सर्व प्रथम गुलामगिरीची मानसिकता सोडूनच ध्येय निश्चित करायला शिकायला पाहिजे.
ध्येय निश्चित करताना आपला गुरू कोण? यावर आपण कटाक्ष टाकला पाहिजे, आपला गुरु हा योग्य दिशा देणारा, कठीण प्रसंगात भक्कम बनवणारा असला की, आपण कधीही पराजित होऊ शकत नाही. त्यामुळे गुरू निवडताना आपण चूक करू नये आणि चुकीच्या लोकांना गुरू तर करूच नये. गुरू मिळवायचा असेल तर आपण प्रथमतः माणसं ओळखायला शिकायचं आहे. एकदा का माणसं ओळखता यायला लागलं की, आपला गुरु कोण आहे सुद्धा लगेच समजतं आणि मग मात्र आपल्याला योग्य रस्ता दाखवणारा व्यक्ती योग्य वेळी सापडतो.
आपल्याला गुरू मिळाला, आपण लढायला शिकलो, बोलायला शिकलो, आपल्या संपलेल्या आयुष्यातून आपण पुन्हा एकदा प्रारंभ केला.. आणि, मग आपण जमवायचे आहेत ते म्हणजे आपले अस्त्र आणि शस्त्र, आपली बुद्धी म्हणजे आपलं अस्त्र आणि सोशल मीडिया म्हणजे आपल शस्त्र. सोशल मीडिया हे पुढच्या अगणित वर्षांचं अस भविष्य आहे जिथून आपण भरारी घेऊ शकतो, प्रगती करू शकतो, पैसा कमवू शकतो, नाव कमावू शकतो त्यामुळे आपण सोशल मीडियाच जग समजून घेऊन त्याच्या खाचखळग्यात उतरून त्याचे बारकावे आता शिकायला पाहिजे. कारण सोशल मीडिया हेच भविष्य, हेच..
त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि ते अंगिकारून आपण तिथून आपल्या ताकदीची, आपल्या कलेची, आपल्या गुणांची ओळख आपल्याला या संपूर्ण विश्वाला करून द्यायची आहे. आणि दाखवून द्यायचं आहे की, संपलो नाही.. आणि, संपणारही नाही, आपण अंतातून सुरुवात करून भरारी घेतली आहे.. संपूर्ण जग आपल्या पंखांच्या छायेखाली घेण्यासाठी… कारण, अंतः अस्ति प्रारंभ म्हणजेच.. The End Is The Beginning!
अंत अस्ति प्रारंभः
शेवट हीच खरी सुरुवात आहे. ह्या मूलभूत विचाराने आजच्या तरुणाईला वेगळी दिशा, एक वेगळा विचार देण्याच्या हेतूने ह्या पुस्तकाचा प्रपंच मांडला. तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे आणि आयुष्यात येणारे नियतीचे हेलकावे आपल्या खांद्यावर पेलताना येणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करायचा आणि आपला माईंडसेट हा सतत सकारात्मक कसा ठेवायचा याचे लिखाण ह्या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. कसं लढायचं, कसं घडायचं आणि आलेल्या परिस्थितिचा सामना करून कसं पुढं निघायचं याचे इत्यंभूत लिखाण ह्या पुस्तकात केलेलं आहे आणि नक्कीच ह्याचा सकारात्मक परिणाम ह्या पुस्तकाच्या माध्यमातून घडेल आणि त्या खचलेल्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एक नवी उभारी मिळेल असा विश्वास आहे.
लेखक : वैभव दुस